Ticker

6/recent/ticker-posts

अध्यात्म,शिक्षण आणि प्रसारमाध्यमांचा त्रिवेणी संगम ........... ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक महंत नामदेव शास्त्री यांची सदिच्छा भेट आणि सत्कार

अहिल्यानगर (प्रतिनिधी) वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख ऊर्जाकेंद्र आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भगवानगड येथील विद्यमान महंत आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प.नामदेव शास्त्री महाराज यांची नुकतीच राज्याचे प्रथितयश शिक्षक नेते गो.बा.सायकड आणि'दैनिक झुंजार नेता'चे उपसंपादक उत्तम बोडखे यांनी सदिच्छा भेट घेतली.या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सात्विक भेटीदरम्यान या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते महंत नामदेव शास्त्री यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.समाजाला योग्य दिशा देण्याचे काम अध्यात्म,शिक्षण आणि पत्रकारिता करत असते.त्यामुळे या तीनही क्षेत्रांतील प्रतिनिधींची ही भेट एक अतिशय सकारात्मक घटना मानली जात आहे. महंत नामदेव शास्त्री महाराज हे केवळ भगवानगडाचे अधिपतीच नाहीत,तर ते 'ज्ञानेश्वरी'चे एक सखोल आणि चिंतनशील अभ्यासक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित आहेत.त्यांच्या रसाळ वाणीतून आणि अभ्यासपूर्ण विवेचनातून संत ज्ञानेश्वरांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य ते करत आहेत.त्यांच्या याच निस्वार्थ ज्ञानदानाविषयी आणि आध्यात्मिक कार्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी या सदिच्छा भेटीचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय ------------------ या सदिच्छा भेटीप्रसंगी शिक्षक नेते गो.बा.सायकड यांनी शैक्षणिक क्षेत्रातील मूल्यशिक्षणाचे महत्त्व आणि महाराजांच्या विचारांची आजच्या विद्यार्थी वर्गाला असलेली गरज यावर संवाद साधला.तर,'दैनिक झुंजारनेता' या लोकप्रिय वृत्तपत्राचे उपसंपादक उत्तम बोडखे यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समाजातील चांगल्या प्रवृत्तींना आणि संत विचारांना कशी चालना देता येईल, याबाबत चर्चा केली.यावेळी बोलताना गो.बा.सायकड आणि उत्तम बोडखे यांनी व्यक्त केले की, "महंत नामदेव शास्त्री यांच्यासारख्या ज्ञानतपस्वी व्यक्तिमत्त्वाचा सत्कार करण्याची संधी मिळणे,हे आम्ही आमचे भाग्य समजतो.त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाला नक्कीच एक नवी ऊर्जा मिळत राहील.खेळीमेळीच्या आणि प्रबोधनात्मक वातावरणात पार पडलेल्या या भेटीने बोडखे,सायकड यांना आनंद वाटला आणि वातावरणात एक वेगळेच चैतन्य निर्माण केले होते.समाजाच्या उभारणीत संत,शिक्षक आणि पत्रकार या तिन्हींची भूमिका किती महत्त्वाची आहे,याचाच एक उत्तम संदेश या भेटीतून राज्याला मिळाला आहे. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या