Ticker

6/recent/ticker-posts

आ.सुरेश धस आणि आ.बाळासाहेब आजबे यांनी श्रेयवादाची लढाई थांबवून विकास कामे करावीत* ---- *आष्टी विधानसभा निवडणुक लढणारच * --माजी आ.भीमराव धोंडे.

आष्टी तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्याच्या जनतेचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेती पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आ. बाळासाहेब आजबे आणि आ. सुरेश धस या दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सरकारचा फायदा घेऊन खुंटेफळ साठवण तलाव या प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावावा...आष्टी मतदार संघाला दोन आमदार मिळाले आहेत. कोणीच आमदार पिढ्यान पिढ्या राहत नसतो.पण या दोन्ही आमदारांनी पिढ्यान पिढ्याचा कायमस्वरूपी पिण्याचा पाण्याचा आणि शेतजमिनीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा असा सल्ला देत आष्टी तालुका हा सतत दुष्काळी असल्यामुळे सध्या सत्तेत असलेले आ.सुरेश धस आणि आ. बाळासाहेब आजबे असे दोन आमदार तालुक्याला मिळाले आहेत.आपणही सत्तेत आहोत.पण खुंटेफळ साठवण तलावाचे श्रेयवादाची लढाई न लढता दोघांनी आपली राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय वजन पणाला लावून लवकरात लवकर म्हणजे २०२४ पूर्वी खुंटेफळ साठवण तलावाचे काम पूर्ण करून त्यामध्ये १.६८ टी.एम.सी.पाणी आणून त्याहीपुढे आणखी ४.०० टी.एम. सी.पाणी आणण्यासाठी प्रयत्न करावेत.कृष्णा - भीमा स्थिरीकरण योजनेचे श्रेय तात्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाच आहे त्यांच्या प्रयत्नामुळेच मराठवाड्याच्या वाट्याचे २४.०० टी.एम.सी.पाणी मंजूर झालेले आहे.आ. सुरेश धस आणि आ. बाळासाहेब आजबे यांनी श्रेयवादाची लढाई थांबवून विकास कामे कामे करावेत असे सांगत एक लाखा पेक्षा जास्त मते घेऊन पराभूत होणारे महाराष्ट्रात भाजपचे केवळ तीनच उमेदवार आहेत.त्यापैकी मी एक आहे.त्यामुळे माझा या विधानसभेच्या उमेदवारीवर दावा आहे आणि आपण तर आष्टी विधानसभा निवडणुक लढविणारच आहोत अशी स्पष्टोक्ती शिक्षण महर्षी माजी आ.भीमराव धोंडे यांनी केली. आष्टी येथील आनंद भवनात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. माजी आ.भीमराव धोंडे पुढे म्हणाले की, १९९० ते १९९५ च्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कृष्णा- भीमा स्थिरीकरण योजने अंतर्गत मराठवाड्याच्या वाट्याचे २४.०० टी.एम.सी.पाणी मंजूर करून घेतले. त्यातील आष्टी तालुक्यासाठी ५.६८ टी.एम.सी.पाण्याची तरतूद केलेली आहे. त्यातील १.६८ टी. एम.सी.पाणी मिळणार असून त्यासाठी म्हणजे आष्टी उपसा सिंचन योजना क्र.३ या योजनेचे काम चालू आहे. आ. सुरेश धस आणि आ. बाळासाहेब आजबे यांनी श्रेय वादामध्ये संघर्ष करण्यापेक्षा दोघांनी मिळून एकत्रितपणे लवकरात लवकर हा खुंटेफळ साठवण तलाव पूर्ण करण्यासाठी आणि उर्वरित ४.०० टी.एम.सी. पाणी मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.कारण योजना या चिरकालीन असतात. आमदारपद हे काही काळासाठीच असते. कायमचा कोणीही आमदार नसतो असे सांगून २०१७ साली या खुंटेफळ साठवण तलावासाठी पर्यावरणाची मान्यता नसल्यामुळे मी आमदार असताना खा. प्रीतमताई मुंडे,आ.सुरेश धस यांना सोबत घेऊन दिल्ली येथे जाऊन तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरणाची मान्यता घेण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर केंद्रशासनाने ५० हजार हेक्‍टरच्या आतील प्रकल्पासाठी पर्यावरण मान्यता राज्य सरकारनेच द्यावी असा शासन निर्णय झाल्याने या खुंटेफळ साठवण तलावाची पर्यावरण मान्यता मिळालेली आहे.सध्या आष्टी तालुक्यात जून - जुलै महिन्यातील सरासरी पावसाच्या २२ टक्के इतकाच पाऊस झाला आहे.ही परिस्थिती भयावह आहे. खरिपातील पेरण्या झालेल्या नसून पेरलेली बियाणे जळण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १० हजार रु.अनुदान तात्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे. सन २०१७ मध्ये आपण आमदार असताना बीड ते अहमदनगर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करून ११०० कोटी रु.च्या निविदा प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु त्याला स्थगिती मिळाली मात्र सन २०१९ नंतर स्थगित केलेली कामे सुरू करण्यात आली परंतु हे काम सुरू झाले नाही आज या बीड ते अहमदनगर महामार्गाची अत्यंत आवश्यकता असून प्राधान्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून हा महामार्ग व्हावा यासाठी प्रयत्न करावा.या कामाला देखील आ.धस आणि आ.आजबे यांनी प्राधान्य द्यावे असेही सांगितले. सध्याच्या महाराष्ट्र शासनातील सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी १०० कोटी रु.विकास निधी मिळणार असल्याचे समजते त्यातून अशा प्रकारची विकास कामे व्हावेत अशी अपेक्षा असल्याचे सांगत ते म्हणाले की, केंद्रशासनाने अभिनंदनीय निर्णय घेऊन केवळ १.०० रु.मध्ये शेतकऱ्यांना पीक विमा काढता येतो. या योजनेतून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत. आष्टी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जल जीवन योजनेची कामे सुरू आहेत परंतु या सर्व पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत हे जुनेच आहेत त्यामुळे पाणीटंचाई काळात या योजना कितपत यशस्वी होतील अशी शंका असून त्यासाठी आष्टी तालुक्यातील ६५ गावांसाठी एक भव्य पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबतचा विचार सुरू होता.या योजनेसाठी उजनी जलाशयातून स्त्रोत निर्माण करून ही योजना कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे.ज्याप्रमाणे जायकवाडीचे पाणी पाथर्डी आणि शिरूरला मिळणार आहे. त्याप्रमाणेच उजनीचे पाणी आष्टीला मिळावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असेही माजी आ.धोंडे यांनी सांगितले. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांसाठी काही धडाकेबाज निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये मागेल त्याला ट्रॅक्टर, मागेल त्याला शेततळे आणि मागासवर्गीयांना थेट खात्यावर १० लाख रुपये व्यवसायासाठी मंजूर करण्याचा आगळावेगळा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. त्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील सरकारने देखील याबाबत काही करता येईल काय याचा विचार करावा असे सांगून ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रु. मिळतात परंतु खते,औषधे आणि बी - बियाणे यांचे दर वाढल्यामुळे ६ हजार ऐवजी १२ हजार रुपये वार्षिक मंजूर व्हावेत. त्यामध्ये आणखी राज्य शासनाचे ६ हजार रुपये असल्याने शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे.दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना उपयोगी ठरणारे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत असलेले रस्ता,कामे पाणंद रस्ता कामे,शेततळे जलसिंचन विहिरी आणि फळबागा ही कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात यावीत आणि या कामांमध्ये भ्रष्टाचार होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे सांगितले. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की महाराष्ट्र राज्यातील सर्व पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या तर सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी स्वतंत्ररित्या सत्तेवर येईल असा आत्मविश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला *चौकट* --------------- महामानव घटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अजरामर कार्याची आठवण म्हणून महाराष्ट्रातील एका जिल्ह्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर नाव देण्यात यावे अशी मागणी केली.बीड जिल्ह्याला हे नाव दिले तरी हरकत नाही उलट आम्हाला आनंदच वाटेल. शेवटी केली एका प्रश्नाच्या उत्तरात माजी आमदार धोंडे म्हणाले की,मी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक लाखाच्यावर मते घेऊन पराभूत झालेलो आहे. एक लाखपेक्षा जास्त मते घेऊन पराभूत होणारे महाराष्ट्रात भाजपचे केवळ तीनच उमेदवार आहेत. त्यापैकी मी एक आहे.त्यामुळे माझा या विधानसभेच्या उमेदवारीवर दावा आहे.याबाबत भाजपचे वरिष्ठ नेत्यांशी विचार विनिमय झालेला आहे. त्यानुसार पक्षकार्य जोमाने सुरू असल्याचेही माजी आमदार धोंडे यांनी सांगितले. __________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या