Ticker

6/recent/ticker-posts

'बलभीम शिंदे सर एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व' -- माजी आ. भीमराव धोंडे

उत्तम बोडखे, आष्टी. ------------------ अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयातून १९९६ साली निवृत्त झालेले अत्यंत शिस्तबद्ध व आदर्श शिक्षक बलभीम दशरथ शिंदे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन आणि पुस्तक प्रकाशन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. शिंदे सरांनी अत्यंत कडक शिस्तीतून अनेक विद्यार्थी घडविले,ते माझ्यासाठी आणि सर्वांसाठीच खऱ्या अर्थाने ऋषीतुल्य आहेत असे भावोद्गार या सोहळ्याचे अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे यांनी काढले. कडा येथील अंबिका लॉन्समध्ये मोतीलाल कोठारी विद्यालय माजी विद्यार्थी मंडळाच्या
वतीने या भव्य कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या मंचावर अध्यक्षस्थानी माजी आ.भीमराव धोंडे,तर स्वागताध्यक्ष म्हणून किशोर हंबर्डे उपस्थित होते.गोकुळदास मेहेर,यशभैय्या आजबे आणि राधेश्याम धस आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आ.साहेबराव दरेकर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सदिच्छा भेट देऊन शिंदे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ९० दिव्यांनी औक्षण व पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शिंदे यांचे ९० दिव्यांनी करण्यात आलेले औक्षण.सौ.मंदाकिनी शिंदे,डॉ.ज्योती पोकळे,सौ.प्रीती काळे,प्रा.विद्या शिंदे आणि डॉ.रुपाली शिंदे यांनी सरांचे औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यानंतर मान्यवरांच्या हस्ते बलभीम शिंदे लिखित 'इंग्लिश ए टू झेड'या पुस्तकाचे शानदार प्रकाशन करण्यात आले.वयाच्या ९० व्या वर्षी पुस्तक लेखनाचा उत्साह दाखविल्याबद्दल सरांचे विशेष कौतुक करण्यात आले.यावेळी पुस्तकाचे टाईप सेटिंग करणारे शुभम निकाळजे यांचाही गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांचा कृतज्ञता भाव याप्रसंगी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.श्रीगोंदा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शिवाजी केकाण,पुण्याचे आरटीओ इन्स्पेक्टर अविनाश दळवी, पासपोर्ट ऑफिसर भीमराव कुऱ्हाडे, कॅप्टन राजू काळे, श्रीराम लेकुरवाळे,नितीन काळे,डॉ. महेंद्र पटवा,डॉ. रुपाली शिंदे आणि सदानंद जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आरटीओ इन्स्पेक्टर अविनाश दळवी यांनी सरांच्या ९० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून १०० वृक्ष लावण्याचा स्तुत्य संकल्प जाहीर केला. कॅप्टन राजू काळे यांनी सध्याच्या काळात शिक्षणाचा खालावत चाललेला दर्जा यावर चिंता व्यक्त करत, संस्थाचालकांनी याबाबत गांभीर्याने जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. आजच्या पिढीला शिस्तबद्ध शिक्षकांची गरज स्वागताध्यक्ष किशोर हंबर्डे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शिंदे सरांच्या शिस्तीचे किस्से आम्ही ऐकून आहोत.आजच्या तरुण पिढीला योग्य दिशा देण्यासाठी खऱ्या अर्थाने अशाच शिक्षकांची नितांत गरज आहे.अध्यक्षीय समारोप करताना माजी आ. भीमराव धोंडे यांनी शिंदे सरांचे अभिनंदन करत त्यांच्या कठोर शिस्तीमुळेच आज अनेक विद्यार्थी उच्च पदावर पोहोचल्याचे नमूद केले.मान्यवरांची व माजी विद्यार्थ्यांची मोठी मांदियाळी या सोहळ्याला आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अतुलकुमार मेहेर,अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष योगेश भंडारी, प्रधानमंत्री हेमंत पोखर्णा व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.आष्टी येथील हंबर्डे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे,आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संजय धोंडे,इंदिरा कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल राऊत,आष्टीचे नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तानाजी जंजिरे,कडा गावचे सरपंच युवराज पाटील,माजी सरपंच अनिल ढोबळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी,कल्याण पोकळे,डॉ.अशोक गांधी,सुनील नाथ,उद्योजक कृष्णा पानसंबंळ,डॉ.प्रकाश भोसले,डॉ.कमलेश योगे,जगन्नाथ ढोबळे पाटील,नारायण शिनगारे,माणिकराव लगड,बापूराव शेळके,डॉ.सुरेखा देवकर, अशोक गवारे,ॲड.शरद चौधरी,डॉ.राजेश पाखरे यांच्यासह १९६४ ते १९९६ पर्यंतच्या बॅचचे माजी विद्यार्थी,कडा परिसरातील सर्व डॉक्टर्स व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे यांनी तर उपस्थितांचे आभार सौ.मंदाकिनी शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ.रवी सातभाई यांनी केले. --------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या