Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक कार्यकर्ते यशवंत खंडागळे यांच्या मुलाचा विवाह थाटात संपन्न ........... संविधानाच्या साक्षीने विवाह संपन्न ...... आ.धस,माजी आ.धोंडे, पोटभरे,कागदे,डोके,बेग,मस्के यांची प्रमुख उपस्थिती

आष्टी ( प्रतिनिधी) आजच्या काळात लग्न सोहळे म्हणजे केवळ दिखावा, खर्चाची स्पर्धा आणि अनावश्यक थाटमाट अशी ओळख निर्माण होत असताना,आष्टी तालुक्यातील एका विवाह सोहळ्याने समाजाला एक नवा आदर्श घालून दिला आहे.नवा विचार दिला आहे.विवाह हा केवळ दोन व्यक्तींमधील बंधन नसून तो सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा संस्कार असावा,या भावनेतून विवाह सोहळ्याची सुरुवातच भारताच्या संविधानाच्या प्रतींचे वाटप करून करण्यात आल्याने हा विवाह सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य,छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार,महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण व समतेचे कार्य आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानातील हक्क,अधिकार व कर्तव्ये या सर्व विचारधारांचा वारसा नव्या पिढीपर्यत पोहोचावा,समाजाला संविधानाची खरी ओळख व्हावी,या उद्देशाने हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.आष्टी तालुक्यातील शेरी येथील अंबिका लॉन्स येथील कार्यालयात काल रविवारी दि.८ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि साधेपणाने हा विवाह पार पडला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांचे चिरंजीव ऋषीकेश खंडागळे आणि संजय भाऊसाहेब राजगुरू (पाटेवाडी,ता.कर्जत) यांची कन्या अनुराधा राजगुरू यांचा विवाह आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,बाबुराव पोटभरे,पप्पू कागदे ( बीड),परमेश्वर येवले (मुंबई),नियामत बेग,साहेबराव मस्के,बापूसाहेब डोके,सभापती रमजान तांबोळी,अशोक साळवे,डॉ.शिवाजीर राऊत,अण्णासाहेब चौधरी,काकासाहेब शिंदे,युवराज पाटील,रामशेठ मधुरकर, गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने,इंजिनिअर प्रवीण वारे,संजयनाना ढोबळे, सतीशशेठ धस,गणेश शिंदे,नायब तहसीलदार भगीरथ धारक,अरुणभैय्या निकाळजे,अमोल तरटे,परिवंत गायकवाड, माजी सभापती अंकुश चव्हाण,विनोद रोडे,गौतम आजबे, संजयदादा आजबे,संतोषभैय्या चव्हाण,तानाजी अनभुले, नामदेव राऊत,रंगनाथ धोंडे,शिरीष थोरवे,दत्तात्रय खोटे, बन्सीभाऊपोकळे,इंजि.पी.बी.बोडखे,सुनील बोडखे,प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,उत्तम बोडखे,संतोष सानप,शरद तळेकर,प्रवीण पोकळे,गणेश दळवी,सचिन रानडे,संजय खंडागळे,सोमनाथ कोल्हे,अविनाश कदम,समीर शेख,बा.म.पवार,संतोष दाणी, सिद्धेश्वर शेंडगे यांच्यासह राजकीय,सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक,व्यापार क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.या विवाह सोहळ्यात अनावश्यक खर्च टाळून सजावट व इतर बाबीमध्ये साधेपणा राखण्यात आला.मात्र समाजासाठी उपयुक्त ठरेल अशा वैचारिक उपक्रमाला प्राधान्य देण्यात आले.विवाहासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुणे व नातेवाईकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित 'भारताचे संविधान'या पुस्तकाची ५०० प्रत भेट स्वरूपात देण्यात आली.विवाह सोहळ्यातून संविधानाचे महत्त्व,त्यातील मूलभूत हक्क,स्वातंत्र्य,
समता,बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची जाणीव उपस्थितांमध्ये निर्माण झाली. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे “संविधान वाचावे,समजावे आणि आचरणात आणावे" हा संदेश प्रभावीपणे पोहोचला.अनेक मान्यवरांनी या उपक्रमाचे जाहीर कौतुक करत, समाज प्रबोधनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.लग्न समारंभात केवळ आनंदोत्सव न साजरा करता समाजहिताचा विचार केंद्रस्थानी ठेवून संविधानाचा जागर करण्याचा हा प्रयत्न सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.खंडागळे व राजगुरू कुटुंबाने दिलेला हा आदर्श इतरांनीही स्वीकारावा,अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली असून,या विवाह सोहळ्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात सुरू आहे.उपस्थितांचे यशवंत खंडागळे यांनी आभार मानले. ----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या