छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)
समाजातील अनेकांच्या दुःखावर फुंकर घालत आणि त्यांच्या सुख- आनंदात समरस होत एक कौटुंबिक जिव्हाळा निर्माण करणारे ज्येष्ठ पत्रकार,लेखक तथा 'दैनिक झुंजारनेता'चे उपसंपादक उत्तम बोडखे यांनी नुकतीच येथील रामकृष्ण हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी हॉस्पिटलच्या वतीने त्यांचा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.बबीताताई बोडखे यांचा सन्मान करण्यात आला."शब्दप्रभूंची ही सदिच्छा भेट आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा क्षण आहे," अशा भावपूर्ण शब्दांत रामकृष्ण हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.संदीप हंबर्डे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मूळचे आष्टी येथील असलेले डॉ.संदीप हंबर्डे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात वैद्यकीय क्षेत्रात आपल्या उत्तम सेवेच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कर्तृत्वाला शाबासकीची थाप देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी आवर्जून ही सदिच्छा भेट दिली.
या विशेष भेटीदरम्यान या दोन्ही 'भूमिपुत्रां' मध्ये मनमोकळा आणि उत्तम संवाद रंगला.जुन्या आठवणी आणि सामाजिक विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.याप्रसंगी रामकृष्ण हॉस्पिटलच्या वतीने डॉ.हंबर्डे पाटील यांनी पत्रकार बोडखे आणि सौ.बबीताताई बोडखे यांचे मनःपूर्वक स्वागत करून यथोचित सत्कार केला.
चौकट
--------
छत्रपती संभाजीनगर येथील रामकृष्ण हॉस्पिटलचे संचालक डॉ.संदीप रामकृष्ण हंबर्डे पाटील आणि डॉ. सौ.अश्विनी संदीप हंबर्डे पाटील यांच्या या रुग्णालयास बोडखे दाम्पत्याने ही सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांच्या समवेत अहिल्यानगर येथील स्वामी समर्थ हॉटेलचे संचालक अर्जुन बोडखे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुमन अर्जुन बोडखे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा स्नेहभेटीचा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या आणि जिव्हाळ्याच्या वातावरणात पार पडला.
------------------

0 टिप्पण्या