विशेष लेख
-----------
उत्तम बोडखे,
ज्येष्ठ पत्रकार आष्टी
----------------
चौकट
------------
एखाद्या माणसाचा जीवन प्रवास जेव्हा प्रतिकूल परिस्थितीच्या वाटेवरून सुरू होतो आणि तो स्वतःच्या जिद्दीने ज्ञानाचा मळा फुलवतो,तेव्हा तो प्रवास केवळ एका व्यक्तीचा राहत नाही,तर तो संपूर्ण समाजासाठी एक 'दीपस्तंभ' ठरतो.आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय उपप्राचार्य आणि लोकप्रशासन विभागप्रमुख प्रा.डॉ.भास्कर चव्हाण यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ आणि समर्पित शैक्षणिक सेवाकाळ असाच प्रेरणादायी आहे.आपल्या अमोघ ज्ञानसेवेनंतर ते आता सेवानिवृत्त होत आहे.एका संघर्षमय पर्वाचा एका अर्थाने हा गौरवशाली टप्पा आहे.संघर्षाच्या मुशीत जडणघडण
डॉ.चव्हाण यांचा जन्म ३ मार्च १९६६ रोजी आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे झाला.वडील मारुती आणि आई इंद्राबाई हे अत्यंत कष्टकरी दांपत्य.मूळचे डोंगरगणचे असलेले हे कुटुंब परिस्थितीमुळे शिरापूरला स्थायिक झाले.त्यांचे बंधू झुंबर चव्हाण यांनी सलग १५ वर्षे सरपंचपद भूषवत गावाला विकासाची नवी दिशा दिली.आई इंद्राबाई या निरक्षर असल्या तरी,पुस्तक वाचता आले नाही तरी माणसं वाचता आली पाहिजेत,ही त्यांची शिकवण होती.या जगण्याच्या तत्त्वज्ञानावरच डॉ.चव्हाण यांची जडणघडण झाली.
जिद्दीने गाठले उच्च शिक्षणाचे शिखर घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही शिक्षणाची कास त्यांनी सोडली नाही.शिरापूरच्या जि.प.शाळेतून सुरू झालेला त्यांचा प्रवास कड्याचे अमोलक विद्यालय आणि आष्टी येथील हंबर्डे महाविद्यालयातून पुढे गेला.छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर व एम.फिल.पूर्ण केले आणि डॉ.प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.संपादन केली.३५ वर्षांची ज्ञानसेवा आणि प्रशासकीय ठसा शिक्षणमहर्षी आ.भीमराव धोंडे यांच्या प्रयत्नातून १९९० मध्ये कडा येथे महाविद्यालयाची स्थापना झाली.चव्हाण कुटुंबाची सामाजिक बांधिलकी आणि निष्ठा ओळखून धोंडे यांच्या आशीर्वादाने १९९१ मध्ये डॉ.चव्हाण यांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवेला सुरुवात केली.गेल्या साडेतीन दशकांत त्यांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय पातळीवर स्वतःचा वेगळा ठसा उमटवला.
लोकप्रशासन विषयात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ३५ संशोधन निबंध सादर केलेले आहेत.चार राष्ट्रीय स्तरावरील पुस्तकांमध्ये लेखांचा समावेश आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन अभ्यास मंडळावर २००७,२०१३ आणि २०१७ मध्ये सदस्य म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राज्य व राष्ट्रीय परिसंवादांचे यशस्वी आयोजन केलेले आहे.राष्ट्रीय सेवा योजने'चे यशस्वी कार्यक्रम
अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.२०२१ पासून उपप्राचार्य म्हणून महाविद्यालयाची प्रशासकीय धुरा अत्यंत कुशलतेने सांभाळली.
विद्यार्थ्यांचा 'माणूस'लोकप्रशासन हा विषय अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगण्याची त्यांची हातोटी त्यांना विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय करून गेली.साधेपणा,प्रामाणिकपणा आणि कामातील सातत्य यामुळे ते सहकाऱ्यांसाठीही नेहमीच आदराचे स्थान राहिले आहेत.आज सोमवार दि.३० मार्च रोजी सेवानिवृत्त होत असताना,त्यांनी उभा केलेला ज्ञानाचा आणि संघर्षाचा आदर्श येणाऱ्या अनेक पिढ्यांना नक्कीच दिशादर्शक ठरेल.
----------------
शेतकरीपुत्र उपप्राचार्य डॉ.भास्कर चव्हाण सर अभ्यासाच्या जोरावर उच्च पदस्थ झाले आहेत.आष्टी शहरातील शिक्षण क्षेत्रामध्ये आपले नाव अधोरेखित करीत स्वतःच्या कुटुंबासह समाज व्यवस्थेतील अनेकांच्या माध्यमातून उच्च शिक्षण आणि त्याचे महत्त्व सांगून नवा अध्याय रचणारे उपप्राचार्य डॉ. भास्कर चव्हाण सर यांचा नामोल्लेख करण्यासारखा आहे.कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयातील काॕलेजमधील उपप्राचार्य या पदावर प्रामाणिकपणे आणि सक्षमपणे काम केल्यानंतर डॉ.भास्कर चव्हाण सर आज सेवानिवृत्त होत आहेत.एका शेतकरी कुंटुंबात जन्म घेतल्यानंतर प्रतिकूल परिस्थिती आणि कठीण परिस्थितीत सुद्धा यशोशिखर गाठले आहे.दि.३ जानेवारी १९६६ रोजी भास्कर चव्हाण सरांचा जन्म झाला.पहिलीपासून प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासह उच्च शिक्षण त्यांनी चांगल्या गुणांनी पार पाडले.पदवी घेतल्यानंतर त्यांनी लोकप्रशासन या विषयाचे अध्यापक म्हणून ३५ वर्ष कर्तव्य सेवा बजावली आहे. कडा येथील शिक्षण क्षेत्रामध्ये नामांकित अशा आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात त्यांनी ही सेवा अत्यंत सन्मानाने आणि प्रमाणिकपणे केली.मारुती चव्हाण आणि इंद्राबाई चव्हाण या त्यांच्या आई वडिलांच्या कठोर परिश्रम जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या प्रेरणेतून त्यांनी अनेक मुलांना शिक्षण आणि संस्काराचे धडे दिले वडील शेती व्यवसाय करत असले तरी मुलांनी मोठ्या मोठ्या पदावर जावे आणि घराण्याचे नाव कमवावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती.ती इच्छा उपप्राचार्य डॉ.भास्कर चव्हाण सर यांनी पूर्ण केले आहे.
उपप्राचार्य डॉ.भास्कर चव्हाण यांच्या शिक्षण क्षेत्रातील यश आणि प्रगती पाठीमागे त्यांच्या आई वडिलांचा मोठा आधार,त्याग आहे.आई वडीलांचे तसे शिक्षण जेमतेमच म्हणावे लागेल पण शिक्षणाचे महत्व काय आहे ते त्यांना नक्कीच माहित होते.कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी शिस्त असणे गरजेचे असते.ती शिस्त त्यांनी आपल्या मुलांना अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून लावण्याचे काम केले.दोघेही कडक शिस्तिचेच पण प्रेमळ.मार्गदर्शन आणि मुलांवर किती कटाक्षानं लक्ष असायला पाहिजे त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे उपप्राचार्य डॉ.भास्कर चव्हाण सर यांचे मातापिता.
३५ वर्षाहुन अधिक काळ शिक्षण क्षेत्रात काम करीत असलेले एक शिस्तप्रिय शांत संयमी प्राध्यापक असा नावालौकीक प्राप्त करणारे कडा शहरातील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयातील प्राध्यापक भास्कर चव्हाण सर यांचा आज सेवापूर्ती सोहळा होत आहे.आष्टी तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात ज्या नावाचा उल्लेख केला जातो ते उपप्राचार्य डॉ.भास्कर चव्हाण सर आहेत.दि.३१ मार्च २०२६ रोजी ३५ वर्षेचा सेवाकाल पुर्ण करुन आज ते सेवानिवृत्त होत आहेत.भास्कर चव्हाण सर हे धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने धार्मिक कार्यात सक्रिय असतात.अभ्यासु,चांगली वर्तवणुक असल्याने समाजात त्यांना आदराचे स्थान प्राप्त झालेले आहे.सेवानिवृत्त होत असलेले उपप्राचार्य भास्कर चव्हाण यांचे कुटुंब उच्चशिक्षित वेल सेटल आहे.अत्यंत संयमी शांत आणि धीरदत्त स्वभावाचे उपप्राचार्य डॉ.भास्कर चव्हाण सर सेवानिवृत्त होत आहेत.या चव्हाण परिवारामध्ये उच्च शिक्षणाची मुहूर्त मिळवून एक नवा प्रेरणादायी इतिहास घडवणारे उपप्राचार्य डॉ.भास्कर चव्हाण सर हे आष्टी तालुक्यातील एक उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणून नावारूपाला आले आहेत.या उच्चशिक्षित आणि विविध क्षेत्रांमध्ये आपला नावलौकिक करत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशस्वी आनंदी आध्यात्मिक जीवन जगणारे उपप्राचार्य भास्कर चव्हाण सर यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या भविष्यातील आनंदी यशदायी जीवनासाठी तमाम त्यांच्या शिष्यांकडून मनापासून प्रार्थना करण्यात येत आहे.
उपप्राचार्य डॉ.भास्कर चव्हाणसर यांना सेवापुर्ती निमित्त दैनिक झुंजारनेता परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा..
---लेखक-
उत्तम बोडखे,आष्टी.
-----------------


0 टिप्पण्या