Ticker

6/recent/ticker-posts

महेश सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. अजयदादा धोंडे; तर व्हाईस चेअरमनपदी दादासाहेब जगताप यांची अविरोध निवड

आष्टी (प्रतिनिधी) महेश सहकारी साखर कारखान्याच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीकडे संपूर्ण परिसराचे लागून असलेले लक्ष अखेर संपले आहे.महेश सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. अजयदादा भीमराव धोंडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी पाटणचे सरपंच दादासाहेब जगताप यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.या महत्त्वपूर्ण निवडीमुळे राजकीय आणि सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाची नूतन पदाधिकारी निवडण्यासाठी नुकतीच एक विशेष बैठक पार पडली. निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून छत्रपती संभाजीनगरचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) भारती ठाकूर तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अहिल्यानगरचे सहायक निबंधक बाळकृष्ण शिंदे यांचनी काम पाहिले.या बैठकीत चेअरमनपदासाठी डॉ.अजयदादा भीमराव धोंडे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यांच्या उत्तम कार्याची आणि नेतृत्वाची दखल घेत सर्व संचालकांनी या प्रस्तावाला एकमुखी पाठिंबा दिला.त्याचबरोबर व्हाईस चेअरमनपदासाठी पाटणचे सरपंच दादासाहेब जगताप यांच्या नावावरही सर्वांनी सहमती दर्शवली.दोन्ही प्रमुख पदांसाठी इतर कोणताही अर्ज न आल्याने या दोन्ही निवडी अविरोध आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.महेश सहकारी साखर कारखाने हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मुख्य कणा मानला जातात.महेश सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.डॉ.अजयदादा धोंडे यांचा दांडगा जनसंपर्क,दूरदृष्टी आणि दादासाहेब जगताप यांचा सरपंच म्हणून असलेला प्रशासकीय व गावपातळीवरील अनुभव कारखान्याच्या पुढील वाटचालीस अत्यंत फायदेशीर ठरेल.नूतन नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीचे नवे शिखर गाठेल आणि शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल असा दृढ विश्वास सभासद आणि शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे.या अविरोध निवडीची अधिकृत घोषणा होताच कारखान्याच्या आवारात आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. समर्थकांनी गुलालाची उधळण करत आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला.या यशाबद्दल नूतन चेअरमन डॉ.अजयदादा धोंडे आणि व्हाईस चेअरमन दादासाहेब जगताप यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,राजकीय नेते,कारखान्याचे सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. यावेळी सूत्रसंचालन शिवाजी थोरवे तर उपस्थिताचे आभार जेष्ठ संचालक नियामत बेग यांनी मानले. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या