Ticker

6/recent/ticker-posts

प्रा.बिभीषण चाटे म्हणजे भारदस्त शब्दरचना आणि सिद्धहस्त लेखणीचे धनी!

चौकट ------------- 'माणसे'जोडणारे 'व्यक्तिमत्व' ------------ 'माणसे जोडणे'हा प्रा.चाटे यांचा हुकमी गुण आहे.एकदा जवळ आलेला माणूस त्यांच्याशी कायमचा जोडला जातो,ही त्यांची सर्वात मोठी खासियत आहे.म्हणूनच बीड जिल्ह्यासह विविध क्षेत्रांत लेखन करणारे सन्माननीय पत्रकार,लेखक आणि मार्गदर्शक संपादक यांच्याशी त्यांचा स्नेह अत्यंत मधुर राहिला आहे.'सरांची लेखणी ही गुणवत्तेची खाण आहे असा सार्थ गौरव या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्लभाऊ सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला आहे. ----------------- जीवनात त्याग,कष्ट,संयम,सज्जनपणा आणि नम्रता अंगी बाळगून अत्यंत रसाळ व मधुर वाणीतून हजारो जणांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा.बिभीषण चाटे. विविध क्षेत्रांतील मित्रांच्या माध्यमातून एकोपा,चांगुलपणा,सहकार्य वृत्ती आणि सामाजिक बांधिलकीच्या प्रांजळ भावनेतून सकारात्मक विचार ठेवून त्यांचा जीवन प्रवास अत्यंत दिलखुलास राहिला आहे.पत्रकारिता,शिक्षण,संस्कृती,निवेदन अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रा.चाटे सरांच्या सामाजिक कर्तव्यभावनेचा समस्त लेखन जगताला सार्थ अभिमान वाटतो.प्रा.बिभीषण चाटे यांनी आपल्या पेशाशी अत्यंत प्रामाणिक राहून आजवर कर्तव्य निभावले आहे.'प्रत्येक माणूस समाजाचे काहीतरी देणे लागतो',या उदात्त भावनेतून जाणीव आणि संवेदना जपत त्यांनी कार्य केले.राजकीय,सामाजिक, धार्मिक, वैचारिक आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतील गुणीजनांच्या सुख-दुःखात ते नेहमीच सहभागी होतात. आपल्या सिद्धहस्त लेखणीतून आणि गोड वाणीतून त्यांनी अनेकांच्या आयुष्याला दिलेला स्पर्श नक्कीच कायम स्मरणात राहील असा विश्वास वाटतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेत गेल्या तब्बल तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी अविरत लेखन केले आहे.या प्रदीर्घ प्रवासात हजारो लेख,आर्टिकल्स आणि शोध बातम्यांच्या माध्यमातून त्यांनी फार मोठे सामाजिक कर्तव्य निभावले आहे.अनेकांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे शुभेच्छापर लेख हे ठरलेलेच असतात.'इतरांच्या सुख आणि आनंदातच आपला आनंद मानून'वाटचाल करणारे ते एक अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे.त्यांच्या या चौफेर लेखन कार्याची दखल घेत त्यांना जिल्हा,विभाग,राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.माणसे कशी जोडावीत,यात चाटे यांचा हातखंडा असून ती त्यांची खासियतच म्हणावी लागेल.लेखन आणि पत्रकारितेसोबतच निवेदनावरही त्यांची भक्कम पकड आहे.मराठी चित्रपटसृष्टी तील सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका मोठ्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी अत्यंत लीलया पेलली होती; ज्याबद्दल खुद्द मकरंदजींनीही सरांचे खुलेपणाने कौतुक केले होते. प्रा.चाटे सर म्हणजे गोड स्वभाव,भारदस्त लेखणी आणि सुसंवाद यातून साकारलेले एक अलौकिक वैभव आहे.सरांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त त्यांना दीर्घायुष्यासह सुख,समृद्धी आणि आनंद लाभो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना! प्रा.बिभीषण चाटे यांना त्यांच्या लेखणीच्या ऊर्जेसाठी आणि संवादाच्या बळकटीसाठी दैनिक झुंजारनेता परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा... --- उत्तम बोडखे,आष्टी.
-------------- चौकट --------- राजे मल्हारराव होळकर राज्य पुरस्कार,साने गुरुजी आदर्श पुरस्कार,द स्कूल एक्सप्रेस बीडचा गुणवंत शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय कमलरत्न पुरस्कार संत भगवान बाबा, संत वामनभाऊ जीवन गौरव पुरस्कार, कै. ईश्वरचंद्र गुप्ता स्मृती पुरस्कार मातृभूमी प्रतिष्ठान, बीडचा उत्कृष्ट निवेदक पुरस्कार, आष्टीचा गंगाई- बाबाजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, स्व. मोहनलालजी बियाणी विभागीय आदर्श पत्रकार पुरस्कार,मराठी पत्रकार परिषदेचा सहकार महर्षी स्व. दत्ताआबा शिंदे आपेगावकर स्मृती पुरस्कार,बीड जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी सरांच्या उत्कृष्ट लेखणीवर वेळोवेळी शिक्कामोर्तब झाले आहे. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या