आष्टी (प्रतिनिधी )
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे सेवानिवृत्त सचिव सुनील चव्हाण आणि कासारी मुर्शदपुरचे माजी सरपंच संतोषभैय्या चव्हाण यांचे वडील तथा आष्टीचे माजी तहसीलदार साहेबराव गणपतराव चव्हाण यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.महसूल विभागातील एका अनुभवी, कर्तव्यदक्ष आणि मनमिळाऊ अधिकाऱ्याच्या निधनाच्या वृत्ताने आष्टी तालुक्यात व प्रशासकीय वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
माजी तहसीलदार साहेबराव चव्हाण यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती.त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.महसूल प्रशासनात काम करत असताना त्यांनी जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला होता.त्यांच्या निधनाने चव्हाण कुटुंबावर मोठा आघात झाला असून,संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.चव्हाण परिवाराच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार,साहेबराव चव्हाण यांच्या पार्थिवावर आज शनिवारी दि.२५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता आष्टी येथील किशोर हंबर्डे यांच्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या 'चव्हाण फार्म हाऊस' या ठिकाणी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अंत्ययात्रेसाठी परिसरातील नागरिक,प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री अब्दुल सत्तार,जलसंपदा विभागाचे सचिव हेमंत धुमाळ,छत्रपती संभाजीनगर येथील जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक देवराज,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते व अधिकारी उपस्थित होते.तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,
धर्माचार्य आदिनाथ महाराज आंधळे,ह.भ.प.श्रीहरी पुरी महाराज,गोविंद महाराज पवार यांनीही उपस्थिती लावली.याशिवाय दिलीपदादा हंबर्डे,सभापती बद्रीनाथ जगताप,नगराध्यक्ष जिया बेग,भारत मुरकुटे,कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी,कड्याचे माजी सरपंच अनिलतात्या ढोबळे,राजेंद्र धोंडे,पाटोद्याचे नगराध्यक्ष राजेंद्र जाधव,संपतराव धोंडे,सतीशआबा शिंदे,विजय गोल्हार,
अण्णासाहेब चौधरी,साहेबराव मस्के, सुखलाल मुथा, किशोरनाना हंबर्डे,तालुका कृषी अधिकारी अशोक कोंडे,छत्रपती संभाजीनगरचे नायब तहसीलदार म्हस्के,दत्तात्रय आटुळे,दिपक मोरे (छत्रपती संभाजीनगर कलेक्टरचे स्वीय सहाय्यक),राष्ट्रीय कोच सुरेंद्र मोदी,प्राचार्य डॉ.सोपान निंभोरे,प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ,काकासाहेब शिंदे,संतोषशेठ मेहर,उद्धवअण्णा विधाते,नामदेव राऊत,विक्रम पोकळे,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,शरद रेडकर,सरपंच अशोक मुळे,इंजि.पी.बी.बोडखे,गणेश पन्हाळकर,रमेश मुळे,शिवाजी शेकडे,शहाजी कृष्णाजी गव्हाणे,पी.वाय.काळे,संभाजी दाहातोंडे,चेअरमन अरुण सायकड,सतीश धोंडे,पप्पू पडोळे सतीश

मामा जंगले, कल्याण काकडे,बा.म.पवार,रामराव झांजे,बबनराव खंडागळे,सुभाष रासकर आदी राजकीय,सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय सेवेतील मान्यवरांनी उपस्थित राहून साश्रू नयनांनी श्रद्धांजली अर्पण केली.
0 टिप्पण्या