लग्न म्हणजे दोन जीव,दोन कुटुंब आणि संस्कृतीचा पवित्र मिलाफ असतो;किंबहुना लाजा होम,कन्यादान आणि सप्तपदी हे मुख्य संस्कार असतात.लग्नातील मंगलमय वातावरण..भावी जीवनासाठी असंख्य विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आणि अत्यंत सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील ज्येष्ठांनी सायंकाळच्या वातावरणात खास मुद्दामहून उपस्थिती लावत वधू-वरांना दिलेल्या भावी जीवनाच्या शुभेच्छा.. एकूणच मंगल कार्याच्या समोरील मोठ्या परिसरात गाड्यांना ही जागा पुरणार नाही एवढी भव्य दिव्य उपस्थिती लावत आलेल्या आशीर्वादासाठीच्या वराडींनी यंदाच्या विवाह क्षेत्रातील उपस्थितीचा उच्चांक साधला!
प्रसंग आहे बोडखे आणि विधाते परिवाराच्या शुभमंगल सोहळ्याचा!
तब्बल २६ वर्षापासून आपल्या समतोल लेखणीच्या माध्यमातून आणि प्रचंड कष्ट मेहनत आणि त्या संयम ठेवून चालवलेल्या दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तमराव बोडखे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण नावामध्ये कार्यरत राहून आनंदराव धोंडे महाविद्यालयाला राज्यात मानाचे स्थान प्राप्त करून देणाऱ्या प्राचार्य तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे माजी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांच्या आजपर्यंतच्या कर्तुत्वाचा हा परिपाक ठरला.त्या भागातील सर्वसामान्यांच्या विवाह सोहळ्यातील गर्दीचा अत्यंत आनंदाने जाणीवपूर्वक उपस्थिती लावून वधूवरांना शुभेच्छा देण्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा हा लक्षणीय वैशिष्ट्यपूर्ण सोहळा ठरला आहे.डॉ.शिवानी ही पत्रकार उत्तमराव बोडके यांची कन्या आहे.डॉ.सत्यजित हे प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांचे चिरंजीव आहेत.अत्यंत संस्कारक्षम आणि प्रेरणा घेण्याइतपत ही जोडी आजच्या युवकांसाठी ठरते आहे.उभयतांच्या संस्कार मय कुटुंबातून रविवारी महिला दिनाच्या ८ मार्च रोजी सर्वांच्या आशीर्वादाने आष्टी येथील मंगल कार्यालयात संपन्न झाला.
लग्नातील मंगलमय वातावरण... सुमधुर आवाजातील सनई चौघडे... भावी जीवनासाठी दिला जाणाऱ्या प्रचंड शुभेच्छा... हळदी साखरपुडा... वधु-वरांचे रोमांचकारी आगमन... हे प्रसंग अत्यंत देखणे, अल्हाददायक आणि डोळ्यांना दीपणारे ठरले.
खरं तर विवाह दोन विचार आणि दोन संस्कृतीचा संगम असतो.बोडखे आणि विधाते परिवाराच्या या विवाहाच्या रुपाने सुंदर असे शुभमंगल आणि भावी आयुष्यासाठी डॉ. सत्यजित आणि डॉ.शिवानीच्या माध्यमातून भावी आयुष्याची गोड सुरुवात झाली आहे.
या शुभविवाह सोहळ्यासाठी आशीर्वाद देताना आष्टी,पाटोदा, शिरूरचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी पत्रकार उत्तम बोडखे आणि प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांच्या'गोड वाणीचा' गोड बोले असा विनोदाने आवर्जून उल्लेख करत त्यांच्यामुळे प्रचंड अफाट आशीर्वाद देण्यासाठी जमलेला वह्राडी मंडळींच्या उपस्थितीचा विशेष उल्लेख केला.अन्य राजकीय नेते कार्यकर्ते,अधिकारी आणि संत महंतांनी दिलेले आशीर्वाद,सबंध पत्रकार बांधवांची घरातील लग्न असल्या सारखी स्वागता साठीची धावपळ आणि राजकीय सामाजिक धार्मिक वैचारिक शैक्षणिक आर्थिक आणि माध्यमिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रचंड उपस्थिती हे या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.आ.सुरेश आण्णा धस,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ. दरेकरनाना,माजी आ.बाळासाहेब आजबे काका,महबूबभाई शेख,देविदास आबा धस,ह.भ.प.रंधवेबापू,ह.भ.प.राधाताई सानप,
ह.भ.प.सोनाली दीदी यांच्यासह असंख्य विविध कुलगुरू, प्राचार्य,प्राध्यापक,डॉक्टर,वकील व विविध क्षेत्रातील मान्यवर यांची मांदियाळी अभुतपूर्व ठरली.
दैनिक झुंजारनेता चे संपादक अजित वरपे यांच्यासह मराठवाडा आणि झुंजारनेताचा संपूर्ण परिवार स्वागतासाठी अतुर होता.
बोडखे आणि विधाते परिवाराच्या या शुभविवाह सोहळ्याने मात्र लेखणीच्या कर्तुत्वाचा आणि शिक्षण संस्कृतीत राबलेल्या कार्याचा इतिहास रचला,हे मात्र नक्की!
उपस्थितीचा उचांक पाहून भारावून गेलेल्या वधू आणि वर पिता ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे आणि प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी मानलेले आभार सुद्धा त्यांच्या शालिनीतेचे प्रतीक ठरले.
चौकट
--------
लेखनी आणि शिक्षण
संस्कृतीचा विजय!
------------
गेल्या तीन दशकापासून वधूपिता ज्येष्ठ पत्रकार उपसंपादक उत्तमराव बोडखे पत्रकारीतेच्या माध्यमातून गोरगरिबांचे दुःख अडचणी समस्या मानण्याचे काम करतात.गुणवंतांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देत त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्याचे कर्तव्य निभावतात तर वरपिता प्राचार्य डॉ.हरिदास विधाते एक शांत,संयमी आणि प्रचंड ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्व आहे.त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन मोठ मोठ्या पदावर पोहोचले आहेत,स्वावलंबी झाले आहेत.'ज्ञानदीप' लावण्याचे मौलिक कर्तव्य त्यांनी जपले.लेखणी आणि शिक्षण संस्कृतीचा या प्रचंड उपस्थितीने विजय झाल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.
प्रा. आशा फड
----------------
-

चाटे .
---------------------------------------
0 टिप्पण्या