आष्टी (प्रतिनिधी)
अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून ग्रामीण भागातून पुढे येत डॉक्टर होण्याचे स्वप्न मणी बाळगून ध्येयवाद आणि कष्टाच्या बळावर अखेर डॉक्टर स्वप्नील महादेव सानप यांनी एमबीबीएस ही पदवी पूर्ण करून आपल्या स्वप्नाची पूर्ती केली आहे.डॉ.स्वप्नील सानप हा नुकताच एमबीबीएस पूर्ण करून परदेशातून भारतात आणि आपल्या जन्मभूमी बीड येथे आला आहे.शिक्षण क्षेत्रातील गुनी जणांनी त्याचे आज सोमवारी येथे स्वागत केले आहे.मुख्याध्यापक महादेवराव सानप आणि आदर्श शिक्षिका वर्षाताई महादेवराव सानप यांचा डॉ.स्वप्नील हा मुलगा आहे.त्यांची मुलगी आणि जावाई सुद्धा डॉक्टर आहेत. पाटोदा तालुक्यातील खडकवाडीचे सरपंच प्रा.संजय सानप त्याचे चुलते आहेत.अत्यंत शिस्तप्रिय शांत,
अभ्यासू आणि गुनी विद्यार्थी म्हणून डॉ.स्वप्नील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालया पासून ओळखला जातो.नुकतीच त्याने एमबीबीएस ही आरोग्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पदवी पूर्ण केल्याने स्वप्नपूर्तीचा नक्कीच आनंद व समाधान असल्याचे वडील मुख्याध्यापक एम.बी.सानप म्हणाले.दरम्यान भविष्यात पदव्युत्तर पदवी घेत

सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी शेतमजुरांच्या आरोग्यसेवेसाठी आपण अत्यंत प्रमाणिकपणे कर्तव्य बजावू अशी भावना डॉ.स्वप्नील सानप यांने व्यक्त केली.
चौकट
-------
डॉ.स्वप्निल महादेव सानप यांच्या या यशाचे कौतुक करत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी भाषा विषय शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा.सुनील डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा अध्यक्ष डॉ.आत्माराम झिंजुर्डे, कार्याध्यक्ष डॉ.अशोक देवगडे,बीड जिल्हा सचिव प्रा.बिभीषण चाटे यांनी अभिनंदन केले आहे.
------------------------------
0 टिप्पण्या