Ticker

6/recent/ticker-posts

पर्यटनासाठी गेलेल्या बीडच्या उच्चशिक्षित तरुणीचा थायलंडमध्ये अपघाती मृत्यू; बीडमध्ये आज अंत्यसंस्कार

आष्टी (प्रतिनिधी) बीड सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी थायलंडला (Thailand) गेलेल्या बीड शहरातील एका उच्चशिक्षित तरुण अभियंता (Engineer) तरुणीचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे मुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून,संपूर्ण बीड शहरासह पुण्याच्या आयटी (IT) क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.आष्टी येथील पूर्णवादी नागरी सहकारी आष्टी येथील पूर्णवादी नागरी सहकारी बँकेतील अधिकारी असलेले प्रशांत मुळे यांची ती कन्या आहे.प्रशासकीय व राजकीय पातळीवरील विशेष प्रयत्नांनंतर तिचा मृतदेह भारतात आणण्यात येत आहे.कु.पूजा प्रशांत मुळे (वय २६) असे या मृत तरुणीचे नाव आहे.पूजा ही मूळची बीड शहरातील परवानानगर,खंडेश्वरी देवी रोड परिसरातील रहिवासी होती.ती अतिशय हुशार आणि होतकरू होती.तिने पुण्याच्या कोथरूड येथील 'मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग'मधून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची (B.E. Computer) पदवी अत्यंत चांगल्या गुणांनी प्राप्त केली होती.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती सध्या पुण्यातील खराडी येथील 'UBS' या नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत होती.थायलंडच्या कोसामुई बेटावर काळाचा घाला मिळालेल्या माहितीनुसार,पूजा पर्यटनासाठी थायलंडला गेली होती.थायलंड मधील फुकेत परिसरातील कोसामुई (Koh Samui) बेटावर ती गेली असता,एका भीषण रस्ते अपघातात तिचे निधन झाले.तिच्या अकाली मृत्यूची बातमी घरी धडकताच तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला.मृतदेह मायदेशी आणण्यासाठी उच्च पातळीवर प्रयत्न परदेशात घटना घडल्यामुळे मृतदेह भारतात आणण्यासाठी तांत्रिक व कायदेशीर अडचणी येत होत्या.मात्र,या दुःखद प्रसंगी राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेने संवेदनशीलतेने पावले उचलली.राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे,बीडचे खा.बजरंग सोनवणे,केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पर्यटन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (पुणे),बीडचे माजी जिल्हाधिकारी पाठक, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि बीड जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि थायलंड दूतावासाशी तातडीने संपर्क साधला.या सर्वांच्या समन्वयातून आणि उच्च पातळीवरील प्रयत्नांनंतर थायलंडमधील कायदेशीर प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून पूजाचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला.थायलंड येथून पूजाचे पार्थिव बीडमध्ये आणले जात आहे.आज गुरुवारी बीड येथील मोंढा रोडवरील'अमरधाम' येथे तिच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.तिच्या अशा अकाली जाण्याने मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या