Ticker

6/recent/ticker-posts

बीडचा सुवर्णवेध ! भूमिपुत्र योगेश क्षीरसागर देशात प्रथम ---------------------------- राष्ट्रीय युवा महोत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा डंका

आष्टी (प्रतिनिधी) कलेची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या ग्रामीण भागातील तरुणाने आपल्या अंगभूत प्रतिभेच्या आणि कठोर परिश्रमाच्या बळावर थेट राष्ट्रीय पातळीवर सुवर्णभरारी घेतली आहे.बीडचा भूमिपुत्र असलेल्या योगेश क्षीरसागर याने चेन्नई येथे पार पडलेल्या ३९ व्या आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवात (युनिफेस्ट) 'तालवाद्य' प्रकारात संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.१४१ विद्यापीठांच्या स्पर्धेत मारली बाजी भारतीय विद्यापीठ संघाच्या
वतीने चेन्नई येथील सत्यभामा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे या राष्ट्रीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील तब्बल ८ झोनमधून विजेत्या ठरलेल्या १४१ विद्यापीठांनी या महोत्सवात आपला सहभाग नोंदवला होता.देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या कसलेल्या कलावंतांच्या मांदियाळीत योगेशने आपल्या बोटांची जादू दाखवत परीक्षकांची आणि रसिकांची मने जिंकली.मराठवाडा विद्यापीठाची उल्लेखनीय कामगिरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने या महोत्सवात एकांकिका,इंग्रजी वक्तृत्व,ऑन द स्पॉट पेंटिंग,पोस्टर आणि तालवाद्य अशा एकूण ५ कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. यातील तीन प्रकारांत विद्यापीठाने घवघवीत यश मिळवले आहे. योगेश क्षीरसागर: तालवाद्य (प्रथम क्रमांक - सुवर्णपदक) सांज घुगे इंग्रजी वकृत्व (द्वितीय क्रमांक) ऑन द स्पॉट पेंटिंग (चौथा क्रमांक) विद्यापीठाच्या एकांकिका संघानेही अत्यंत दमदार सादरीकरण केले आहे.या स्पर्धेचा अंतिम निकाल येत्या ७ एप्रिल रोजी जाहीर होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.११ वर्षांच्या कठोर साधनेला फळ सुवर्णपदक विजेता योगेश रामदास क्षीरसागर हा बीड तालुक्यातील बोरखेड या छोट्याशा गावचा रहिवासी आहे.कोणत्याही यशामागे गुरूचे मार्गदर्शन आणि शिष्याची साधना असते हे योगेशने सिद्ध केले आहे. त्याने मृदंग महर्षी पंडित केशवजी जगदाळे गुरुजी (लिंबागणेश) यांच्याकडे सलग ११ वर्षे तालवाद्याचे अत्यंत काटेकोर शिक्षण घेतले.त्याच्या याच तपश्चर्येचे रूपांतर आज राष्ट्रीय सुवर्णपदकात झाले आहे.या संपूर्ण स्पर्धेत विद्यापीठाच्या संघात आकाश गुंजाळ,सुमित काकडे, संकेत महालकर,पवन दशरथ,चेतन पोळ,रवींद्र कोलते,रोशनी वाघमारे,सांची आरक, नेहा इंगोले,साहिल मेंगडे यांच्यासह योगेश आणि सांज यांचा सहभाग होता.संघाचे सांस्कृतिक समन्वयक तथा संघव्यवस्थापक म्हणून गौतम सोनवणे तर महिला संघप्रमुख म्हणून कविता दिवेकर यांनी यशस्वी मार्गदर्शन केले.साथी कलावंत म्हणून संजय जाधव,राजेश मुंगसे,रामेश्वर पडुळे, संतोष वाघमारे,पार्थ दायमा,प्राची भोयर,संतोष जोगदंडे आणि सुवर्णा घुगे यांनी मोलाचे सहकार्य केले.मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव विद्यापीठाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल कुलगुरू डॉ.विजय फुलारी,प्र-कुलगुरू डॉ.वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर व विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी संपूर्ण संघाचे आणि विशेषतः योगेश क्षीरसागरचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. चौकट --------- ग्रामीण भागातील एक तरुण जेव्हा देशपातळीवर राज्याचे आणि आपल्या जिल्ह्याचे नाव रोशन करतो,तेव्हा ती केवळ एक बातमी राहत नाही,तर ती अनेक तरुणांसाठी एक प्रेरणादायी यशोगाथा बनते. योगेशचा हा प्रवास बीडच्या मातीतील कलागुणांची समृद्धी दर्शवणारा आहे. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या