Ticker

6/recent/ticker-posts

नगर अभियंता मिर्झा अथहर बेग पवित्र हज यात्रेसाठी रवाना --------------- आष्टीत मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा..

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील नगरपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष नगर अभियंता मिर्झा अथहर इनायतुल्ला बेग हे इस्लाम धर्मातील पवित्र अशा 'हज' यात्रेसाठी काल मार्गस्थ झाले.
त्यांच्या या पवित्र प्रवासासाठी शहरातील राजकीय, सामाजिक,पत्रकारिता आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.पुढील सुमारे ४५ दिवसांच्या या यात्रेदरम्यान मिर्झा अथहर बेग हे इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र तीर्थस्थळे असलेल्या मक्का आणि मदीना येथे जाऊन आपले धार्मिक विधी पार पाडणार आहेत.हज यात्रा ही इस्लाम धर्मातील पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा स्तंभ मानली जाते.शारीरिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लिम बांधवाने आयुष्यात किमान एकदा हज करणे आवश्यक मानले जाते.इस्लामी दिनदर्शिकेनुसार 'जिलहज्ज' महिन्यात ही यात्रा पार पडते.या यात्रेमध्ये एहराम धारण करणे,पवित्र काबाची प्रदक्षिणा (तवाफ),सफा आणि मरवा टेकड्या दरम्यान 'सई' करणे,अराफात पर्वतावर प्रार्थना करणे,मुजदलिफा येथील मुक्काम,जमरात ब्रिजवर प्रतीकात्मक खडे मारणे (रमी जमारात),कुर्बानी देणे आणि मुंडण करणे यांसारखे विविध कठीण आणि महत्त्वपूर्ण धार्मिक विधी पार पाडले जातात.हज यात्रेमुळे आत्मशुद्धीची भावना दृढ होते, तसेच संयम,शिस्त,समानता आणि अल्लाहप्रती भक्ती वाढीस लागते अशी धारणा आहे. अथहर बेग यांच्या या पवित्र प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी आष्टीचे नगराध्यक्ष जिया बेग,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,माऊली जरांगे,गणेश शिंदे, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे,नगरसेवक सुरेश वारंगुळे,इर्शान खान,अक्षय धोंडे,भारत मुरकुटे,बाळासाहेब घोडके,ज्ञानदेव राऊत,पत्रकार सचिन रानडे,प्रविण पोकळे,समीर शेख,डॉ.सिद्दीक बेग,इंजि.गहिनीनाथ शिरसाट,लेखापाल जीवन साठे,सोमनाथ साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी बेग यांना त्यांच्या सुखकर यात्रेसाठी आणि पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या