आष्टी (प्रतिनिधी)
शासकीय सेवेतील उच्च पदाची जबाबदारी सांभाळत असतानाच आपल्यातील कलेचा व्यासंग जिवंत ठेवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आष्टीचे सुपुत्र प्रा.गौतम खंडागळे आणि त्यांच्या 'स्वर साधना आर्केस्ट्रा'ने एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील विविध शहरे आणि खेड्यापाड्यांमध्ये १४७ हून अधिक यशस्वी प्रयोग करत त्यांनी संगीत क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.आष्टी तालुक्यातील
शेरी बु.येथील मूळ रहिवासी असलेले प्रा.गौतम खंडागळे यांचे शालेय शिक्षण मोतीलाल कोठारी विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण कडा शहरातील आनंदराव धोंडे महाविद्यालयात झाले आहे.सध्या ते शासकीय नोकरीच्या निमित्ताने ठाणे येथे स्थायिक आहेत.नोकरीच्या धकाधकीतही त्यांनी आपला संगीताचा छंद केवळ जोपासलाच नाही, तर 'स्वर साधना' या मराठी- हिंदी गीतांच्या आर्केस्ट्राच्या माध्यमातून तो अधिक वृद्धिंगत केला.लग्नसोहळे, वाढदिवस,गेट-टुगेदर,जयंती उत्सव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपल्या सुमधुर सादरीकरणाने रंगत आणण्याची त्यांची हातोटी सर्वश्रुत झाली आहे.


शाही विवाह सोहळ्यात
रसिकांना केले मंत्रमुग्ध..
-----------
अलीकडेच आष्टी शहरातील साईदत्त लॉन्स येथे डॉ.शिवानी बोडखे आणि डॉ.सत्यजित विधाते यांच्या नुकत्याच पार पडलेल्या शाही विवाहसोहळ्यानिमित्त 'स्वर साधना' चा विशेष बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी गायिका अस्मिताताई सुरवसे यांनी गायलेल्या सुंदर मंगलाष्टकांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.'स्वर साधना' च्या या संचामध्ये गायक कथा प्रशासकीय
अधिकारी मुंबई प्रा.गौतम खंडागळे यांच्यासह अस्मिता सुरवसे (गायिका),ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल बीड सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रियंका भंडारे (गायिका) नेकनुर,कैवल्य सुरवसे,प्रियंका भंडारी,संध्या जाधव,निशा उजगरे या गुणी कलाकारांचा समावेश असून,त्यांच्या एकत्रित सादरीकरणाने उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळी आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या शानदार सादरीकरणाचे राजकीय,सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी भरभरून कौतुक केले.यावेळी प्रामुख्याने आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे, माजी आ.साहेबराव दरेकर,माजी आ.बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,ज्येष्ठ पत्रकार अनंता हंबर्डे,रयतचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव मस्के,डॉ.संदीप गाडे,डॉ.मुकुंद विधाते,सतीशआबा शिंदे,विजय गोल्हार, डॉ.शिवाजी राऊत,सुभाष राऊत (बीड),अण्णासाहेब चौधरी,काकासाहेब शिंदे,अमोलराजे तरटे,भाऊसाहेब लटपटे,डॉ.विलास सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.या सर्व राजकीय नेत्यांसह धार्मिक,सामाजिक,शिक्षण,व्यापार आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी प्रा.खंडागळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
----------------
0 टिप्पण्या