आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र कासारी येथे संत शिवस्वरूप बन महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शिव महापुराण कथा,अखंड हरिनाम सप्ताहाससुरू झाला आहे.
कासारी येथे आज ज्ञानेश्वरी कंठस्थ,भागवताचार्य, रामायणाचार्य ह.भ.प.भागवत महाराज बादाडे यांचे कीर्तन होणार आहे.दि.८ ते १५ एप्रिल या कालावधीमध्ये शिवमहापुराण कथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहात ह.भ.प.शिवाजी महाराज जगताप,ह.भ.प.अमित महाराज धाडगे यांचे हरी किर्तन झाले आहे.आज शुक्रवारी रात्री ह.भ.प.भागवत महाराज बादाडे यांचे हरिकीर्तन होणार आहे.उद्या शनिवारी ह.भ.प.अक्षय महाराज पिंगळे,ह.भ.प.शंतनूमहाराज गिरी,ह.भ.प.महादेव महाराज गिरी,ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कोठुळे यांचे हरिकीर्तन होणार आहे.कीर्तन साथ संगत मृदंगाचार्य म्हणून योगेश महाराज क्षीरसागर (पांचाळ) परशुराम महाराज डोंगरे हे उपस्थित राहणार आहेत.गायनाचार्य शुभम महाराज घेवरे,भागवत महाराज नरवडे,दत्ता खाडे,रविंद्र तवले,भाऊसाहेब जाधव,किशोर भोराडे,अशोक काकडे,भोसले महाराज, नाना भोगाडे व परिसरातील गायक मंडळी उपस्थित राहणार आहे. रविवार दि.१२ एप्रिल रोजी रात्री ११ ते १ या वेळात प्रसिद्ध भारुडकार ह.भ.प.विष्णू महाराज बांडे (गेवराई) यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.या सप्ताहामध्ये ह.भ.प.आदिनाथ महाराज गिरी (गोंदीकर) यांची सुश्राव्य शिव महापुराण कथा दररोज दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळात होणार आहे.बुधवार दि.१५ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये ह.भ.प.लक्ष्मण महाराज पाटील (आळंदी) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.कीर्तनानंतर महाप्रसाद वाटप केला जाणार आहे.
ह.भ.प.श्रीहरी पुरी महाराज,ह.भ.प.आदिनाथ महाराज दानवें,ह.भ.प.संतोष महाराज मोरे,सुदर्शन मुनी महाराज यांच्या हस्ते कलश पूजन झाले.ह.भ.प.ब्रह्मचैतन्य महाराज तावरे,ह.भ.प.परसराम महाराज बन,ह.भ.प.ज्ञानदेव महाराज जगताप हे व्यासपीठ चालक म्हणून काम पाहणार आहेत.दि.१४ एप्रिल रोजी दिंडी प्रदक्षिणा व पादुका मिरवणुक होणार आहे.काल्याचे किर्तन प्रसंगी आ.सुरेश धस,माजी आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,देविदास आबा धस,सतीशआबा शिंदे,सरपंच सौ.शालन अशोक मुळे,उपसरपंच डॉ.जालिंदर वांढरे आदि राजकीय,

सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.परिसरातील भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संत शिवस्वरुप बन महाराज सप्ताह समिती,तरुण मंडळ आणि ग्रामस्थांनी केले आहे.
------------------
0 टिप्पण्या