आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील
श्री संत मदन महाराज गुरुकुल विद्यापीठ वारकरी शिक्षण संस्था आयोजित महिंदा येथील तारकेश्वरगडावर दि.१ ते १४ मे या कालावधीत वारकरी बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.द्विदिनी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.तिसरी ते दहावीपर्यंतच्या मुला,मुलींना शिबिरात प्रवेश दिला जाणार आहे.
वारकरी बालसंस्कार भव्य शिबिर,संतांच्या पुण्यतिथी, भगवंताची जयंती गुरुकुलावर साजरी केल्या जातात. गुरुकुलामध्ये अध्ययना करता कायमस्वरूपी विद्यार्थी असतात. ज्यांना कोणाला अन्नदानाच्या रूपाने किंवा तन-मन- धनाने सहकार्य करायचे असेल त्यांनी करावे असेही
आवाहन करण्यात आले आहे.ह.भ.प.भागवताचार्य
निळकंठ महाराज तावरे (संस्थापक अध्यक्ष श्री संत मदन महाराज गुरुकुल विद्यापीठ वारकरी शिक्षण संस्था) यांच्या नेतृत्वाखाली आणि महंत आदिनाथ शास्त्री महाराज तारकेश्वरगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.
मुलांना स्वावलंबी होण्यासाठी केळसांगवी येथील भागवताचार्य ह.भ.प.निळकंठ महाराज तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संत मदन महाराज गुरुकुल विद्यापीठ वारकरी शिक्षण संस्थेतर्फ आष्टी तालुक्यातील तारकेश्वरगडावर भव्य बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवार दि.१३ मे रोजी रात्री ९ ते ११ या वेळात शिबिराचे आयोजक
संत मदन महाराज गुरुकुल विद्यापीठ वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भागवताचार्य ह.भ.प.निळकंठ महाराज तावरे यांचे कीर्तन होणार आहे.
शिबीराच्या समारोपानिमित्त गुरुवार दि.१४ मे रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत तारकेश्वरगडाचे मठाधिपती महंत आजिनाथ शास्त्री महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
या शिबिरात मुले सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्वतःची कामे स्वतः करतात.यामुळे मुलांना स्वावलंबी होण्यास मदत होते.उन्हाळ्याची सुट्टी आहे म्हणून मुले रात्री उशिरापर्यंत (मोबाईल) टि.व्हि.वरील मालिका,सिनेमे पाहत बसतात आणि सकाळी उशिरा उठतात.
यामुळे त्यांची शारीरिक हानी होते.
बालसंस्कार शिबिरात मुलांना सकाळी लवकर उठून प्राणायाम, व्यायाम शिकवला जातो.उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या मुलाने नवीन काहीतरी शिकावे असे सर्व पालकांना वाटते परंतु त्यासाठी योग्य असा पर्याय सापडत नाही.आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील श्री संत मदन महाराज गुरुकुल विद्यापीठ वारकरी शिक्षण संस्थेतर्फे गेली १७ वर्षापासुन उन्हाळी बाल संस्कार शिबीर आयोजित केले जाते.या बालसंस्कार शिबिरात पखवाज वादन,शास्त्रीय संगीत गायन,हार्मोनियम,तबला आदि मोठमोठ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती या शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
या शिबीरातील विद्यार्थ्यांकरिता तारकेश्वरगडाच्या वतीने शिबीरातील विद्यार्थ्यांना राहण्याची व भोजनाची सोय करणे करण्यात आली आहे.शिकण्यासाठी,शिक्षणासाठी ज्या ज्या गोष्टीची कमतरता असेल त्या बाबी उदार व दानशुर व्यक्तींनी या विद्यार्थ्यांकरीता गुरुकुलाच्या विकासाकरिता मदत करावी.चांगले शिक्षण मिळण्यासाठी,जे शिक्षण आळंदी, पंढरी,पैठण येथे प्राप्त होते तेच शिक्षण या श्री संत मदन महाराज गुरुकुल विद्यापीठ वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भागवताचार्य निळकंठ महाराज तावरे यांच्या माध्यमातून उपलब्ध आहे.आष्टी तालुक्यामध्ये ही गुरुकुल संस्था म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये १० वर्षापासून दुसऱ्या क्रमांकावर कार्य करत आहे.शिबिराचं कार्य २०१० पासून सुरु आहे.सर्व समाज घटकांनी याकडे लक्ष देऊन गुरुकुलाच्या आणि अडचणीमध्ये सहभाग नोंदवावा गुरुकुलाला मदत करावी असे आवाहन ह.भ.प.तावरे महाराज यांनी केले.

------------------
0 टिप्पण्या