Ticker

6/recent/ticker-posts

पारगाव जो.येथे 'आपना परिवार' कार्यालयाचा शुभारंभ; 'बोलणारी भगवद्गीता' ठरतेय आकर्षणाचे केंद्र! ----------------- खा.निलेश लंके यांच्यासह आजी-माजी आमदारांसह अनेकांच्या सदिच्छा भेटी; तरुणांना स्वावलंबी आणि संस्कारक्षम बनवण्याचा संकल्प

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील पारगाव जो.येथे सामाजिक कार्यकर्ते सावळेराम बळे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या 'सेफ शॉप "आपना परिवार" या नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमाच्या कार्यालयाचा नुकताच दिमाखदार शुभारंभ झाला. या कार्यालयात ठेवण्यात आलेले आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 'बोलणारी भगवद्गीता','हनुमान चालीसा'आणि'रामायण'हे ग्रंथ सध्या संपूर्ण पंचक्रोशीत कुतूहलाचे आणि आकर्षणाचे केंद्र बनले असून पाहणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. खा.निलेश लंके यांची भेट आणि कौतुक -------------- अहिल्यानगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांनी ५ मार्च रोजी या कार्यालयाला विशेष सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी'बोलणारी भगवद्गीता' व इतर ग्रंथ स्वतः हाताळून पाहिले. या अभिनव उपक्रमाचे भरभरून कौतुक करताना खा.लंके म्हणाले,"भगवद्गीतेसारखा प्रेरणादायी ग्रंथ आजच्या काळात प्रत्येक घरात पोहोचला पाहिजे.या चांगल्या उपक्रमासाठी माझ्या माध्यमातून शक्य तेवढे सर्वतोपरी सहकार्य करण्याचा मी नक्की प्रयत्न करीन."यावेळी त्यांनी व्यवस्थापन प्रमुख सावळेराम आबा बळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.या कार्यालयाचे रीतसर उद्घाटन सेवानिवृत्त ज्युनिअर कमिशनर आर्मी ऑफिसर सुनील परदेशी (गुरुजी),सौ.संगीता परदेशी, कांतीलाल परदेशी,कुणाल परदेशी,रोशनी पाटील आणि माजी जि.प.सदस्य देविदास आबा धस यांच्या शुभहस्ते पार पडले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सावळेराम बळे यांनी केले.या अभिनव उपक्रमाला पाठबळ देण्यासाठी अनेक राजकीय,सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी भेटी दिल्या आहेत.यामध्ये आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,पोलीस निरीक्षक शरद भुतेकर,नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर,मंडळ अधिकारी,तलाठी जोस्ना मुसळे,रत्नदीप निकाळजे,बँकेचे मॅनेजर राकेश शाई,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे आदींचा समावेश आहे.या उपक्रमाच्या संकल्पनेविषयी सविस्तर माहिती देताना सावळेराम बळे यांनी सांगितले की,केवळ व्यवसाय नव्हे तर समाजपरिवर्तन हा यामागील मुख्य हेतू आहे.बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे,संस्कारक्षम पिढी,लहान मुलांना वाढत्या मोबाईल व्यसनापासून दूर ठेवून कुटुंबात संस्कारी वातावरण निर्माण करणे,आर्थिक सक्षमीकरण,गावातील प्रत्येक कुटुंबाला शाश्वत विकासाच्या प्रवाहात आणणे. भारतातील पहिले संपर्क कार्यालय पारगावात! -------------- विशेष आणि अभिमानाची बाब म्हणजे,"आपना परिवार" या संस्थेचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे स्थित असून,
त्यांच्या भारतातील पहिल्या संपर्क कार्यालयाचा श्रीगणेशा आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथे झाला आहे.या व्यापक उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून भीमराव पवार,माजी जि.प.सदस्य रवींद्र ढोबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे,मेजर महारुद्र बळे,शांतिनाथ धस, रामभाऊ धोंडे,बापूकाका मोकाशे,आर.टी.जगताप (आबा),घोडके महाराज,केरूळकर आबा यांच्यासह अनेक ग्रामस्थ,तरुण आणि महिला वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या