आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यासाठी संयुक्त जयंती महोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध,महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मंगळवार दि.५ मे २०२६ रोजी गावात विविध प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
या भव्य सोहळ्याची सुरुवात मंगळवारी सकाळी १० वाजता निळध्वजारोहणाने होणार आहे.त्यानंतर दुपारी ४ वाजता महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता सर्व उपस्थित नागरिकांसाठी आणि समाज बांधवांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.या संयुक्त जयंती उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे रात्री ८ वाजता आयोजित करण्यात आलेला प्रबोधनात्मक कार्यक्रम.प्रसिद्ध टीव्ही स्टार शीतल साठे आणि सचिन माळी यांचा'शाहिरी जलसा'यावेळी संपन्न होणार आहे. या माध्यमातून शाहिरी परंपरेतून महापुरुषांचे विचार आणि कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहेत.या शानदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बहुजनांचे नेते माजी आ.भीमराव धोंडे हे भूषविणार आहेत.प्रमुख पाव्हुणे म्हणून पप्पु कागदे,आ.सुरेश धस,माजी आ.साहेबराव दरेकर,माजी आ. बाळासाहेब आजबे,सतीशआबा शिंदे,विजय गोल्हार,सरपंच संदीप मार्कंडे,साहेबराव मस्के,रमेश गावडे,सरपंच गायकवाड,दत्तू पवणे,माजी सरपंच बिट्टू पोपळे,मुरलीअण्णा पाचे,बंकटसिंग परदेशी
आदि मान्यवर
राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास लाभणार आहे.
या संयुक्त जयंती महोत्सवाचे अत्यंत नेटके संयोजन रिपाइंचे नेते अशोकभाऊ साळवे यांनी केले आहे.देवीनिमगाव येथील ग्रामस्थांनी या उत्सवासाठी मोठा सहभाग दर्शविला आहे. परिसरातील सर्व नागरिकांनी,माता-भगिनींनी व तरुणांनी या सर्व कार्यक्रमांना सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून महापुरुषांना अभिवादन करावे,असे आवाहन आयोजक व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


-----------------
0 टिप्पण्या