Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे नायब तहसीलदार भगीरथ धारक यांना मातृशोक ------------------ कौशल्याबाई धारक यांचे वयाच्या ९० व्या.वर्षी निधन;

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार भगीरथ धारक यांच्या मातोश्री कौशल्याबाई चंद्रभान धारक (वय ९०) यांचे आज शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने धारक कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.मूळचे धानोरा (ता.आष्टी) येथील रहिवासी असलेले धारक कुटुंब सध्या आष्टी शहरातील विनायकनगर येथे वास्तव्यास आहे.कौशल्याबाई धारक या एक मनमिळाऊ आणि धार्मिक प्रवृत्तीच्या महिला होत्या.त्यांच्या पश्चात बापूराव धारक,नायब तहसीलदार भगीरथ धारक,संतोष धारक आणि गुलाब धारक ही चार मुले,तर सुनंदा रामदास दळवी ही मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.शुक्रवारी सकाळी ११ वाजता धानोरा येथील अमर धाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.या दुःखद प्रसंगी महसूल प्रशासन,राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून धारक कुटुंबाचे सांत्वन केले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती या अंत्यविधीसाठी महसूल विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकारी वसीमा शेख,तहसीलदार वैशाली पाटील,सर्व मंडळ अधिकारी, तलाठी तसेच आष्टी तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.राजकीय व सामाजिक क्षेत्रातील माजी आमदार साहेबराव दरेकर,माजी सभापती संजय ढोबळे,अंकुश चव्हाण, विजयकुमार बांदल,पंचायत समिती सदस्य परमेश्वरकाका शेळके,ॲड.हनुमंत थोरवे,कांतीलाल चानोदिया,माजी सरपंच सतीशशेठ धस,रामशेठ मधुरकर,इंद्रकांत शेंदूरकर,बाळासाहेब शेंदुरकर,मंगल चंद्रकांत शिंदे,राजाभाऊ शेळके,भाऊसाहेब शेळके,दादासाहेब गव्हाणे,देविदास उदावंत,मच्छिंद्र शेळके यांनीही अंत्यदर्शन घेतले.तसेच पीएसआय गोरख शेळके, ह.भ.प.हौसराव आजबे महाराज,अनिलतात्या ढोबळे,संजय मेहेर,सुभाष राऊत,जालिंदर वांढरे,भगवान गायकवाड, अजिनाथ शेळके,रावसाहेब वाघमारे,सुभाष जगताप,आप्पा बरडे,कैलास पोकळे,रावसाहेब धस,अनिल राऊत,अन्सार शेख आदींसह धानोरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार व शिक्षण क्षेत्राची श्रद्धांजली ----------------- ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,गणेश दळवी,अविनाश कदम,रघुनाथ कर्डिले यांच्यासह आष्टी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली.याशिवाय जनता कनिष्ठ महाविद्यालय,वसुंधरा प्राथमिक विद्यालय (आष्टी) आणि कै. बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय (केरूळ) येथील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. स्व.कौशल्याबाई धारक यांचा दशक्रिया विधी रविवार दि. २२ मार्च रोजी धानोरा येथे संपन्न होणार असल्याची माहिती कुटुंबाच्यावतीने देण्यात आली आहे.इंद्रकांत शेंदूरकर,राष्ट्रीय खेळाडू बाळासाहेब शेंदुरकर,मंगल चंद्रकांत शिंदे यांच्या त्या मावशी होत्या. ----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या