आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी,पाटोदा,शिरूर का.मतदार संघासह शेजारील तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची 'कामधेनू' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेश सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक अविरोध पार पडली आहे.या निवडणुकीत माजी आ.भीमराव धोंडे यांच्या समर्थकांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत कारखान्याची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात ठेवली आहे.कारखान्यासारख्या मोठ्या संस्थेची निवडणूक
अविरोध पार पडणे ही संपूर्ण परिसरासाठी अत्यंत आनंदाची बाब मानली जात आहे.या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आष्टी विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आ.भीमराव धोंडे,युवा नेते डॉ. अजयदादा धोंडे यांची महेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी
अविरोध निवड झाली आहे.
नवनिर्वाचित संचालक
मंडळ खालीलप्रमाणे
--------------
माजी आ.भीमराव धोंडे आणि डॉ.अजयदादा धोंडे यांच्या नेतृत्वाखालील खालील संचालकांची कारखान्याच्या संचालक मंडळावर अविरोध निवड करण्यात आली आहे.नियामत बेग जगताप संभाजी,झगडे सतीश,
ॲड.निकाळजे रत्नदीप,सांगळे गणेश,शिंदे केशव,
चव्हाण झुंबर,कर्डिले बजरंग,गावडे गजानन,
गर्जे शहादेव,विधाते उद्धव,जगताप दादासाहेब,खेडकर अशोक,मोहोळकर तुकाराम,मुंडे अंकुश,श्रीमती गोल्हार क्रांती
श्रीमती नन्नवरे उज्वला,वाघुले बाबासाहेब,दिंडे सदाशिव या सर्व नवनिर्वाचित संचालकांचे आष्टी,पाटोदा,शिरूर परिसरातील शेतकरी,सभासद व नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.
----------------

0 टिप्पण्या