Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी तालुक्यातील ८ ग्रामपंचायतच्या १८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द

सन २०२१ साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागेवर निवडणुकीत निवडून आलेल्या आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मुदतीत सादर न केलेल्या आष्टी तालुक्यातील ८ ग्रामपंचायतच्या १८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी  दिपा मुधोळ मुंडे यांनी काढले आहे.यामध्ये सदस्यत्व रद्द झालेले सर्वाधिक चार सदस्य पिंपळा ग्रामपंचायतचे आहेत.आष्टी तालुक्यातील सदस्यत्व रद्द झालेल्या ग्रामपंचायत आणि सदस्याचे नावे पुढिल प्रमाणे-  धनगरवाडी पिंपळा ग्रामपंचायत  परसराम भगवान नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुरंगे पूजा राजू नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला, पिंपळा ग्रामपंचायत शेंडगे रामदास भगवान नागरिकाचा मागास प्रवर्ग, अरुण सतीश मळू  अ. जा, लोखंडे रंजना शिवाजी अ. जा महिला,  खटके सुधा विलास नागरिकांचा मागास प्रवर्ग, शेरी बु ग्रामपंचायत माळी साहेबराव राजाराम अ.ज,  गोरे स्वाती माने नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,  वटणवाडी ग्रामपंचायत गिरगुणे मंगल मोहन नागरिकाचा मागास प्रवर्ग, नरवडे सीमा दीपक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सोलापूरवाडी इरकर परमेश्वर यमाजी नागरिकांचा मागास प्रवर्ग, वायाळ कावेरी श्रीकृष्ण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,  धनगरवाडी डोईठाण ग्रामपंचायत भोसले संगीता विष्णू नागरिकांचा मागास प्रवर्ग, गिरी शांताबाई बबन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सुंबेवाडी ग्रामपंचायत शेंडगे अर्जुन धोंडीबा नागरिकाचा मागास प्रवर्ग, शेंडगे हौसाबाई अर्जुन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,हातोला ग्रामपंचायत पंडागळे सिंधू शहादेव अनुसूचित जाती जमाती महिला,  लक्ष्मी कारभारी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आठ ग्रामपंचायतमधील १८ सदस्यांचे सदस्यत्व जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणुक विभागाला मुदतीत सादर न केल्याने रद्द केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या