Ticker

6/recent/ticker-posts

सौ.प्राजक्ताताई धस यांच्या हस्ते डॉ.आशा फड यांना 'राज्यस्तरीय नारी सन्मान' पुरस्कार प्रदान

आष्टी (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांना देण्यात येणारा यंदाचा उत्कृष्ट लेखिका साहित्यिक राज्यस्तरीय नारी सन्मान पुरस्कार हिंदी साहित्य क्षेत्रातील अभ्यासक लेखिका डॉ.आशा फड यांना आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ.प्राजक्ताताई धस यांच्या व ह.भ.प.राधाताई सानप यांच्या हस्ते गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने,महिला व बाल विकास अधिकारी ज्योती बेल्हेकर,गटशिक्षणाधिकारी मोहन काकडे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज सन्मानचिन्ह प्रमाणपत्र शाल श्रीफळ आणि फेटा बांधून प्रदान करण्यात आला.डॉ.आशा फड यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक लेखणीतून महिलांच्या समस्या प्रश्न आणि वास्तवावर प्रबोधनात्मक साहित्य निर्मिती केली आहे.अनेक वृत्तपत्रातूनही राष्ट्र पुरुषांच्या कार्यावर प्रकाश टाकला आहे.त्यांचे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आदी सह विविध क्षेत्रातील कर्तुत्व याची दखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषद अंतर्गत आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष अविनाश कदम,ज्येष्ठ मार्गदर्शक संतोष दानी,सचिव गहिनीनाथ पाचबैल,समीर शेख,राजेंद्र लाड,अक्षय विधाते आदीसह पदाधिकारी मान्यवरांनी लेखिका साहित्यिक डॉ.आशा फड यांचे अभिनंदन केले आहे. चौकट -------- या पुरस्काराबद्दल कौतुक आणि शुभेच्छा देत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे माजी सिनेट सदस्य आणि आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,डॉ.सत्यजित विधाते,ज्येष्ठ पत्रकार उपसंपादक उत्तमराव बोडखे,सौ.बबीताताई बोडखे,जिजाऊ महिला ब्रिगेडच्या सौ.
विद्याताई संतोष चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले. ----------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या