Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीच्या दोन सुपुत्रांचा मुंबईत सन्मान! --------- प्रा.गौतम खंडागळे व संतोष ससाणे यांना 'संविधान अमृत महोत्सव गौरव पुरस्कार' प्रदान

आष्टी (प्रतिनिधी) कला,शासकीय सेवा,सामाजिक कार्य आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या निस्वार्थ आणि उल्लेखनीय कार्याने ठसा उमटवणारे आष्टी तालुक्याचे सुपुत्र प्रा.गौतम खंडागळे आणि संतोष ससाणे यांना मुंबईत'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान अमृत महोत्सव गौरव पुरस्कार २०२६'देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.परळ (मुंबई) येथे पार पडलेल्या एका भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या दोन्ही सुपुत्रांचा गौरव करण्यात आल्याने आष्टी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.आशादीप महिला आधार मंच आणि लेक लाडकी अभियान या सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन परळ (पूर्व),मुंबई येथे करण्यात आले होते.या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ख्यातनाम गायक व शाहीर नंदेश उमप,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू अक्षय आंबेडकर,ज्येष्ठ नेत्या निर्मला सामंत-प्रभावळकर आणि संस्थेच्या अध्यक्षा आशाताई भोईर उपस्थित होत्या.या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रा.खंडागळे आणि ससाणे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील रहिवासी असलेले प्रा.गौतम खंडागळे हे कला क्षेत्रात आणि शासकीय सेवेत अत्यंत कौतुकास्पद आणि समर्पित कार्य करत आहेत.तर,धामणगावचे भूमिपुत्र असलेले संतोष ससाणे यांनी सामाजिक चळवळ आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लेखणीच्या व धडाडीच्या कार्यातून वेगळा ठसा उमटवला आहे.समाजाच्या भल्यासाठी असलेल्या त्यांच्या याच निस्वार्थ आणि विशेष उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. आपल्या अतुलनीय कार्याने आष्टी तालुक्याचे नाव राज्याच्या राजधानीत झळकावल्याबद्दल प्रा.गौतम खंडागळे आणि संतोष ससाणे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,माजी आ.बाळासाहेब आजबे, सतीशआबा शिंदे,प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,अशोक साळवे,यशवंत खंडागळे,अरुण
भैय्या निकाळजे,सरपंच परिवंत गायकवाड,सादिकभाई कुरेशी यांच्यासह आष्टी तालुक्यातील विविध क्षेत्रांतील राजकीय, सामाजिक मान्यवर आणि मित्र परिवाराने उभयतांचे अभिनंदन केले आहे. --------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या