Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी तालुक्यातील विविध शाळा, विद्यालय विद्यालये, लोकमान्य विद्यालय, आष्टी कन्या शाळा, हरि नारायण स्वामी विद्यालय, गणेश विद्यालय, वसूंधरा, मोतीलाल कोठारी विद्यालय १० वी. निकाल जाहीर...

पीएम श्री जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा दहावीचा ९३ टक्के निकाल ----------------
कु.सायली उकले सर्वप्रथम ------------------ आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील पीएम श्री जिल्हा परिषद कन्या प्रशालेने शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा यंदाही कायम राखत इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९३.९१ टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.जिल्हाभरात विविध शैक्षणिक, क्रीडा व सहशालेय उपक्रमांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या प्रशालेने यावर्षीही आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.विद्यार्थिनींच्या मेहनतीला शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभल्याने हा उल्लेखनीय निकाल शक्य झाला आहे. यावर्षी शाळेतील एकूण ११५ विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेस बसल्या होत्या.त्यापैकी तब्बल १०८ विद्यार्थिनी विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झाल्या असून १७ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.शाळेचा एकूण निकाल ९३.९१ टक्के लागला आहे.ग्रामीण भागातील मुलींना दर्जेदार शिक्षण देण्यामध्ये कन्या प्रशालेने पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या परीक्षेमध्ये कु.सायली बबन उकले हिने १०० टक्के गुण मिळवत प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे शाळेसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कु.सिद्धी किशोर राजूरकर हिने ९८.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला.कु.तनुजा राम पोकळे हिने ९७.८० टक्के गुण मिळवत व कु.अंकिता देविदास तावरे हिनेही ९७.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या तब्बल १७ विद्यार्थिनींनी शाळेच्या गुणवत्तापूर्ण परंपरेत भर घातली आहे. गुणवंताचा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुजाता विजयकुमार झगडे, समिती सदस्य लक्ष्मण रेडेकर,डॉ.नदीम शेख यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,गटशिक्षण अधिकारी मोहन काकडे,मुख्याध्यापक आबासाहेब खताळ,केंद्रप्रमुख त्रिंबक दिंडे,शिक्षणप्रेमी नागरिक,पालकांनी अभिनंदन केले. ------------------ हरिनारायण स्वामी विद्यालयाचा ९५ टक्के निकाल फैजान बेग प्रथम ------------------ आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील किसान शिक्षण संस्था संचलित आष्टी तालुक्यातील संचलित क-हेवाडी येथील हरिनारायण स्वामी विद्यालयाचा १० वी.चा ९५ टक्के निकाल लागला आहे.या शाळेतील फैजान अलीम बेग ८५.४० टक्के (सर्वप्रथम), अल्तमश नासिर पठाण ८४ टक्के (द्वितीय) आणि स्वरांजली नामदेव सानप ८३.२० टक्के गुणाानुक्रमे (तृतीय) आले आहेत.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी माजी आ.भीमराव धोंडे,संचालक अजय धोंडे,अभय धोंडे,प्रशासन अधिकारी डॉ.डी.बी.राऊत प्रा.शिवदास विधाते,माऊली बोडखे,संजय शेंडे,सागर वाघुले,संदीप नन्नवरे,मुख्याध्यापक संतोष नवले,पंजाब बांगर,बी.बी.धोंडे,भारत दळवी,संजय राऊत,बाळासाहेब भोपळे,रामदास सांगळे,दिनकर सानप,संतोष झगडे,बोडखे मॅडम यांनी अभिनंंदन केले. ------------------ आष्टी येथील गणेश विद्यालयाचा ९१ टक्के निकाल ------------------ आष्टी (प्रतिनिधी) आष्टी शहरातील गणेश विद्यालयाचा ९१ टक्के निकाल लागला आहे.गुणानुक्रमे शेख सारा एजाज (९६. ६० प्रथम),चौधरी जयदत्त अशोक (९२.६० द्वितीय),भोगाडे वैष्णवी भाऊसाहेब (९२ तृतीय ),मोरे नंदिनी दिनकर (८७.२० चौथी),गोरे अभिषेक हिराभाऊ (८६.२० पाचवा),भवर सानिका नाना (८४.६०),आगलावे सोहम धन्यकुमार (८३.६०),फुंदे आदित्य बाबासाहेब (८२.८०),गिते धनंजय सुनील (८१. ८०), फुंदे कृष्णा मच्छिन्द्र (८१.८०), निकाळजे अनुष्का विनोद (८१.२०), गरडकर संग्राम गणेश (७८.८०), वाल्हेकर जयराम दशरथ (७८.४०),ढोबळे कार्तिक साईनाथ (७७.४०), सानप महेश बाबासाहेब (७५.६०),विशेष श्रेणी १५,प्रथम श्रेणी ५३,द्वितीय श्रेणी २८ असा निकाल लागला आहे गुणवंत विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. -------------- खुंटेफळच्या लोकमान्य विद्यालयाची यशाची गरुडझेप; दहावीचा निकाल ९५ टक्के,साक्षी गव्हाणे शाळेत प्रथम ----------------- फोटो ------------------ आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील लोकमान्य शिक्षण संस्थेच्या 'लोकमान्य विद्यालया'ने यशाची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली आहे.या विद्यालयाचा ९५ टक्के निकाल लागला आहे.या घवघवीत यशामध्ये साक्षी गव्हाणे हिने ९२.६० टक्के गुण मिळवून विद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.ग्रामीण भागातील मर्यादित सोयी-सुविधांवर मात करत येथील विद्यार्थ्यांनी अत्यंत जिद्दीने अभ्यासात सातत्य ठेवले आणि घवघवीत यश संपादन केले.प्रथम क्रमांक साक्षी गव्हाणे (९२.६० टक्के),द्वितीय क्रमांक - सौरभ संजय काकडे (९१.८० टक्के) तृतीय क्रमांक- दिव्या सुरेश थोरवे (९० टक्के) गुण मिळाले आहेत.दहावीच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर उत्कृष्ट यश मिळवल्याबद्दल लोकमान्य शिक्षण संस्थेचे सचिव हनुमंतराव थोरवे,संचालक युवा नेते धैर्यशील थोरवे आणि प्राचार्य आर.के.सुंबरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे पर्यवेक्षक एम.एम.काकडे,जी.एल.वाघमारे,ए.बी.थोरवे,जे.यु. वाळके,आर.यु.बोडखे,एम.आर.काकडे,ए.जी. भालेराव,पी.के.नरवडे,बी.एस.थोरवे,पांडुरंग जंजिरे,विजय जगताप,एस.अल्हाडे,आर.जी.काकडे यांच्यासह खुंटेफळ गावचे सरपंच,उपसरपंच आणि समस्त ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. चोकट -------- आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या वर्षभराच्या कठोर परिश्रमाचे आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचे फळ आहे.या यशामुळे खुंटेफळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. --- शालेय प्रशासन ---------------- पंडित नेहरू,ज्ञानेश्वर,अहिल्यादेवी,शृंगेरी,निजाम पटेल,महेश आणि पाटोदा उर्दू या विद्यालयांचा १०० टक्के निकाल ----------------- आष्टी (प्रतिनिधी) फेब्रुवारी /मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी.परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला आहे. आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आणि भगिनी शिक्षण संस्थेच्या ३९ विद्यालयाचा निकाल जाहीर झाला आहे.त्यामध्ये पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय आष्टी,ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय देऊळगाव घाट,अहिल्यादेवी विद्यालय टाकळी अमिया ,शृंगेरी विद्यालय ब्रह्मगाव,निजाम पटेल विद्यालय मेहेकरी कानडी खुर्द,महेश माध्यमिक विद्यालय रुईनालकोल आणि पाटोदा उर्दू हायस्कूल पाटोदा या सात विद्यालयांचा १०० टक्के निकाल लागला आहे. पंडित नेहरू विद्यालय आष्टी (१०० टक्के), ज्ञानेश्वर विद्यालय देऊगाव घाट (१०० टक्के),अहिल्याबाई होळकर विद्यालय टाकळी आमिया (१०० टक्के), श्रृंगेरी विद्यालय ब्रम्हगाव (१०० टक्के),निजाम पटेल विद्यालय मेहकरी (१०० टक्के), महेश विद्यालय रूई नालकोल (१०० टक्के),पाटोदा ऊर्दु हायस्कुल पाटोदा (१०० टक्के) अश्वलिंग विद्यालय पिपळवंडी (९७ टक्के),कानिफनाथ विद्यालय निमगाव चोभा(९७ टक्के), यशवंतराव होळकर विद्यालय शिरूर (९७ टक्के),जय भवानी विद्यालय जळगाव (९६ टक्के),पांडुरंग विद्यालय नांदुर (९६ टक्के),मच्छिंद्रनाथ विद्यालय सावरगाव (९६ टक्के), हरिनारायण स्वामी विद्यालय क-हेवाडी (९५ टक्के),श्रीकृष्ण विद्यालय मातकुळी (९३ टक्के), जोतिलिंग विद्यालय कानडी बु.(९३ टक्के),विट्ठल विद्यालय निमगाव बोडखा (९२ टक्के) श्रीराम विद्यालय कडा (९२ टक्के), आष्टी पब्लीक स्कुल आष्टी (९१ टक्के), भगतसिंग विद्यालय किन्ही (९१ टक्के), पिंपळेश्वर विद्यालय पिंपळा (९१ टक्के), सुदर्शन विद्यालय सांगवी पाटण (९१ टक्के),राजीव गांधी विद्यालय मातावळी (८९ टक्के),जोगेश्वरी विद्यालय पारगाव (८९ टक्के), नागनाथ विद्यालय नागतळा(८८ टक्के),संत बाळूदेव महाराज विद्यालय पाटोदा (८८ टक्के), यशवंतराव चव्हाण विद्यालय पोखरी (८८ टक्के), संत वामनभाऊ विद्यालय पाटसरा (८७ टक्के), आंबिका विद्यालय बेलगाव(८६ टक्के), वृध्देश्वर विद्यालय गहुखेल(८६ टक्के), भैरवनाथ विद्यालय आंमळनेर (८५ टक्के),क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय चुंबळी (८५ टक्के), सय्यदमीर बाबा विद्यालय लोणी (८४ टक्के), छत्रपती शिवाजी विद्यालय (८३ टक्के),टाकळसिंग हनुमान विद्यालय घाटा पिंप्री (८१ टक्के),इंदिरा कन्या विद्यालय धामणगाव (८१ टक्के),माऊली विद्यालय बोरोडी (७८ टक्के), प्रभुरामचंद्र विद्यालय दादेगाव (७३ टक्के) आणि रोडेश्वर विद्यालय डोगरगण (६१ टक्के) असे शेकडा गुण मिळाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी माजी आ.भीमराव धोंडे,संचालक अजय धोंडे,अभय धोंडे,प्रशासन अधिकारी डॉ.डी.बी.राऊत प्रा.शिवदास विधाते,माऊली बोडखे,संजय शेंडे, सागर वाघुले,संदीप नन्नवरे सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंंदन केले. ----------------- आष्टी तालुक्याचा शैक्षणिक डंका! पाच विद्यार्थिनींची दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुणांसह गगनभरारी -------------- कडा येथील एका विद्यार्थ्यालाही १०० टक्के गुण ---------------- आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात आष्टी तालुक्याने घवघवीत यश संपादन केले आहे.विशेष म्हणजे, तालुक्यातील पाच विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याने १०० टक्के गुण (बेस्ट ऑफ फाइव्ह) मिळवून जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात तालुक्याचा दबदबा निर्माण केला आहे.या उत्तुंग यशामध्ये आष्टी येथील वसुंधरा विद्यालयाच्या चार विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे.यामध्ये अक्षता अनिल नन्नवरे,सिद्धी संदीप पवार,सिद्धी संजू कर्डिले आणि अक्षरा अशोक पवार या चौघींचा समावेश आहे.एकाच शाळेतील चार मुलींनी १०० टक्के गुण मिळवल्याने वसुंधरा विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.आष्टी येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेची विद्यार्थिनी सायली बबन उकले हिने देखील १०० टक्के गुण प्राप्त करत आपल्या शाळेचा आणि कुटुंबाचा नावलौकिक वाढवला आहे.याशिवाय कडा येथील श्रीराम विद्यालयाच्या सूरज अंकुश बडे याने ही १०० टक्के गुण मिळवले आहेत.या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाने तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या यशाबद्दल संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या