Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी तालुक्यात भक्तीचा मळा; ----------------- क-हेवडगाव येथे सरपंच परिवंत गायकवाड यांच्या हस्ते महापूजा ----------------- आष्टी शहरात दोन हजार भाविकांना महाप्रसाद; पहाटे ६.२२ वाजता सर्वत्र झाला जन्मोत्सव

आष्टी (प्रतिनिधी) सर्वसामान्यांचे आराध्य दैवत असलेल्या हनुमंतरायाचा जन्मोत्सव आष्टी तालुक्यात अत्यंत उत्साहात आणि मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.गावोगावच्या मंदिरांमध्ये पहाटेपासूनच कीर्तन,अभिषेक आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.क-हेवडगाव येथे गावचे सरपंच परिवंत गायकवाड यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने श्रींची महापूजा व महाअभिषेक संपन्न झाला. क-हेवडगाव येथे सालाबादप्रमाणे यंदाही हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.पहाटेच्या मंगलमय वातावरणात सरपंच परिवंत गायकवाड यांच्या हस्ते मारुतीरायाची विधिवत पूजा आणि महाअभिषेक करण्यात आला.यानंतर गावातील सर्व ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती,ज्यामुळे वातावरणात अधिकच पावित्र्य आणि उत्साह निर्माण झाला होता. आष्टी शहरातही हनुमान जयंतीचा मोठा उत्साह दिसून आला.शहरातील पोलीस स्टेशन शेजारील हनुमान मंदिर,व्यापार पेठेतील मंदिर तसेच शेकापूर रस्त्यालगत असलेल्या मानाच्या दक्षिणमुखी मारुती मंदिरात पहाटे ठीक ६ वाजून २२ मिनिटांनी 'जय हनुमान'च्या जयघोषात जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.पोलीस स्टेशनशेजारील हनुमान मंदिरात जयंतीनिमित्त विशेष पूजा आयोजित करण्यात आली होती. याठिकाणी दर्शनासाठी आलेल्या सुमारे दोन हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.प्रत्येक गावात हनुमान मंदिर असल्याने,या जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण तालुक्यात भक्तीचे उधाण आले होते.टाळ-मृदंगाचा गजर आणि दर्शनासाठी लागलेल्या रांगा यामुळे आष्टी तालुक्यात सर्वत्र चैतन्याचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. ----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या