Ticker

6/recent/ticker-posts

बीड जिल्हा शिक्षण संस्था महामंडळाची १२ एप्रिल रोजी महत्त्वपूर्ण बैठक ..... ॲड.हनुमंत थोरवे

आष्टी (प्रतिनिधी) जिल्ह्यातील शिक्षण संस्था आणि शाळांसमोर सध्या अनेक प्रशासकीय व आर्थिक प्रश्न उभे आहेत.या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी 'बीड जिल्हा शिक्षण संस्था महामंडळा 'ची एक अत्यंत महत्त्वाची बैठक येत्या १२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक रविवारी दि.१२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता बीड येथील 'द.बा.घुमरे पब्लिक स्कूल' येथे पार पडणार आहे अशी माहिती संघटनेचे कोषाध्यक्ष ॲड.हनुमंत थोरवे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. सध्या शिक्षण क्षेत्रात अनेक बदल आणि आव्हाने निर्माण झाली आहेत.या बैठकीत प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा आणि विचारविनिमय केला जाणार आहे.विनाअनुदानित शाळा आणि त्यांच्या तुकड्या बंद करण्याबाबतच्या मुद्द्यांवर गांभीर्याने चर्चा करून संस्थांची भूमिका निश्चित केली जाईल.शाळांचा डोलारा सांभाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली लिपिक आणि शिपाई,सेवक भरती रखडली आहे. संस्थेमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भरतीला शासन विरोधी भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.या त्यांच्या भूमिकेला संस्थाचालकांचा विरोधक आहे.या भरती प्रक्रियेबाबत पुढील दिशा ठरवली जाईल.आगामी परीक्षांच्या काळात कॉपीमुक्त अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची योग्य ती तपासणी कशी करावी आणि त्यासाठीच्या उपाययोजना यावर चर्चा होईल.शाळांच्या दैनंदिन खर्चासाठी आवश्यक असलेल्या 'नॉन-सॅलरी' अनुदानाच्या प्रलंबित प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी रणनीती आखली जाईल. वरील सर्व विषय हे संस्थाचालक आणि विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत.प्रशासकीय पातळीवर या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वांची एकजूट असणे काळाची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सन्माननीय संस्थाचालकांनी या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी वेळेवर आणि आवर्जून उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन संघटनेचे पदाधिकारी दीपक घुमरे, सुशीलाताई मोराळे,
उत्तम पवार,ॲड.हनुमंत थोरवे आणि महादेव काळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या