Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईचे उद्योगपती नितीन हिंगमिरे यांनी पाटोदा शाळेस इन्वर्टर भेट दिले

आष्टी ( प्रतिनिधी) पाटोदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला गावचे सुपुत्र मुंबई येथील प्रसिद्ध उद्योगपती, दानशूर व्यक्तिमत्व नितीन हिंगमिरे हे हनुमान जयंतीसाठी व इतर कामानिमित्त पाटोदा गावी आल्यावर त्यांनी आवर्जून शाळेला भेट दिली.शालेय कामकाज, शालेय परिसर, शैक्षणिक गुणवत्ता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.शाळेच्या वतीने शाल,श्रीफळ,पुष्प गुच्छ देऊन भव्यदिव्य असा दिमाखदार सत्कार करण्यात आला.मुलांनी स्वागत गीत व अभिनंदन पर गीताचे गायन केले.नितीन हे अतिशय हुशार, मितभाषी, बुद्धिमान, दानशूर, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, हळव्या मनाचे संवेदनशील पालक आहेत.त्यांनी स्वतःच्या मुलांना ही उच्चशिक्षित केले आहे. पाटोदा शाळेचे राज्यस्तरीय लोकसंसद शिखर पुरस्कार, गुणवंत शिक्षक,आदर्श शिक्षक, पर्यावरण तज्ञ,असे अनेक पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक उत्तम पवार यांनी लोकजागर करून वस्तू स्वरूपात लोकसहभाग वाढावा व माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून शाळेला जास्तीत जास्त लोकसहभाग कसा मिळेल व शाळा सुंदर आणि परिपूर्ण होईल यासाठी संपूर्ण गावांमध्ये जनजागृती व प्रचार प्रसार अतिशय प्रभावीपणे केला आहे.या भेटीदरम्यान नितीन हिंगमिरे मुंबईवरून पाटोदा या ठिकाणी येणार आहेत. अशी माहिती मिळाल्यावर व प्रत्यक्षात आल्यावर त्यांची तात्काळ भेट घेऊन त्यांना शाळेविषयी सविस्तर माहिती देऊन एक प्रेमपूर्वक विनंती केली.नितीनजी शाळेत आल्यावर त्यांच्याशी अनेक विषयावर चर्चा करत असताना मुख्याध्यापक उत्तम पवार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठीच्या शाळेत कमी असलेल्या आवश्यक बाबी,शाळेतील भौतिक अडचणी व सतत लागणाऱ्या शाळेसाठी आणखी काही आवश्यक गोष्टी साहेबांसमोर मांडण्यात आल्या. साहेबांनी सर्व बाबी शांतपणे समजावून घेतल्या.एका क्षणाचा ही विलंब न करता शाळेचे मुख्याध्यापक उत्तम पवार यांच्या विनंतीला मान देऊन शाळेस दोन मोठे स्टोरेज असलेले व कमीत कमी १० तासाचा बॅटरी बँकअप असलेले ३८ हजार रुपये किमतीचे इन्व्हर्टर देण्याचे कबूलच केले नाही तर प्रत्यक्षात जाऊन जामखेडवरून आणून ते बसवून दिले.कोणतेही काम मनावर घेतले की ते तात्काळ पूर्ण करावे हीच नितीनची खासियत आहे.शाळेतील लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह, आपुलकी, प्रेम पाहून समाधान व्यक्त केले.या सत्कार कार्यक्रमाला उत्तर देतांना नितीन हिंगमिरे साहेबांनी मुलांच्या भौतिक बाबी बरोबरच शैक्षणिक गुणवत्ता,संगणक ज्ञान, पर्यावरण पूरक उपक्रम व क्रिडांगण देखील असावे असे मत व्यक्त केले.स्वतः च्या जीवनाचा आराखडा विध्यार्थ्यांसमोर मांडला. स्वतः फक्त सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर मुंबई येथे जाऊन स्वतःचा व्यवसाय उभा करत त्यामध्ये प्रचंड मोठी मजल मारली आहे.आर्थिक संपन्नते बरोबर अनेक गुणी माणसे ही त्यांनी जोडले आहेत.त्यांनी अनेक व्यवसायात त्यांनी खूप मोठी प्रगती केली आहे. ग्रामीण भागातील मुलांचा शाळेप्रती व अभ्यासाप्रती असलेला ओढा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला व त्यांनी समाधान व्यक्त केले. मुलांशी दिलखुलास पणे गप्पा मारल्या.शेवटी जाताना शाळेला आणखी काही मदत लागली तर वेळोवेळी सांगात जा मी मदतीसाठी कायम तयार आहे. या दानशूर वृत्तीमुळे संपूर्ण पाटोदा पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण जामखेड तालुक्यात त्यांचे नाव झाले आहे.या सत्कार कार्यक्रमावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ, शाळेतील उपक्रमशील शिक्षक जितेंद्र आढाव सर, गुणवंत शिक्षक संतोष डोके सर, अनिल आष्टेकर सर,श्रीमती रासने मॅडम व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.या सत्कार कार्यक्रमाची प्रस्तावना उत्तम पवार सर यांनी केली.सूत्रसंचालन अनिल आष्टेकर यांनी केले व आभार संतोष डोके यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या