Ticker

6/recent/ticker-posts

कऱ्हेवडगाव दुमदुमले हरिनामाच्या गजरात! ------------------ सलग ४० व्या. वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे दिमाखात आयोजन : ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथेची पर्वणी; पंचक्रोशीतील भाविकांचा मोठा उत्साह सप्ताहास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे -- सरपंच परिवंत गायकवाड

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील कऱ्हेवडगाव येथे परंपरेने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह,ज्ञानेश्वरी पारायण आणि भागवत कथा सोहळ्याला अत्यंत भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे.सलग ४० व्या.वर्षात पदार्पण करणाऱ्या या ऐतिहासिक आणि वैभवशाली परंपरेमुळे संपूर्ण कऱ्हेवडगावसह पंचक्रोशीत भक्तीचा मळा फुलला आहे. ह.भ.प.संत वामनभाऊ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि ह.भ.प. रणजितबापू महाराज यांच्या प्रेरणेने मंगळवार,दि.२१ ते दि.२८ एप्रिल २०२६ या कालावधीत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.'गुरू एक परब्रह्म आहे,ज्याचे वर्म कळते तेथेच देव खरा' या आध्यात्मिक संदेशाचा जागर या सप्ताहाच्या माध्यमातून केला जात आहे.व्यासपीठ चालक व मार्गदर्शक म्हणून ह.भ.प.रामकृष्ण महाराज (ज्ञानेश्वरी पारायण) आणि भागवताचार्य ह.भ.प.राजदीप महाराज आंधळे हे भाविकांना मार्गदर्शन करत आहेत.सप्ताहा दरम्यान दररोज पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन,भागवत कथा सायंकाळी रात्री ९ ते ११ या वेळात भव्य हरिकीर्तन,हरीजागर होणार आहे.सप्ताहात दररोज विविध गावांतील अन्नदाते व जागर पथके आपली सेवा रुजू करत आहेत.सप्ताहात ह.भ.प.रणजित बापू महाराज (अरणगाव), ह.भ.प.डॉ.अमित महाराज डोके यांचे हरि कीर्तन झाले.आज गुरुवार २३ एप्रिल रोजी ह.भ.प.काशिनाथ महाराज (गणेशगड) यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवार दि.२४ एप्रिल रोजी ह.भ.प.धनंजय महाराज कदम, शनिवार २५ एप्रिल रोजी ह.भ.प.कार्तिकीताई जायभाय, रविवार दि.२६ एप्रिल रोजी ह.भ.प.प्रवीण महाराज मुळे, सोमवार दि.२७ एप्रिल रोजी धर्माचार्य ह.भ.प. आदिनाथ महाराज आंधळे(महादेवगड) यांचे कीर्तन होणार आहे. महंत विठ्ठल महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता -------------- + मंगळवार दि.२८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत गहिनीनाथगडाचे ह.भ.प.महंत विठ्ठल महाराज यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन होईल. यानंतर सर्व भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची अधिकृत सांगता होईल.सप्ताहामध्ये ह.भ.प.किसन महाराज शिंदे यांच्यासह अनेक टाळकरी, पखवाज वादक व भजनी मंडळे आपली सेवा देत आहेत.४० वर्षांची अखंड परंपरा जपत साजरा होणारा हा हरिनाम सप्ताह गावातील एकात्मता,श्रद्धा आणि वारकरी परंपरेचे मूर्तिमंत उदाहरण ठरत आहे. गावातील तरुण मंडळे महिला,ग्रामस्थ या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन,नामस्मरण आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन आयोजक समस्त ग्रामस्थ कऱ्हेवडगाव आणि सरपंच सौ.वंदनाताई व परिवंत गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे. ---------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या