Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन! -------------------------- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कऱ्हेवडगाव शाळेला एलसीडी टीव्हीची भेट ------------------------------ जयदिप गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य; सरपंच वंदना गायकवाड यांच्या स्तुत्य उपक्रमाने डिजिटल शिक्षणाची दारे खुली

आष्टी (प्रतिनिधी) 'शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा'हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केवळ भाषणांपुरता मर्यादित न ठेवता, तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा एक प्रेरणादायी आणि स्तुत्य उपक्रम आष्टी तालुक्यातील कऱ्हेवडगाव येथे राबविण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आणि जयदिप कन्स्ट्रक्शनचे मालक जयदिप परिवंत गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एक अत्याधुनिक 'एलसीडी टीव्ही' भेट देण्यात आला आहे. या समाजोपयोगी कार्यक्रमास मान्यवरासह गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर परिवंत गायकवाड, हनुमंत गायकवाड,उत्तमनाना नागरगोजे,गणेश टकले,महेश सांगळे,संजय गायकवाड,राजेंद्र गायकवाड,भगवान नाना सांगळे,अमर शेख,शरद खांडवे,पत्रकार अक्षय विधाते, बाळासाहेब विधाते,उद्धव खांडवे,लटपटे सर, श्रुषीकेश गायकवाड,माजी सरपंच केशव बांगर,सोमिनाथ आण्णा विधाते,गहिनीनाथ नागरगोजे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डिजिटल क्रांतीची ग्रामीण भागात पाऊलवाट ------------- गावाच्या सरपंच आणि कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ.वंदना परिवंत गायकवाड यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला.या आधुनिक भेटीमुळे कऱ्हेवडगावच्या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी 'ई-लर्निंग'चा मार्ग अधिक सुकर झाला आहे.कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून झाली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक विचारांचा जागर केला.शिक्षण हेच समाजातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी हत्यार आहे या विचाराला उजाळा देत सौ.वंदना गायकवाड यांच्या हस्ते शाळेला हा एलसीडी टीव्ही सप्रेम प्रदान करण्यात आला.विद्यार्थ्यांना आता दृकश्राव्य माध्यमातून अधिक रंजक पद्धतीने शिक्षण घेता येईल.विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना व्हिडिओच्या माध्यमातून सहज समजण्यास मदत होईल.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय वयापासूनच आधुनिक जगातील स्पर्धेची ओळख होईल. समाजाचे देणं लागतो, हीच खरी कृतज्ञता -------------- ग्रामीण भागातील शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण पोहोचवण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेणे काळाची गरज आहे.विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्यास ते निश्चितच उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात.महामानवाला हीच खरी आदरांजली ठरेल असा विश्वास सरपंच सौ.वंदना गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.शिक्षकांची वाढली उत्सुकता,विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण या अनोख्या भेटीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पवार यांनी प्रशासनाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.एलसीडी टीव्हीमुळे आमचे अध्यापन अधिक प्रभावी होईलच,पण सोबतच शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती,उत्सुकता आणि अभ्यासातील गोडी वाढण्यास मोठी मदत होईल असे ते म्हणाले.सहशिक्षक सुनिल वाघमारे आणि श्रीमती अनिता जाधव यांनीही नवीन शैक्षणिक धोरणानुसार डिजिटल शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत अशा सुविधांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता नक्कीच वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.सर्वांनी या उपक्रमाचे मुक्त कंठाने कौतुक केले व गावातील इतर सधन व्यक्तींनीही शैक्षणिक क्षेत्रात असेच भरीव योगदान देण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने सरपंच सौ. वंदना गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कऱ्हेवडगावच्या जिल्हा परिषद शाळेने टाकलेले हे 'डिजिटल पाऊल' संपूर्ण तालुक्यासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरले आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही भेट मैलाचा दगड ठरणार आहे. ---------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या