Ticker

6/recent/ticker-posts

'प्रेमाचे पाखरू..' हे गीत ग्रामीण युवकांच्या हृदयाची धडकन बनेल! ------------------------------- सरकार फिल्म प्रोडक्शनच्या प्रस्तुतीचे रसिकांना आकर्षण ------------------------- निर्माता,अभिनेता मातकुळीच्या उमेश डोकेची मेहनत येणार फळाला..

उत्तम बोडखे,आष्टी. ------------- अस्सल रांगड्या ग्रामीण वास्तवाला धरून केलेला अत्यंत संयमितपणे तरुणाईच्या काळजातला ठाव घेत केलेली निर्मिती अन् अत्यंत संवेदनशील मनापासून आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातल्या मातकुळीसारख्या एका छोट्या खेड्यातून पुणे गाठत फिल्म क्षेत्रात केलेली दमदार एन्ट्री तमाम रसिक प्रेक्षकांना आवडणारे ठरू शकेल."प्रेमाचं पाखरू" हे गीत सुरुवातीलाच प्रचंड प्रेमाने नाहून गेलेल्या तरुण तरुणाईच्या ओठावर न दिसेल तरच नवल.सरकार प्रोडक्शनच्या माध्यमातून फायनली " प्रेमाचे पाखरू " हा पूर्ण व्हिडिओ सॉंग नुकताच आलेला आहे. व्हाॕट्सअप स्टेटस इंस्टाग्राम स्टेटस फेसबुक स्टेटस व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिसाद मिळतो आहे." सरकार फिल्म प्रोडक्शन "प्रस्तुत निर्माता उमेश डोके यांच्या अत्यंत परिश्रमपूर्वक आणि समाजाची वास्तविक सद्यस्थिती समोर ठेवून केलेला हा प्रयोग निश्चितच रसिक प्रेक्षकांना आवडू शकेल.यात कलाकार म्हणून कावेरी घंगाळे - डोके, उमेश डोके,सिद्धेश्वर झाडबुके, सोनाली जळगावकर,स्नेहल माजिरे,माऊली जाधव, नवनाथ खरसाडे,भारत हत्ती,शंभू मंडळ,प्रकाश राठोड, गणेश रावडे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.हर्षदा पवार सरपंच बोपगाव ,योगेशनाना फडतरे,नागेशभाऊ फडतरे,प्रकाश फडतरे आणि समस्त बोपगाव ग्रामस्थांनी यासाठी विशेष सहकार्य केले आहे.दिग्दर्शक म्हणून संतोष अवचिते तर आदित्य थोरात यांनी छायांकन केले आहे गणेश घागरे यांनी ड्रोन पायलट म्हणून तर कॅम्प असिस्टंट म्हणून श्रीकांत कांबळे तर आदित्य फिल्म स्टुडिओची संकलन आहे.आरडी इव्हेंट यांचा कॅमेरा इक्वीपमेंट आहे.करेक्शनसाठी कश्यप यांची भूमिका आहे.गीताचे गायक आकाश ढवळे तर अनुराधा गायकवाड गायक आहेत रंगभूषाची जबाबदारी स्नेहल मांजरे तर राहुल संत यांनी संगीत दिले आहे.रेकॉर्डिंग स्टुडिओ म्युझिकल राइट्स यांचा आहे.अशा अत्यंत तरुणाईच्या प्रेमाच्या जगातील वास्तवाला आपल्या मिठीत घेऊन हिरो आणि हिरोईन यांनी केलेली दिलखुलास अदाकरीतील नवरंगणात्मक शैली रसिक प्रेक्षकांना पाडल्याशिवाय राहणार नाही.एकूणच बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मातकुळी या अत्यंत छोट्या गाव वस्तीतील उमेश डोके हा निर्माता आणि अभिनेता आहे.त्यांनी घेतलेले परिश्रम, मेहनत,
कष्ट आणि या माध्यमातून त्यांनी थेट केलेला पुणे मुंबईचा प्रवास नक्कीच मायबाप प्रेक्षकांच्या सहकार्याने यशस्वी ठरू शकेल असा विश्वास करूया...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या