Ticker

6/recent/ticker-posts

१० वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा 'बाबुशेठ टायरवाले' अखेर जेरबंद!

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील सावरगाव घाट परिसरातील पवन ऊर्जा प्रकल्पावरील रखवालदार यांना देण्यात येणाऱ्या पगारावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारी मध्ये झाले पवन ऊर्जा प्रकल्पांच्या मालकाच्या वतीने एजंटगिरी करणाऱ्या बाबुशेठ टायरवाले यांनी अहिल्यानगर येथून येऊन या ठिकाणी येऊन हाणामारी केली होती अंभोरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७/१६ तत्कालीन भादवि कलम ३०७ अन्वये हा गुन्हा दाखल झाला होता त्यातील इतर आरोपींना अटक झाली होती मात्र बाबुशेठ टायरवाले हा या प्रकरणांमध्ये पोलिसांना सापडत नव्हता सावरगाव येथील पवन ऊर्जा प्रकल्पांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करून मागील तब्बल दहा वर्षांपासून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून मोकाट फिरणारा अहिल्यानगर शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले ऊर्फ बाबू सुब्रमण्यम कांबळत याला अखेर अंभोरा पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.या अटकेमुळे राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.१० वर्षांचा 'फरार' प्रवास आणि पोलिसांची कारवाई २०१६ साली घडलेल्या एका जीवघेण्या हल्ल्याच्या गुन्ह्यात बाबू सुब्रमण्यम कांबळत याचे नाव मुख्य आरोपी म्हणून निष्पन्न झाले होते.मात्र,गुन्हा दाखल झाल्या पासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.एक-दोन महिने नव्हे,तर तब्बल एक दशक (१० वर्षे) हा आरोपी राजरोसपणे मोकाट फिरत होता.तो पोलिसांना का सापडत नव्हता? हा प्रश्न गेले अनेक दिवस संशयाचे धुके निर्माण करत होता.अखेर पोलिसांना मिळालेल्या एका खात्रीलायक गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला आणि बाबुशेठला बेड्या ठोकण्यात तपास यंत्रणांना यश आले. यातून काय खुलासे याकडे लक्ष लागून आहे. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या