Ticker

6/recent/ticker-posts

नांदूरचे उच्चशिक्षित प्रा.शुभम आणि सौ.रुपाली विधाते यांचा प्रेरणादायी विठाई डेअरी उद्योग! ---------------------------------------- २० म्हशी व गाईचा तबेला; दोनशे लिटर दूध,लाखोंचा अर्थ व्यवहार, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती

आष्टी (प्रतिनिधी) अत्यंत कष्टप्रद प्रवासातून उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकरीची हमी नाही आणि अर्थप्राप्ती नाही.या वास्तवतेचे भान ठेवून ग्रामीण भागात सुद्धा त्या परिस्थितीशी अनुकूल व्यवसाय करून स्वावलंबी बनत इतरांनाही रोजगार देणारा नांदूरच्या उच्चशिक्षित तरुण शुभम विधातेच्या प्रेरणादायी विठाई डेअरी उद्योगाची आज जिल्हाभर चर्चा होत आहे.शुभम आणि सौ.रुपाली विधाते हे आष्टी तालुक्यातील नांदूर येथील उच्चशिक्षित दापंत्य.आई सौ. कमलबाई उर्फ इंदुबाई परसराम विधाते आणि सेवानिवृत्त कृषी अधिकारी परसराम विधाते यांंच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेमुळे हा विठाई डेअरी उद्योग सुरु झाला. शेतकरी कुटुंबातून त्यांनी अत्यंत खडतर परिश्रमातून उच्च शिक्षण घेतले परंतु सध्याच्या विदारक स्थितीमध्ये नोकर मिळण्याची आशा दुसर असतानाच नवीन जोखीम स्वीकारली आणि हीच जोखीम यशस्वी आणि तितकीच ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा देणारी ठरली आहे.संकरीत, गावरान गायी,म्हैसपालनातून दुगधोत्पादनाचा प्रकल्प उभारत आष्टी तालुक्यातील नांदुर येथील प्रा.डाॕ.शुभम परसराम विधाते या युवकाने इतरांना देखील रोजगार उपलब्ध करून दिला आहे.नांदुर विठ्ठलाचे येथील प्रा.डाॕ.शुभम विधाते याने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळवत धानोरा येथील वरीष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणुन नोकरी सुरु केली आहे.शेती व दुग्धव्यावसाची आवड असल्याने नोकरी सुरू असताना त्याचे एका मित्राच्या तबेल्यावर जाणे व्हायचे.गायी ,म्हशींचा हा तबेला पाहून आपण ही असाच एखादा प्रकल्प सुरू करायला हवे असे शुभमच्या मनात विचार सुरू झाले.नांदुर येथे स्वतःची शेती असल्याने तिथेच हा प्रोजेक्ट उभारण्याचा त्याने मनाशी निश्चय केला.चांगली नोकरी असताना आपला छंद जोपासला आहे. सुरवातीला घरातील आई,वडील ,पत्नीचा लोकांचा विरोध होता मात्र शुभमचा दृढनिश्चय पाहून त्यांनी देखील त्याला प्रोत्साहन दिले.सन २०२० पासून शुभमचा १५ गायी ,१० म्हैसपालन प्रकल्प सुरू केला.सुरुवातीला केवळ पाचा म्हशींवर सुरू झालेला तबेला आता १० म्हशींनी व्यापला आहे. जवळच १५ गायींसाठी स्वतंत्र सोय केली आहे.दररोज दोन्ही वेळेचे मिळून १५० ते २०० लिटर दुध मिळते.या दुधापासुन दर्जेदार खवा करुन अहमदनगर शहरात विकला जातोय. उरलेल्या दुधाचे पनीर तयार करून विक्री करण्यात येते.शुभमकडे या गायी,म्हशींची देखभाल करायला दोन कामगार आहेत.शुभमदेखील त्यांच्याबरोबर राबत असतो.म्हशींच्या दूध,पनीर विक्रीतून सर्व खर्च वजा जाता किमान लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. *गांडूळ खत प्रकल्प* --------------------------- शेणापासून खत तयार करण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे. हे सेंद्रिय खत चारा पिकासाठी वापरले जाते.गायी म्हशींसाठी चारा हिरवाच वापरला जातो.इतर चांगल्या दर्जाच्या पेंडीचा वापर केला जातो.त्यामुळे दूध देखील निर्भेळ आणि शुद्ध मिळते.साहजिकच त्याला भाव देखील चांगला मिळतो. *दुग्धोत्पादन हा एक चांगला व्यवसाय* ------------------------------ दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण भागात शेतीशी निगडित असल्याने तो फायदेशीर आहे असे शुभमचे सांगणे आहे.पण त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे.कारण पहाटे तीनला सुरू झालेला दिवस रात्री आठला संपतो. कोणतीही सुट्टी मिळत नाही.
तथापि शुभम आपल्या या व्यवसायावर खुश आहे. *इतरांना रोजगार देऊ शकलो याचे समाधान* ------------------------------ अर्थप्राप्ती सोबत इतरांना रोजगार देऊ शकलो याचे समाधान मोठे असल्याचे त्याने सांगितले.शुभम आपले आई वडील,भाऊ इंजि. सचिन आणि भावजय सौ.प्रियंका विधाते आणि पत्नी सौ.रुपाली विधाते आणि इतर कुटुंबियांच्या सहकार्याचा तर कौतुकाने उल्लेख करतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या