Ticker

6/recent/ticker-posts

माजी आ.भीमराव धोंडे यांच्या निवासस्थानचा 'दावत-ए-इफ्तार' कार्यक्रम ठरला ऐतिहासिक! ----------------- ४० वर्षाची अविरत परंपरा; ऐक्य, बंधुभाव, सामाजिक समख्याचे झाले केंद्र

आष्टी (प्रतिनिधी) माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या निवासस्थानी काल शनिवारी सायंकाळी पवित्र रोजा महिन्याच्या औचित्याने 'दावत- ए- इफ्तार' कार्यक्रम हजारो मुस्लिम बांधवांसह विविध धर्मीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत बंधुभाव आणि ऐक्य तसेच पवित्र सलोख्यातून संपन्न झाला.तब्बल ४० वर्षाची अविरत परंपरा जपल्याने हा कार्यक्रम ऐतिहासिक झाल्याचे ज्येष्ठ मान्यवरांनी नमूद केले. तब्बल ४० वर्षाची इफ्तार पार्टीची परंपरा माजी आ. भीमराव धोंडे यांच्या परिवाराने जपली आहे.यंदाच्या पवित्र रमजान महिन्यांमध्ये आष्टी शहरासह तालुक्यातील मुस्लिम बांधवांना अत्यंत प्रेम भावनेने निमंत्रित करून सर्वांनी सोबत बसून फलाहार आणि पदार्थांचे पवित्र भावनेने स्नेहभोजन घेतले.शनिवारी माजी आ.भीमराव धोंडे मित्रमंडळाच्या वतीने धोंडे यांच्या निवासस्थानी अत्यंत सुंदर आणि देखणी व्यवस्था करण्यात आली‌. पवित्र रमजान महिन्यांमध्ये मुस्लिम बांधव, युवक, ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी आणि अत्यंत छोटे बालक आणि बालिका सुद्धा पवित्र उपवास करून ईश्वराला प्रार्थना करतात. यंदाच्या या महिन्यातील उपवास करताना आग्रहाने धोंडे यांच्या निवासस्थानी एकत्र बसून स्नेहभोजन घेण्यात आले.तितक्याच आदराने आष्टी शहर आणि तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.एकत्र बसून स्नेहभोजन करून माणसातील माणुसकी ऐक्य श्रद्धा बंधुभाव एकोपा सामाजिक सलोखा यानिमित्ताने वाढीस लागते ही भूमिका या माध्यमातून स्पष्ट झाली.यावेळी पंचक्रोशीतील मोठी उपस्थिती धोंडे परिवारांच्या प्रेम भावनेचा परिपाक असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. यावेळी परस्परांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. सामाजिक सलोखा आणि ऐक्याची भावना यानिमित्ताने दृढ होण्यास मदत होईल असा विश्वास यानिमित्ताने माजी आ.भीमराव धोंडे यांनी व्यक्त केला आहे.यावेळी युवा नेते डॉ.अजय धोंडे, महेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र धोंडे, युवा नेते अभय धोंडे,माजी शिक्षण सभापती नियामत बेग साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आष्टी तालुका अध्यक्ष काकासाहेब शिंदे,आरपीआयचे आष्टी तालुका अध्यक्ष अशोक साळवे,महाराष्ट्र केसरी सईदभाई चाऊस,पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे,माजी जि.प.अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत,ॲड साहेबराव म्हस्के,माजी जि.प.सदस्य सतीशआबा शिंदे,सामजिक कार्यकर्ते रामभाऊ खाडे, ॲड. भाऊसाहेब लटपटे, युवा नेते शेख अस्ताक भाई, धर्माचार्य ह.भ. प.आजिनाथ अंधाळे महाराज, नगरसेवक अस्लम बेग,संजय सेठ मेहेर,संतोषसेठ मेहेर,नवीनसेठ कासवा,सय्यद तय्यब सर,हाजी शहाबुद्दीन सय्यद, सामाजिक कार्यकर्ते शेख अफसर भाई, भाऊसाहेब घुले, माजी सरपंच संतोषभैय्या चव्हाण, माजी सरपंच सय्यद शफी,ॲड.रत्नदीप निकाळजे,पत्रकार उत्तम बोडखे, सतीशमामा झगडे,प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,शेख जमशेद भाई,डॉ. अझहर बेग,विक्की भाऊ शेकडे, सरपंच तात्यासाहेब लाड,सरपंच दादा जगताप,रजी भाई बेग,शहादुल्ला भाई बेग टाटा,नईम भाई शेख,इम्रान खान, डॉ.नदीम शेख, ॲड.रिजवान शेख,दादासाहेब गर्जे, मोसिन कुरेशी, फजल शेख, हादी शेख, वसीम शेख, अजीम खान, माजेद बेग, शहानवाज पठाण, तोफीक बेग,तबरेज शेख, सय्यद मोहम्मद,अय्युब भाई पठाण, कदीर भाई खान,शाकेर भाई,समीर शेख,जिशान सय्यद, फरिद सय्यद,अस्लम भाई पठाण,सय्यद जुल्फेखार,शाकेर भाई,आत्तीभाई बेग, समीर शेख, फय्याज शेख,नदीम बेग,कैफ शेख,आझमत सय्यद,इस्लाम चाऊस, मुजाहिद्दीन पठाण,समिर खान,एजाज शेख,सादीक भई शेख, विनोद ढोबळे, ठकाराम दुधावडे,मुजाहीद शेख,मोहम्मद अली,सरवर खान, निलेश सोनवणे, ॲड. संभाजी दहातोंडे,आदेश निमोनकर,अली भाई सय्यद, अल्ताफ सय्यद, ॲड. शेकडे, सदाशिव दिंडे आयाज कुरैशी,आदी मान्यवर उपस्थित होते. चौकट -------- ४० वर्षाची धोंडे परिवाराची इफ्तार पार्टीची परंपरा! ---------------- माजी आ.
भीमराव धोंडे हे ४० वर्षाहून अधिक काळ राजकारण, समाजकारण, शिक्षण, संस्कृती आदीसह क्षेत्रात पूर्ण वेळ कार्यरत आहेत तेव्हापासून अर्थात ४० वर्षापासून त्यांनी दरवर्षी पवित्र रमजान महिन्याची उपवासाची पवित्र भावना लक्षात घेत मुस्लिम बांधवांना आपल्या निवासस्थानी अत्यंत आदरपूर्वक निमंत्रित करून त्यांना शुभेच्छा देत एकत्र भोजन घेण्याची परंपरा जपली आहे.ही बाब लक्षात घेऊन हजारो मुस्लिम बांधवांनी भीमराव धोंडे यांना धन्यवाद दिले.भारत हा विविध जाती धर्म पंथांनी नटलेला विविध अंगी देश आहे. सुंदर पर्वतरांगा.. भौगोलिक परिसर.. तसेच विविध सण परंपरा उत्सव यांचीही येथे रेलचेल असते. विविधतेतून एकता जपणाऱ्या या राष्ट्रात ऐक्य बंधुभाव सामाजिक सलोखा सर्वधर्मसमभाव या मूल्यांची जपणूक करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याचे यावेळी उपस्थितानी आपल्या संवादा दरम्यान भावना व्यक्त केल्या. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या