Ticker

6/recent/ticker-posts

बीड आणि अहमदनगरच्या सीमेवर साकारले जातेय धर्मवीर संभाजी महाराजांचे भव्य मंदिर!

उत्तम बोडखे,आष्टी. ------------ महाराष्ट्र या संतांच्या आणि वीरांच्या भूमीमध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी आणि नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या सीमेवर कडवे हिंदू धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे सदैव स्मरण व्हावे या व्यापक हेतूने माणिकदौंडी येथे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.अजिनाथ महाराज आंधळे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून संभाजी महाराजांच्या भव्य दिव्य मंदिराची उभारणी होत आहे. अत्यंत जाज्वल्य ऐतिहासिक मंदिर उभारणीच्या या कामाची पाहणी करण्यासाठी आष्टी, पाटोदा, शिरूरचे माजी आमदार तथा शिक्षण महर्षी भीमराव धोंडे,माजी आमदार साहेबराव दरेकर,ज्येष्ठ लेखक प्रफुल्लभाऊ सहस्त्रबुद्धे,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,संतोष सानप यांच्यासह पत्रकार बांधवांनी आवर्जून भेट देत पाहणी केली आणि ह.भ.प.आजिनाथ महाराज आंधळे यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेची मन भरून प्रशंसा केली.बीड अहमदनगर या जिल्ह्याच्या सीमेवर धामणगाव पासून १५ किलोमीटर आणि पाथर्डीपासून १० किलोमीटर अंतरावर माणिकदौंडी हे गाव आहे. जवळच २ किलोमीटर अंतरावर महादेवगड येथे धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचे मंदिर बांधकाम सुरू असून लवकरच या दिमागदार वास्तूचे बांधकाम पूर्ण होणार आहे अशी माहिती महादेवगडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज आंधळे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना आंधळे महाराज म्हणाले की, स्वराज्याचे पहिले युवराज मराठा समाजाचे दुसरे छत्रपती हिंदू धर्म संरक्षणासाठी प्राणाची बाजी लावणारे थोर पराक्रमी धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन चरित्र आणि धर्मकार्य आजच्या पिढीतील युवकांनी अभ्यासावे त्यांनी या स्फूर्तीदायी नेतृत्वापासून प्रेरणा घ्यावी. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या शौर्याने आपले नाव भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षरांनी कोरलेले आहे.कारण मुगल सम्राट आणि औरंगजेबाच्या लाखो क्रूर कर्म आणि प्रयत्नानंतर देखील संभाजी महाराजांनी आपला धर्म बदलला नाही.संभाजी महाराजांना संस्कृतसह १३ भाषा अवगत होत्या.त्यांना घोडेस्वारी तलवारबाजी आणि धनुर्विद्या या प्रकारामध्ये प्रावीण्य होते. ते केवळ पराक्रमीच नव्हते तर बुद्धिमान देखील होते कारण चौदाव्या वर्षी त्यांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला.छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा साम्राज्याच्या १५ पट मोठ्या असलेल्या मुघल पोर्तुगाल साम्राज्याशी एक हाती लढा दिला.त्यांनी १२० लढाया लढल्या परंतु एकही लढाईत त्यांनी पराभव पत्करलेला नाही अशा या प्रचंड पराक्रमी योद्धा असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचे दर्शन दैनंदिन व्हावे यासाठी महाराष्ट्रातले पहिले मंदिर बांधण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत असे त्यांनी शेवटी सांगितले. हिंदू धर्म बांधवांनी या मंदिर बांधकामासाठी सरळ हस्ते मदत करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले दरम्यान या महादेव गडावर येऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या मंदिराच्या बांधकाम स्थळी आष्टी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिक्षण महर्षी भीमराव धोंडे,माजी आमदार साहेबराव दरेकर,आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा चेअरमन आदिनाथ सानप,अहमदनगर येथील राष्ट्रवादीचे नेते बापूसाहेब डोके,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे आणि पत्रकार संतोष सानप,सतीश बनकर,रमेश गिरी यांनी या महादेवगडावरील बांधकाम स्थळाची पाणी करून ह.भ.प.आदिनाथ महाराज आंधळे यांना शुभेच्छा दिल्या. ---------- धर्मरक्षक संभाजी महाराजांचा पराक्रमी, जाज्वल्य इतिहास जिवंत राहावा! ----------------------------- संभाजी महाराजांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून समाजप्रेम, देशप्रेम, धर्मप्रेम काय असते हे दाखवून दिले आहे कडवे धर्माभिमानी धर्मप्रेमी निष्कलंक आणि प्रचंड ज्ञानसंपन्न संभाजी महाराजांचे हे दिव्य कार्य कर्तुत्व येणाऱ्या हजारो तरुण पिढींना प्रेरणा देणारे ठरावे यासाठी या मंदिराची उभारणी होत आहे!' - ह.भ.प.आजिनाथ महाराज आंधळे ------------------------------ हिंदू धर्म रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावणारे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र आणि धर्मकार्य येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल ह.भ.प. आजिनाथ महाराज आंधळे यांनी अत्यंत परिश्रमपूर्व मंदिर उभारण्याचे पवित्र सामाजिक कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.मी त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो!' *---- माजी आ.भीमराव धोंडे* ----------------------------
धर्मभुषण महंत आदिनाथ महाराज आंधळे यांनी महादेवगड देवस्थानचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला.आपण अहमदनगर येथील जि.प.चे पदाधिकारी यांना विनंती करुन या संस्थानाला मोठा निधी मिळवून दिला आहे.संभाजी महाराज यांचे पहिले मंदिर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या प्रदेशाच्या सीमेवर होत आहे.हे कार्य कौतुकास्पद आहे.त्यांच्या या धार्मिक कार्यक्रमास सदिच्छा... -- माजी आ.साहेबराव दरेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या