Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.आशा फड यांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान; 'डॉ.एपीजे अब्दुल कलाम उत्कृष्ट शिक्षक व साहित्यिक पुरस्कारा'ने गौरव

आष्टी (प्रतिनिधी) साहित्य,शिक्षण,संस्कृती आणि सामाजिक परिवर्तनासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सातत्याने योगदान देणाऱ्या तसेच हिंदी साहित्य क्षेत्रातील प्रतिभावान लेखिका डॉ.आशा फड यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा 'डॉ.एपीजे अब्दुल कलाम उत्कृष्ट शिक्षक व साहित्यिक पुरस्कार'प्रदान करण्यात आला आहे.त्यांच्या या यशाने आष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.स्त्री-प्रश्नांची सखोल जाण आणि प्रगल्भ विचारशैली हे डॉ.फड यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. त्यांची 'जोहरा: एक मूल्यांकन' ही हिंदी भाषेतील कादंबरी साहित्य वर्तुळात अत्यंत गाजली आहे.या साहित्यकृतीचा यापूर्वीही 'उत्कृष्ट निर्मिती' म्हणून गौरव झाला आहे.साहित्याद्वारे सामाजिक परिवर्तनाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या डॉ.फड यांचे काम शिक्षण क्षेत्रातही तितकेच मोलाचे आहे.त्यांच्या याच बहुआयामी कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.राजस्थान येथील शिक्षण क्षेत्रातील नामांकित प्रकाशन संस्था असलेल्या 'द टार्गेट बुक ऑफ रेकॉर्डस'यांच्या वतीने हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.संस्थेचे मुख्य संस्थापक ओम प्रकाश लववंशी यांनी या निवडीबद्दल डॉ.फड यांचे विशेष कौतुक केले आहे. शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक,सांस्कृतिक आणि वैचारिक परिवर्तनासाठी त्यांना यापुढेही अशीच ऊर्जा आणि बळ मिळो अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. या राष्ट्रीय स्तरावरील बहुमानाबद्दल डॉ.आशा फड यांच्यावर शैक्षणिक,राजकीय,सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रासह विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ---------------- चौकट ----------- दृष्टिक्षेपात डॉ. आशा फड यांची साहित्यसंपदा
-------------- डॉ.आशा फड या हिंदी साहित्य विश्वातील एक अत्यंत गुणवान आणि प्रतिभासंपन्न लेखिका म्हणून ओळखल्या जातात.मोजकेच पण अत्यंत दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण लेखन,या त्यांच्या शैलीमुळे त्यांच्या साहित्याला वाचकांची मोठी पसंती मिळाली आहे. विशेष म्हणजे,महिलांच्या जगण्यातील विविध प्रश्नांवर थेट प्रकाश टाकणारी त्यांची आणखी दोन महत्त्वपूर्ण पुस्तके सध्या प्रकाशनाच्या अंतिम टप्प्यात आहेत अशी माहिती स्वतः डॉ.आशा फड यांनी माध्यमांशी बोलताना दिली. साहित्याच्या अभ्यासकांसाठी आणि वाचकांसाठी ही नक्कीच एक मोठी पर्वणी असणार आहे. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या