Ticker

6/recent/ticker-posts

शृंगेरी विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनाचे अभयराजे धोंडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील शृंगेरी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले.केवळ मनोरंजनच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत सामाजिक भान जागवणाऱ्या सादरीकरणांमुळे हे संमेलन परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभयराजे धोंडे होते.
शृंगेरी विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनाचे अभयराजे धोंडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की,"विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून,त्याला सांस्कृतिक कार्यक्रमांची जोड असणे आवश्यक आहे.शृंगेरी विद्यालयाची संस्कारक्षम आणि मूल्याधिष्ठित वाटचाल खरोखरच प्रेरणादायी आहे.या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रबोधनात्मक नाट्य.मोबाईलचा अतिवापर,त्यामुळे होणारे अपघात, दुचाकीवरील निष्काळजीपणा आणि तरुण पिढीवर होणारे मोबाईलचे दुष्परिणाम या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी अभिनय करत उपस्थितांना अंतर्मुख केले.यासोबतच देशभक्तीपर गीते, विविध नृत्याविष्कार,समूहनृत्य आणि लघुनाट्यांनी कार्यक्रमात मोठी रंगत आणली.या कार्यक्रमाला अभयराजे धोंडे,प्रा.शिवदास विधाते,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सानप,शाखाधिकारी राकेश शाही,अशोक डोके,सरपंच रोहिदास पवार,उपसरपंच सचिन हराळ,अण्णासाहेब साबळे,विजय हराळ,संजय हराळ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक परमेश्वर पवार,शिवाजी सानप,मारुती सानप,संदीप पानसाडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ,पालक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मुख्याध्यापिका सौ.सविता माने व सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या