Ticker

6/recent/ticker-posts

जिथे देवाची भूमी,तिथे सुविधा पुरवा; राजकीय नेतृत्वाला कोणताही धोका नाही --- ह.भ.प.लक्ष्मण महाराज पाटील ----------------- "त्या" गुन्हेगारासाठी येवढा खर्च करुन वेळ वाया न घालवता गोळ्या घालुनच संपवले पाहीजे ---- आळंदीचे ह.भ.प. लक्ष्मण पाटील महाराजांचे कीर्तनात आक्रमक विधान

आष्टी (प्रतिनिधी) वारकरी संप्रदाय हा मानवी जीवनाला मौलिक तत्त्वे आणि चांगुलपणाची दिशा देणारा अलौकिक विचार आहे.जिथे जिथे देवाची अर्थात संतांची भूमी आहे,तिथे राजकीय नेतृत्वाने सोयीसुविधा पुरवाव्यात असे केल्यास तुम्हाला कधीही धोका निर्माण होणार नाही असे परखड आणि मार्गदर्शक विचार सांगत अशा भोंदू खरात बाबाला भर चौकात उभे करून गोळ्या घालून ठार मारले पाहिजे:हीच त्याच्या या नीच कृत्यांची योग्य शिक्षा ठरेल."त्या" गुन्हेगारासाठी येवढा खर्च करुन वेळ वाया न घालवता गोळ्या घालुन संपवले पाहीजे असे परखड मत आळंदीचे प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प.लक्ष्मण महाराज पाटील यांनी व्यक्त केले. आष्टी तालुक्यातील कासारी येथे संत शिवस्वरूप बन महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवमहापुराण कथेची बुधवारी दि. १५ एप्रिल रोजी काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. यावेळी अण्णासाहेब चौधरी,सतीशआबा शिंदे,सरपंच श्याम धस, अमोलराजे तरटे,चेअरमन शांतीलाल भोसले,अशोक पोकळे,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,सरपंच शालन अशोक मुळे,माजी सरपंच अदिकाताई लोखंडे,मोहन घुले,दत्ताभाऊ सायकड,मनोज धनवडे, सचिन वारंगुळे,कपिल अग्रवाल, शरद रेडेकर,शरद गर्जे,ह.भ.प.संतोष महाराज मोरे,ह.भ.प.श्रीहरी पुरी महाराज,ह.भ.प.ब्रह्मचैतन्य तावरे महाराज,ज्ञानदेव जगताप महाराज,ह.भ.प.उत्तम पोकळे, होसराव आजबे,तुकाराम भोसले,अशोक काकडे,अशोक काकडे, बाळकृष्ण राऊत,मच्छिंद्र गाडे,भाऊसाहेब जाधव, मुरलीधर सुळे,दत्तात्रय खाडे,किशोर बोराडे,दिलीप गिरी, रामदास बन,जालिंदर सोमासे,सूर्यभान बन,भागवत गिरी, रामनाथ बन,सापते आबा,राजेंद्र धुमाळ,रामदास घनवट, नवीनसेठ कासवा,उमेश बन आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित हजारो भाविकांना मार्गदर्शन करताना ह.भ.प.पाटील महाराज यांनी अनेक संत महात्म्यांचे दृष्टांत देत उपस्थितांना प्रबोधन केले.संतांचे विचार मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगून ते म्हणाले की, "इस्कॉनसारख्या शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या संप्रदायाने अल्पावधीत जागतिक स्तरावर प्रचंड प्रगती केली आहे. त्याच धर्तीवर हजारो वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या आपल्या वारकरी संप्रदायानेही आता कात टाकून उच्च स्तरावर अधिक व्यापक प्रगती साधण्याची गरज आहे.या अनुषंगाने त्यांनी विविध धार्मिक ग्रंथांतील दाखले देत संतभूमीचे महत्त्व अधोरेखित केले. भोंदू खरात महाराजांपेक्षा त्याच्याकडे जाणारे लोक महामूर्ख; "त्या" गुन्हेगारासाठी येवढा खर्च करुन वेळ वाया न घालवता गोळ्या घालुनच संपवले पाहीजे --- ह.भ.प.पाटील महाराजांचा तीव्र संताप -------------- "त्या" भोंदू बाबाला भर चौकात गोळ्या घालून ठार मारले पाहिजे असे ह.भ.प. पाटील महाराज यांनी खळबळजनक आणि आक्रमक विधान केले आहे.सध्या सर्वत्र चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरलेल्या 'भोंदू खरात महाराज' प्रकरणावर आता प्रबोधनकार आणि कीर्तनकारांमधूनही अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.समाजातील अज्ञानाचा आणि श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या या भोंदू बाबाच्या कृत्यांवर कडाडून टीका करताना ह.भ.प.पाटील महाराज यांनी अत्यंत परखड शब्दांत आपले मत व्यक्त केले आहे. "भोंदू खरात महाराज याच्यापेक्षा त्याच्या नादी लागून तिथे जाणारे लोकच महामूर्ख आहेत," अशा शब्दांत त्यांनी अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या लोकांचे वाभाडे काढले.सध्या सुरू असलेल्या या ज्वलंत विषयावर बोलताना पाटील महाराज यांचा संताप अनावर झाला होता.भोंदू बाबांच्या वाढत्या सुळसुळाटावर आणि त्याला बळी पडणाऱ्या समाजावर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.समाजातील अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कायद्याचा धाक असणे आवश्यक आहेच,परंतु अशा गुन्हेगारांना मिळणारी शिक्षा समाजासाठी एक धडा असली पाहिजे,अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.या भोंदू बाबाच्या कृत्यांचा समाचार घेताना पाटील महाराजांनी एक अत्यंत आक्रमक आणि खळबळजनक भूमिका मांडली.ते म्हणाले की,अशा भोंदू आणि खरात बाबाला भर चौकात उभे करून गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. हीच त्याच्या या नीच कृत्यांची खऱ्या अर्थाने योग्य शिक्षा ठरेल." त्या " गुन्हेगारासाठी येवढा खर्च करुन वेळ वाया न घालवता गोळ्या घालुनच संपवले पाहीजे अशा ह.भ.प.पाटील महाराजांच्या या आक्रमक विधानामुळे सध्या मोठी चर्चा सुरू झाली आहे.एकीकडे समाजातील काही लोक अशा भोंदूगिरीला बळी पडत असताना,प्रबोधन करणाऱ्या महाराजांकडून अशा कडक शब्दांत संताप व्यक्त होणे, हे सामान्य जनतेच्या मनातील खदखद दर्शवणारे आहे. पाटील महाराजांच्या या स्पष्ट आणि रोखठोक भूमिकेमुळे अंधश्रद्धा आणि अशा भोंदू बाबांचे स्तोम हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून,आता या प्रकरणात प्रशासन काय कठोर पावले उचलते,याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कासारी येथील या सप्ताहात गेल्या आठवडाभरापासून विविध धार्मिक उपक्रम राबविले गेले.आज बुधवारी झालेल्या काल्याच्या कीर्तनासाठी आष्टी शहरासह तालुक्यातील विविध गावे आणि वाड्या-वस्त्यांवरील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.यात ज्येष्ठ नागरिक,महिला भगिनी,भजनी मंडळे, मृदंगाचार्य आणि गायक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सोहळ्यास परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. चौकट ---------- कासारीत दरवळला अध्यात्माचा सुगंध! ---------- संत शिवस्वरूप बन महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकारांची अभ्यासपूर्ण व रसाळ कीर्तने संपन्न झाली.या ज्ञानयज्ञाला भाविकांनी उदंड प्रतिसाद दिला.काल्याच्या कीर्तनानिमित्त जमलेल्या अलोट गर्दीमुळे आणि टाळ-मृदंगाच्या गजरामुळे कासारी नगरीत अक्षरशः अध्यात्माचा आणि भक्तीचा सुगंध दरवळल्याची प्रचिती येत होती. ----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या