आष्टी (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरणाचा जागर करणारा भव्य महिला मेळावा व 'जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार २०२६' वितरण सोहळा रविवारी दि.१५मार्च रोजी आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. ------------------ दातृत्व आणि मातृत्वाचा वसा समर्थपणे जपणारे गायकवाड दाम्पत्य! ----------------- मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड व तानुबाई बिरजे पत्रकार परिषद,आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने बीडसांगवी येथील भैरवनाथ मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात रविवारी सायंकाळी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील महानंद संस्थेच्या संचालिका शिवमती सौ.प्राजक्ताताई सुरेश धस या होत्या. गायकवाड दाम्पत्याच्या कार्याची पावती कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.प्राजक्ताताई धस व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे आणि दातृत्वासाठी ओळखले जाणारे जयदीप कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक,शासकीय गुत्तेदार शिवश्री परिवंत उत्तम गायकवाड यांना 'जिजाऊ माँसाहेब आदर्श समाजसेवक पुरस्कार'प्रदान करण्यात आला.कऱ्हेवडगावच्या सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शिवमती सौ.वंदना परिवंत गायकवाड यांना'जिजाऊ माँसाहेब आदर्श महिला सरपंच पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.दातृत्व आणि मातृत्व या दोन्ही मूल्यांचा आदर्श जपत समाजासाठी झटणाऱ्या या दाम्पत्याचा एकाच मंचावर विशेष सन्मान झाल्याने उपस्थित शेकडो नागरिकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. गौरविण्यात आलेले सत्कारमूर्तींचे नावे पुढीलप्रमाणे... शिवमती शेख मिनाज शेख सिकंदर (आदर्श शिक्षिका), शिवश्री विकास उत्तम साळवे,(आदर्श रुग्णसेवक),शिवश्री केतन बाबासाहेब काकडे (आदर्श शिक्षक),शिवश्री सुरेश चंद्रकांत तळेकर (आदर्श शिक्षक),शिवश्री बाबासाहेब आसराजी मुळीक (आदर्श शिक्षक), शिवश्री बाबासाहेब महादेव पवार (आदर्श शिक्षक), शिवश्री बाळासाहेब बाबासाहेब तळेकर (आदर्श शिक्षक), शिवश्री भाऊसाहेब विठ्ठल खाडे (आदर्श व्यावसायिक), ह.भ.प.शिवश्री भागचंद शिवराम झांजे (आदर्श कीर्तनकार), शिवश्री अमृत संभाजी आजबे (आदर्श तारतंत्री), ह.भ.प.शिवमती राणी माधव दरंदले (उत्कृष्ट निवेदिका), शिवमती मुमताज राजू शेख (आदर्श मुख्याध्यापिका), शिवमती मंदाकिनी एकनाथ तांदळे (आदर्श बस वाहक),शिवमती स्नेहलता हिरामण थोरवे (आदर्श मुख्याध्यापिका), डॉ.शिवश्री विष्णू तात्यासाहेब साबळे (आदर्श पशुधन विकास अधिकारी), शिवश्री दत्तात्रय खोटे (आदर्श सरपंच), शिवमती ज्योती संजय पवार (आदर्श अबॅकस शिक्षिका),शिवश्री शहाजी आप्पा कोकणे (आदर्श शेतकरी),शिवश्री बबन श्रीराम शिंदे (आदर्श शेतकरी), शिवमती वंदना परिवंत गायकवाड (आदर्श महिला सरपंच), पत्रकारिता क्षेत्र --------------- शिवश्री उत्तम बोडखे (आदर्श संपादक),शिवश्री अविनाश कदम, (आदर्श पत्रकार), शिवश्री अण्णासाहेब साबळे (आदर्श पत्रकार),शिवश्री अतुल जवणे (आदर्श पत्रकार), शिवश्री राजेंद्र वाळके (आदर्श पत्रकार),शिवश्री शरद रेडकर , (आदर्श पत्रकार), शिवश्री रघुनाथ कर्डिले (आदर्श पत्रकार),शिवश्री आदिनाथ ठोंबरे (आदर्श पत्रकार), अमोल जगताप (आदर्श पत्रकार), शिवमती उज्वला लटपटे (आदर्श शिक्षिका),शिवश्री संदीप औटे (आदर्श शिक्षक),शिवश्री कल्याण वाल्हेकर (आदर्श शिक्षक), शिवश्री संतोष दाणी (आदर्श मुख्याध्यापक), शिवश्री शेख अबरार (आदर्श रुग्णसेवक),शेख समीर बादशहा (आदर्श समाजसेवक) शिवमती कुसुम थोरवे (आदर्श अंगणवाडी सेविका),शिवमती रंजना शिंदे (आदर्श अंगणवाडी सेविका),शिवमती शेख नजमा (आदर्श साहित्यिक),शिवश्री नवनाथ पोकळे (आदर्श साहित्यिक), शिवश्री परिवंत गायकवाड (आदर्श समाजसेवक), शिवमती स्नेहलता राऊत (आदर्श आरोग्य सेविका),शिवश्री रुपेश निकाळजे (आदर्श नाट्य कलाकार) यांचा समावेश आहे. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रेरणादायी व्याख्यात्या शिवमती तेजश्री मुळे,जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय उपाध्यक्षा शिवमती सुवर्णा गि-हे,मराठा सेवा संघ आष्टीचे कार्याध्यक्ष शिवश्री लक्ष्मण रेडेकर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा शिवमती वर्षाताई माने,मराठा सेवा संघ आष्टीचे तालुकाध्यक्ष शिवश्री इंजि.तानाजी जंजिरे, अ‍ॅड.कांतीलाल गव्हाणे,बीड जिल्हाध्यक्षा शिवमती संगीताताई शिंदे व बीडसांगवीच्या सरपंच शिवमती शितल करांडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी वक्त्यांनी महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणादायी विचारांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यांच्या पुढाकाराने सोहळा यशस्वी या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवश्री अ‍ॅड. सीताराम पोकळे, निवड समितीचे अध्यक्ष शिवश्री प्रा.डॉ.बाबासाहेब मुटकुळे,जिजाऊ ब्रिगेड आष्टीच्या तालुकाध्यक्षा शिवमती आशा करांडे,सचिव शिवश्री दादासाहेब पवळ,सौ.विद्या चव्हाण,शिवश्री सुरेश पवार,शिवश्री प्रा.दत्ता नरसाळे,शिवश्री भास्करराव निंबाळकर यांनी विशेष पुढाकार घेतला.शिवश्री अंकुश तळेकर,राजू म्हस्के,अशोक मुटकुळे यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या निर्मलाताई सोनवणे,माधुरी तवले,अर्चना पोकळे आदी महिला पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता.शेकडो नागरिकांची उपस्थिती या सोहळ्यास शिवश्री ह.भ.प.श्रीहरी पुरी महाराज,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,पत्रकार अविनाश कदम, बबनदादा शिंदे, सरपंच दत्तात्रय खोटे यांच्यासह राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर शरद रेडेकर,अमोल जगताप आदी उपस्थित होते.परिसरातील महिला व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवमती सौ.मनिषा चवरे यांनी केले.सूत्रसंचालन शिवश्री दिनेश पोकळे आणि शिवश्री बाळासाहेब तळेकर यांनी तर उपस्थितांचे आभार शिवमती आशा करांडे यांनी मानले. ----------------- चौकट ---------- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने बीडसांगवी येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी हा मेळावा झाला.या मेळाव्यास पुणे येथील प्रेरणादायी व्याख्यात्या शिवमती तेजश्री मुळे,जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष शिवमती वर्षाताई माने,ॲड.कांतीलाल गव्हाणे,सौ.मनीषा चौरे,यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महानंद डेअरीच्या संचालिका शिवमती सौ.प्राजक्ताताई धस यांनी भूषविले. ----------------