Ticker

6/recent/ticker-posts

सालबर्डी ': रहस्यमय मराठी चित्रपटात बीड जिल्ह्याच्या बालकलावंताचा अभिनय --------------------------------- हेळंब येथील भूमिपुत्र अद्वैत आंधळे ची भूमिका हृदयाला भिडणारी ठरणार ------------------------------- १७ एप्रिलला महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

आष्टी (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील घडलेल्या वास्तव घटनेच्या स्थितीवर अत्यंत वेधक प्रकाश टाकत अत्यंत दमदार कलावंतांच्या माध्यमातून मराठी चित्रपटातून रसिक प्रेक्षकांना एका वेगळ्या अध्यायाची वास्तव कहानी समोर ठेवत.थेट हृदयाला भिडणारी चित्रपट निर्मिती'सालबर्डी'च्या माध्यमातून झाली असून; तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांना १७ एप्रिला याची प्रचिती येणार आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी सिनेकलावंतांच्या कलाकृतीतून साकार झालेल्या या'सालबर्डी' चित्रपटात अद्वैत आंधळे, वेदांत चौधरी यासारख्या बाल कलावंतांच्या अत्यंत भावनिक आणि हृदयाला भिडणाऱ्या भूमिके चे रसिक प्रेषक प्रचंड स्वागत करतील अशी अपेक्षा लागुन राहीली आहे.पुणे येथील बाल कलावंतांच्या मालिकेत एक वेगळे स्थान निर्माण केलेला आणि नैसर्गिकच कलावंतांचे गुण अंगभूत असलेला केवळ आठ वर्षांच्या तिसरीत शिकणाऱ्या मुळच्या बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील हेळम येथील अद्वैत आत्माराम आंधळे यांने साकारलेली भूमिका अंगावर रोमांच उभे करणारी आहे! भूमिकेतील प्रचंड गंभीरपणा,त्यातील वास्तविकपणा आणि समरस होऊन साकारलेली भूमिका बालकलावंतांची परीक्षा करणारी आहे. ही भूमिका तितक्याच सहजतेने अद्वैत आंधळे याने मोठ्या जिद्दीने साकारलेली आहे तर वेदांत चौधरी या बाल कलावंताने त्याला दिलेल्या भूमिकेचे अक्षरशः सोने केले.आपल्या भूमिकेला न्याय देताना त्याने सांभाळलेली जबाबदारी.दिग्दर्शक यांनी केलेल्या सूचना..यातून मोठ्या कौशल्याने आणि आत्मीयतेने पार पाडलेला हुबेहूब रोल त्यांच्या अंतर्मनातील कलाकृतीला अधोरेखित करणारा आहे.यावर १७ एप्रिल ला शिक्का मुहूर्त होईल ही खात्री वाटते. ‘सालबर्डी’या आगामी रहस्यमय मराठी चित्रपटातून पूजा सावंत,शशांक शेंडे,ओंकार भोजने,भारत गणेशपुरे,अंशुमन विचारे,रोहित कोकाटे,कमलाकर सातपुते,चित्तरंजन गिरी,अनिल नगरकर,माधव अभ्यंकर,प्रवीण डाळिंबकर,अभय गिते,राजेंद्र सातार्डेकर,कोमल चौधरी यांची दमदार फळी एकत्र येत आहे.गुल्हर,बाबो,पाणीपुरी यासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी‘सालबर्डी’ हा मल्टीस्टारर रहस्यमय थरारपट रसिकांसाठी आणला आहे.या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील,डॉ.गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली आहे.चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे.पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून,गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे.पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे.अजय गोगावले,जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत.नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे.कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून,वेशभूषा प्रणिता चिंदगे,रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे. चौकट -------- 'सालबर्डी'या रहस्यमय,वास्तव थरारक घटनांचा शोध घेणाऱ्या चित्रपटात नामवंत कलावंत आहेत.यात मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील मूळ भूमिपुत्र असलेल्या आणि पुणे स्थित प्रा.डॉ.आत्माराम आंधळे आणि कृषी विस्तार अधिकारी शकुंतला आंधळे-चाटे यांचा मुलगा बाल कलावंत अद्वैत याची भूमिका अस्वस्थ करणाऱ्या घटनेतील गंभीरता अधिक वाढवणारी आणि वास्तवाचे भान अधोरेखित करणारी आहे.बाल कलावंतांच्या भूमिकेची परीक्षा घेणारी आहे. मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील या बाल कलावंतांच्या भूमिकेचा'सालबर्डी'रहस्यमय मराठी चित्रपट पाहण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे!'दरम्यान,बालकलावंत अद्वैत आंधळेचे डॉ.आशा फड यांनी अभिनंदन केले आहे. ----- प्रा.बिभिषण चाटे (निवेदक,वृत्तपत्र लेखक) ---------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या