आष्टी (प्रतिनिधी)
निजामकालीन राजवटीमध्येही मराठा समाजातील शेतकऱ्यांनी शेतीतील उत्पन्नातून पैसे जमा करून वसतिगृहे निर्माण केली व ती यशस्वीरीत्या चालवली.याच वसतिगृहांमधून शिक्षण घेऊन समाजाचे अनेक विद्यार्थी उच्चशिक्षित झाले.आज आष्टी येथे निर्माण झालेल्या 'राजमाता जिजाऊ वसतिगृहाच्या' माध्यमातूनही विद्यार्थ्यांना अशाच प्रकारच्या दर्जेदार निवासी सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा मराठा सेवा संघाचे संस्थापक इंजि. पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केली.
मराठा सेवा संघ,आष्टीच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या 'राजमाता जिजाऊ वसतिगृहाच्या'

लोकार्पण सोहळा व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
श्री खेडेकर म्हणाले की,
महाराष्ट्र राज्यात मराठा सेवा संघाच्या कार्यासाठी आपण पुन्हा सक्रिय झालो असून,या नव्या पर्वाची सुरुवात आष्टीपासून करत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी यावेळी केली. अधीकचे
मार्गदर्शन करताना इंजि.खेडेकर यांनी वसतिगृह व्यवस्थापनाला एक मोलाचा सल्ला दिला.ते म्हणाले,"वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून द्या,मात्र त्या १०० टक्के मोफत देऊ नका.मोफत सुविधेमुळे त्याचे गांभीर्य कमी होते. तसेच,या संस्थेचा कारभार पाहण्यासाठी एका पूर्णवेळ आणि समर्पित व्यक्तीची नेमणूक करावी,जेणेकरून वसतिगृहाचे काम शिस्तबद्ध पद्धतीने चालेल.याप्रसंगी बोलताना आ.सुरेश धस म्हणाले की,"गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात निवासाची कोणतीही अडचण येऊ नये,या उदात्त हेतूनेच या राजमाता जिजाऊ वसतिगृहाची निर्मिती करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.आ.सतीश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,गेल्या १७ वर्षांपूर्वी या वसतिगृहाच्या बांधकामासाठी योगदान देण्याची संधी त्यांना मिळाली होती,ज्याचे आज एका भव्य वास्तूत रूपांतर झाले आहे.
माजी आ.भीमराव धोंडे यांनी सद्यस्थितीवर भाष्य करताना "आता जातीपातीचा विषय राहिला नसून आपण सर्वच ओबीसी आहोत,असे विधान केले.तसेच,वसतिगृहाच्या पुढील अद्ययावत सुविधांसाठी त्यांनी तत्काळ एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
तत्पूर्वी,बीड जिल्ह्याचे खा.बजरंग सोनवणे, माजी आ. बाळासाहेब आजबे,माजी आ.साहेबराव दरेकर यांनी मुख्य कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी वसतिगृहाला सदिच्छा भेट देऊन संयोजकांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
विविध पुरस्कारांनी
मान्यवरांचा सन्मान
---------------
याच सोहळ्याचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला.जीवन गौरव पुरस्कार सावळाराम कृष्णाजी जंजिरे,समाजभूषण पुरस्कार श्रीमती शालिनीताई विखे-पाटील,स्त्रीशक्ती नारी पुरस्कार श्रीमती प्राजक्ताताई सुरेश धस (संचालिका,महाराष्ट्र राज्य दूध सहकारी महासंघ महानंद) यांना पुरस्कार देण्यात आले आहेत.आर्किटेक्ट बन्सीधर मोरे आणि मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष इंजि.तानाजी जंजिरे यांनी वसतिगृहाच्या तांत्रिक व आर्थिक बाजूंची माहिती दिली.एकूण क्षमता:४५ विद्यार्थी,रचना पहिल्या मजल्यावर दोन्ही बाजूंना मिळून एकूण ८ सदनिका.एका सदनिकेत ५ विद्यार्थ्यांची सोय.
सुविधा -प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र कॉट आणि पुस्तकांसाठी रॅकची व्यवस्था.दर ४ सदनिकांमागे एक स्वच्छतागृह आणि स्नानगृह सुविधा आहे.इमारतीच्या बांधकामासाठी अंदाजे १ कोटी ३५ लाख रुपये खर्च आहे.पुढील गरज सुसज्ज वाचनालय आणि उर्वरित फर्निचरसाठी आणखी ३० ते ३५ लाख रुपये निधीची आवश्यकता आहे.
यावेळी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजि.डॉ.विजयकुमार घोगरे,प्रदेश महासचिव चंद्रशेखर शिखरे,ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. अर्जुन तनपुरे,जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती सीमाताई बोके,उपाध्यक्षा श्रीमती वर्षा माने,जलसंपदाचे माजी मुख्य सचिव व्यंकटराव गायकवाड,विदर्भ खोरे विकास महामंडळाचे माजी कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे,कृष्णा घुगे,डॉ. अशोक कोल्हे, सेवानिवृत्त उपअभियंता अशोक खेडकर,सचिव भास्कर निंबाळकर,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कन्हेरे,संदीप खकाळ,पी.ई.तळेकर अप्पा,बाबासाहेब मुळीक,अशोक चौधरी,कमलेश मिरगणे,मुकुंद लगड,अभय शिंदे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक भाषण करताना इंजि. तानाजी जंजिरे यांनी मागील सात तालुका अध्यक्षांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन दिनेश पोकळे आणि सायली हंबर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.बाबासाहेब मुटकुळे यांनी मानले.या वास्तूच्या निर्मितीसाठी आर्किटेक्ट बन्सीधर मोरे,प्रल्हाद तळेकर,महेश शिंदे,लक्ष्मण रेडेकर,प्रा.दत्ता नरसाळे आणि सुरेश पवार यांनी अविरत परिश्रम घेतले.
-----------------
0 टिप्पण्या