



आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील जि.प.शाळेतील ४४ वर्षापुर्वीच्या १९८० दहावी बॕच विद्यार्थीचा स्नेहमेळावा शुक्रवारी लोकमान्य विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.सन १९८० च्या इयत्ता १० चे विद्यार्थी - विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला.स्नेहमेळाव्यात अनेकांचे भाषणे झाली.४४ वर्षानंतर विद्यार्थी या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आल्यामुळे अनेक आठवणींना उजाळा मिळाला.गुरु व विद्यार्थ्यांंना आपला सेवाकाळ आठवला.विद्यार्थ्यांना आपलं बालपण आठवल्यने मन हेलावून गेले.विद्यार्थी आणि शिक्षक अनेक वर्षानंतर भेटण्याचा आनंद,शब्दांना वाट मोकळी करता आली.स्नेहमेळावाचा योग वर्षातून एकदा का होईना यावा अशी भावना प्रत्येकाने व्यक्त केली.दोस्ताना चित्रपटातील
ओ खाबो के दिन,
ओ..किताबो के दिन,
सवालों की राते,
जवाबो के दिन,
कई साल हमने गुजारे यहा,
यही साथ खेले,हुए हम जवा,
था बचपन बडा आशिकाना हमारा.
या गीतांची आठवण माजी विद्यार्थी या नात्याने करून गेले.आठवणीनी सर्वविद्यार्थी,मित्र,भारावुन गेले होते.आष्टी तालुक्यातील लोकमान्य विद्यालयाच्या सन १९८० सालच्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आणि स्नेहभोजन झाले.तब्बल ४४ वर्षाने विद्यार्थी पुन्हा एकत्र आले होते.आपण दरवर्षी क्लासमेंटांचे " गेट टुगेदर " करु या असे सुभाष पगारे यांनी प्रस्ताविक भाषणात सांगीतले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी जे आपल्या ग्रुपमध्ये होते.ज्यांचे निधन झाले आहे.या मित्र मैत्रीणांना आणि मयत गुरुजन आणि स्वातंत्र्य सैनिक साहेबराव थोरवे दादा यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲड.हनुमंत थोरवे हे होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी प्राचार्य एम.टी.शिंदे,विद्दमान प्राचार्य रविकांत सुंबरे,बीड जि.प.चे माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे, दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे,शांतीलाल गुरसाळी,यशवंत भोंडवे,रसुल शेख,रसाळ मॕडम,बाळासाहेब कुलकर्णी,प्रा.दादासाहेब झांजे,जयप्रकाश विधाते,साहेबराव काकडे,सरपंच महादेव थोरवे,उपसरपंच गणेश थोरवे,शाहिर सुभाष थोरवे,
रामभाऊ थोरवे,राजाभाऊ वाळके आदि मान्यवर उपस्थित होते.
खुंटेफळ येथील १९८० साली दहावीच्या बॕचमधील विद्यार्थी आणि पुढील आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले सर्व मित्र मंडळी (माजी विद्यार्थी)
मेळाव्याच्या निमित्ताने ४४ वर्षांनी पुन्हा एकत्र आले होते.आनंद,स्नेह,कौतुक अशा संमिश्र भावना सवंगड्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या.४४ वर्षांनी एकमेकांना भेटणाऱ्या मित्राच्या चेह-यावर उत्सुकता,आनंद,मस्ती अशा संमिश्र भावना होत्या.यावेळी माजी विद्यार्थ्यांच्यावतीने सत्कार केला.माजी विद्यार्थींनी तत्कालीन गमतीजमती,सुख,
दुःख,झालेल्या चुका,मिळालेले यश,
मनात राहिलेले शल्य व्यक्त करत कार्यक्रमामध्ये रंगत आणली.४४ वर्षांनी भेटलेल्या मित्र मैत्रिणींनी यापुढेही व्हॉटसॅप,फेसबुक,मोबाईल व प्रत्यक्ष भेटीगाठीच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा संकल्प केला.गरजेनुसार शाळेस आवश्यक ती मदत करण्याचे विद्यार्थ्यांंनी मत व्यक्त केले.या गेट-टुगेदर कार्यक्रमाच्या निमित्ताने चाळीसहून अधिक माजी विद्यार्थी,विद्यार्थिनी प्रथमच एकत्र आले होते.दहावीनंतर तब्बल ४४ वर्षाने या सर्व विद्यार्थी मित्रांची पुनर्भेट झाली.यापैकी काहीजण नियमित भेटणारे होते तर अनेकांची दहावीतुन शाळा,कॉलेज संपल्यानंतर पहिल्यांदाच भेट होत होती.
एकमेकांना भेटून ओळख दाखवून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात सर्व मित्र हरखुन गेले होते.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिरीषभाऊ थोरवे,सुभाष पगारे,विजय रणशिंग,प्रल्हाद काळे,महादेव मुंगसे,ज्ञानेश्वर क्षीरसागर,अर्जुन गाडे,मोमीन मेहमूद,
भागवत थोरवे, वल्लीखा पठाण,आसाराम वाडेकर,सुरेश नंदा थोरवे,बबिता थोरवे,
सुजाता निलाखे,
भागवत निलाखे यांची भाषणे झाली.शिक्षकांना भेटून आनंद द्विगुणित झाल्याची भावना व्यक्त केली.आजच्या कार्यक्रमातील सहभागी माजी विद्यार्थी शिरीषभाऊ थोरवे, सुभाष पगारे, विजय रणशिंग, प्रल्हाद काळे,महादेव मुंगसे, ज्ञानेश्वर क्षीरसागर,अर्जुन गाडे, मोमीन मेहमूद,
भागवत थोरवे,वल्लीखा पठाण,मन्सूर पठाण,
आसाराम वाडेकर, सुरेश राऊत,नंदा थोरवे, बबिता थोरवे, सुजाता निलाखे,नामदेव खांदवे, सुदाम आगाशे,पोपट जाधव, सुदाम मांढरे,सुखदेव मुठे,सखुबाई काकडे,
अशोक दोरगे,सुनील पोळ,गोवर्धन जाधव,भागवत निलाखे,विजय रणासिंग,शिरीषभाऊ थोरवे,प्रल्हाद काळे,
ज्ञानेश्वर क्षीरसागर,
महादेव मुंगसे, वलीखाॕन पठाण,मोमीन,पोपट जाधव,
बबिताताई थोरवे,सुनिल पोळ,सुरेश राऊत आदि माजी विद्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या