Ticker

6/recent/ticker-posts

बीड जिल्ह्यात आष्टीच्या 'पंडित पॅटर्न'चा डंका! --------------- दहावी-बारावीत 'कॉपीमुक्ती' तर एन.एम.एम.एस.परीक्षेत ११२ विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

आष्टी (प्रतिनिधी) दुष्काळग्रस्त आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्याला आता एका नव्या आणि सकारात्मक 'शैक्षणिक पॅटर्न'ने ओळख मिळवून दिली आहे.आष्टी येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाने प्राचार्य सुरेश बोडखे यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या 'पंडित पॅटर्न'चा सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यात बोलबाला आहे.दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात यशस्वीरीत्या पार पाडण्यासोबतच एन.एम.एम.एस.परीक्षेत शाळेच्या तब्बल ११२ विद्यार्थ्यांनी यश संपादन करून जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.एक परिवर्तनाची लाट बीड जिल्ह्याला लागलेला शैक्षणिक मागासलेपणाचा कलंक पुसून काढण्यासाठी आष्टी,पाटोदा, शिरूर मतदार संघाचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी'शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची'स्थापना केली.पूर्वी शिक्षणासाठी बीड किंवा अंबाजोगाईला जावे लागणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांसाठी आष्टीतील'आनंद शैक्षणिक संकुलात'सर्व सुविधा उपलब्ध झाल्या. आज याच संस्थेतून शिक्षण घेतलेले शेतकरी आणि ऊसतोड कामगारांचे पाल्य डॉक्टर,इंजिनिअर, वकील, पोलीस अधिकारी आणि तहसीलदार म्हणून सन्मानाने कार्यरत आहेत.याच संस्थेची'पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय'ही शाखा आता जिल्ह्यासाठी'पंडित पॅटर्न'म्हणून नावारूपाला आली आहे.प्रवेशासाठी पालकांच्या रांगा आणि मुलाखती सध्या अनेक शाळा विद्यार्थी संख्या कमी असणे,अतिरिक्त शिक्षक आणि तुकड्या टिकवण्याच्या समस्येने ग्रस्त आहेत.मात्र,'पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे'चित्र याउलट आहे. प्रवेशासाठी चढाओढ: ------------- या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकांच्या अक्षरशः रांगा लागतात. पालकांची मुलाखत: प्रवेशासाठी थेट पालकांचीच मुलाखत घेणारी शाळा म्हणून या विद्यालयाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या सर्व यशाचे श्रेय प्राचार्य सुरेश बोडखे यांचे कुशल नेतृत्व,त्यांचा शांत-संयमी स्वभाव आणि शाळेच्या प्रगतीचा ध्यास याला दिले जात आहे. 'परीक्षा पे चर्चा'आणि शंभर टक्के'कॉपीमुक्ती' यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्या.यासाठी शाळेने विशेष नियोजन केले होते: विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर करण्यासाठी'परीक्षा पे चर्चा'तज्ज्ञ शिक्षकांची व्याख्याने आणि अभ्यासाचे अचूक नियोजन करण्यात आले.एच.एस.सी.बोर्डाच्या परीक्षांसाठी प्राचार्य सुरेश बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली,उपप्राचार्य एस.जी.भवर आणि केंद्रप्रमुख एस.पी.फुले यांच्या नेतृत्वात परीक्षेचे नियोजन चोखपणे पार पडले.यामुळेच'कॉपीमुक्ती'च्या अभियानाला मोठे यश आले. एन.एम.एम.एस.परीक्षेत उत्तुंग भरारी नुकत्याच झालेल्या एन.एम.एम.एस.शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील तब्बल ११२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या घवघवीत यशामुळे'आष्टीच्या पंडित पॅटर्न'ची चर्चा आता संपूर्ण राज्यभर होऊ लागली आहे. मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव: विद्यालयाच्या या चौफेर यशाबद्दल शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजय धोंडे,अभय धोंडे,राजेंद्र धोंडे यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी,शिक्षक आणि प्राध्यापकांनी प्राचार्य सुरेश बोडखे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन केले आहे. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या