Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी तालुका पत्रकार संघाकडून आजबे कुटुंबियांचे सांत्वन ----------------- विलास आबा आजबे यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची मोठी हानी; शिराळ येथे जाऊन पत्रकारांनी वाहिली श्रद्धांजली

आष्टी (प्रतिनिधी) बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक आणि आष्ट,पाटोदा,शिरूर मतदार संघाचे माजी आ.बाळासाहेब आजबे यांचे ज्येष्ठ बंधू विलास आबा आजबे यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण तालुक्यात आणि सहकार क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.आजबे कुटुंबियांना आधार देण्यासाठी आणि त्यांचे सांत्वन करण्यासाठी आष्टी तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी नुकतीच शिराळ येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट दिली.विलासआबा आजबे यांनी बीड जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम करताना सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला होता.त्यांचा जनसंपर्क आणि सामाजिक कार्यातील सहभाग मोठा होता.त्यांच्या अचानक जाण्याने आजबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद घटनेची माहिती मिळताच आष्टी तालुक्यातील माध्यम प्रतिनिधींनी शिराळ गावी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी आष्टी तालुका पत्रकार संघातील ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे,उत्तम बोडखे,दत्ता काकडे,विनोद ढोबळे,प्रवीण पोकळे,पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सानप,गणेश दळवी, रघुनाथ कर्डिले,भीमराव गुरव,शरद तळेकर,शरद रेडेकर,सचिन रानडे,मनोज पोकळे यांनी माजी आमदार बाळासाहेब आजबे व त्यांच्या शोककुल कुटुंबियांची भेट घेतली.उपस्थित पत्रकारांनी विलास आबा यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण केले. "विलास आबांच्या जाण्याने केवळ आजबे कुटुंबाचीच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याची आणि सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.या दुःखाच्या प्रसंगात आष्टी तालुका पत्रकार संघ आपल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
अशा भावना यावेळी ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केल्या.या सांत्वनपर भेटीदरम्यान विलास आबा आजबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी शिराळ ग्रामस्थ आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. -------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या