
आष्टी (प्रतिनिधी)
बीड येथील एका दैनिकाच्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय 'समाजरत्न' पुरस्कार आष्टी तालुक्यातील क-हेवडगावचे सरपंच,कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि युवा उद्योगपती परिवंत उत्तमराव गायकवाड यांना नुकताच प्रदान करण्यात आला.जागतिक विक्रमवीर आणि सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांच्या शुभहस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.गायकवाड यांच्या या यशामुळे केवळ
क-हेवडगावचीच नव्हे तर संपूर्ण आष्टी तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक आणि आरोग्य क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून सातत्यपूर्ण आणि प्रभावी कार्य करणाऱ्या समाजसेवकांना हा पुरस्कार दिला जातो.परिवंत गायकवाड यांनी 'सेवा हीच श्रद्धा' हा विचार अंगीकारून समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी केलेले काम या पुरस्कारासाठी निर्णायक ठरले.
आरोग्य आणि
संकटातील 'देवदूत'
---------------
कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात जेव्हा सर्वत्र भीतीचे वातावरण होते,तेव्हा गायकवाड यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना किराणा किट मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले.आरोग्य क्षेत्रात त्यांनी विशेष लक्ष घालत भव्य नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करून मोफत चष्मे वाटप केले.एवढेच नव्हे,तर नेत्रशस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांना स्वखर्चाने पुणे,अहिल्यानगर आणि मुंबई येथे पाठवून त्यांच्या प्रवासाची व निवासाची संपूर्ण सोय केली.रक्तदान शिबिरे,आरोग्य तपासणी,गोरगरिबांना आर्थिक मदत हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे.गावातील विविध उत्सव, महापुरुषांच्या जयंती,सामाजिक उपक्रम आणि हरिनाम सप्ताह यामध्ये पुढाकार घेऊन त्यांनी महापंगत व अन्नदानाची परंपरा जपली आहे.शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे कामही ते सातत्याने करत आहेत.प्रत्येक सण- उत्सवात ते जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात.आ.सुरेश धस यांचे गेल्या २५ वर्षांपासूनचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे. राजकारणापलीकडे जाऊन जनहिताला प्राधान्य देणारा नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.सरपंच
परिवंत गायकवाड यांना यापूर्वी 'महाराष्ट्र भूषण','आदर्श सरपंच' आणि 'गंगाई-बाबाजी आदर्श सरपंच'यांसारख्या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे नव्याने समाजकार्यात येऊ पाहणाऱ्या तरुणांना मोठी प्रेरणा मिळत आहे.राज्यस्तरीय 'समाजरत्न' पुरस्कार मिळाल्याबद्दल आ.सुरेश धस,माजी सभापती अरुण भैय्या निकाळजे,कड्याचे माजी सरपंच रामशेठ मधुरकर,माजी नगरसेवक सादिक कुरेशी,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मिलिंद निकाळजे,प्रवीण डोंगरे, माजी नगरसेवक दीपक निकाळजे,नाट्यकलावंत व दिग्दर्शक रुपेश निकाळजे,राजेंद्र बोरुडे,सोमीनाथ विधाते,दिलीप राऊत,अण्णा साबळे यांच्यासह सर्व स्तरांतील मान्यवरांनी आणि मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.गायकवाड यांच्या हातून असेच विधायक कार्य निरंतर घडत राहो आणि एका सक्षम राष्ट्राच्या उभारणीत त्यांचे योगदान असेच भक्कम राहो अशी भावना याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली.
-----------------
0 टिप्पण्या