Ticker

6/recent/ticker-posts

राजकारण आणि मैत्रीचा अनोखा संगम! उद्योजक अशोक गर्जे यांच्या चिरंजीवांचा विवाह थाटात संपन्न;

आष्टी (प्रतिनिधी) सुरूडी गावचे माजी सरपंच उद्योजक आणि आ. सुरेश धस यांचे खंदे समर्थक असलेले अशोक गर्जे यांचे चिरंजीव इंजि. अंकुर आणि इंजि.पूजा यांचा आज विवाह अत्यंत दिमाखात पार पडला. धामणगाव येथील खिळद फाटा येथील संत वामनभाऊ मंगल कार्यालयात झालेल्या या सोहळ्याला राजकीय,सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावत नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. शिस्तबद्ध नियोजन आणि उत्साहाचे वातावरण हे या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्टे ठरले. यावेळी आमदार सुरेश धस,महंत काशिनाथ महाराज,ह.भ.प.आजिनाथ महाराज आंधळे,ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे, समाजसेवक विजय गोल्हार, अमोलराजे तरटे, सुखलाल मुथा,संजय गाढवे,डॉ.युवराज तरटे,शेषराव गर्जे,संजय मेहेर,सुनील मेहेर, बबलू तांबोळी, माजी सभापती अंकुश चव्हाण, चेअरमन आजिनाथ सानप,एन.टी.गर्जे,माजी सभापती
आत्माराम फुंदे, अशोक पवार, एडवोकेट कवरे (उच्च न्यायालय संभाजीनगर,माजी सभापती लक्ष्मण नन्नवरे,माजी सभापती शत्रुघ्न मरकड,रावसाहेब शिरसाठ,निवृत्ती दादा गर्जे, विलास वायभासे हे उपस्थित होते. यावेळी आ.सुरेश धस यांनी अशोक गर्जे यांच्या कार्याचा आणि निष्ठेचा मुक्त कंठाने गौरव केला. नवदाम्पत्याला शुभेच्छा देताना ते म्हणाले,अशोक गर्जे हे केवळ माझे एकनिष्ठ कार्यकर्तेच नाहीत, तर राजकारणासोबतच त्यांनी उद्योग क्षेत्रातही आपली स्वतःची एक भक्कम ओळख निर्माण केली आहे. त्यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित असून, एक मुलगा व्यवसायात प्रगती करत आहे तर अंकुर सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे.ही खरोखरच अभिमानाची बाब आहे.यावेळी समाजसेवक विजय गोल्हार म्हणाले की, राजकारण आणि मैत्री या दोन वेगळ्या बाजू कशा असू शकतात,याचा प्रत्यय बीड जि.प.चे माजी अध्यक्ष विजय गोल्हार यांच्या भाषणातून आला.जुन्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, अशोक गर्जे आणि मी बालपणीचे वर्गमित्र आहोत. आमच्यात घट्ट मैत्री असली तरी, राजकारणाच्या आखाड्यात अशोक हा नेहमीच आ. सुरेश धस यांच्या पाठीशी निष्ठेने उभा राहिला आहे. त्यांच्या या विधानाने गर्जे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक वेगळेच पैलू उपस्थितांसमोर उलगडले.या दिग्गजांच्या या कौतुकाने भारावून गेलेले वर पिता अशोक गर्जे उपस्थितांचे आभार मानताना भावूक झाले होते. कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले, माझ्या आजवरच्या जीवनाच्या जडणघडणीत आष्टी तालुक्यातील अनेक लोकांचे मोलाचे योगदान आहे.आ. सुरेश धस यांची मला कायम भक्कम साथ लाभली. त्यांच्याकडून वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच आम्ही आज इथपर्यंतची मजल मारू शकलो आहोत असे सांगीतले. या विवाह सोहळ्याला आष्टी तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, आध्यात्मिक क्षेत्रातील महाराज मंडळी,विविध गावचे सरपंच, उपसरपंच,संस्थांचे पदाधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आलेल्या सर्व पाहुण्यांचे अशोक गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने यथोचित स्वागत करून आभार मानण्यात आले. एका निष्ठावान कार्यकर्त्याच्या घरच्या या देखण्या सोहळ्याची संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा आहे. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या