Ticker

6/recent/ticker-posts

आनंददायी जीवनासाठी कला हेच ऊर्जाकेंद्र ....... साहित्यिक डॉ.भास्कर बडे

आष्टी (प्रतिनिधी) कला ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून ती मानवी मनातील भाव-भावना,आचार-विचार अभिव्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे.कारण कलासक्त माणूस हा कधी रंगमंचावर तर कधी कलेच्या माध्यमातून जीवनामध्ये अभिव्यक्त होतो म्हणूनच आपल्यातला कलाकार व कलेची ऊर्जा उत्स्फूर्तपणे जागृत करीत आणि स्वतःला सिद्ध करीत चित्र,शिल्प,नाट्य,नृत्य,गायन, वादन,साहित्य,संगीत,वक्तृत्व अशा विविधांगी कलेची जोपासना करणे हे प्रत्येक कलावंतांची जबाबदारी आहे. असे प्रतिपादन साहित्यिक डॉ.भास्कर बडे यांनी मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित श्रीमती सुशीलादेवी देशमुख महिला महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या सुरवातीला दीपप्रज्वलन,मातोश्री सुशीलादेवी देशमुख यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.तसेच,यावेळी प्रमुख मान्यवरांचे स्वागत विद्यार्थिनींने स्वागतगीताने केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आशा मुंडे मॅडम, सांस्कृतिक विभागाचे प्रभारी प्रा.डॉ.बालासाहेब भोसले,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.विद्यादेवी कांबळे,सांस्कृतिक विद्यार्थीनी प्रतिनिधी कु.वैष्णवी हजारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.आपल्या भाषणामध्ये साहित्यिक डॉ.भास्कर बडे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये जन्मतः सुप्त कला गुण असतात या कलागुणांना वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून चालना मिळते यातूनच कलावंत,साहित्यिक निर्माण होतात.कलावंतांकडे डोळस दृष्टी व सकारात्मक दृष्टिकोनही असला पाहिजे. जीवनाचा निर्भेळ आनंद हा कलेतच असतो म्हणूनच कलावंतांनी कलेच्या क्षेत्रात अथक परिश्रम करून यशस्वी बनले पाहिजे असे मौलिक मार्गदर्शन केले. विद्यार्थिनिंच्या आग्राहाखातर डाॅ.बडेंनी,त्यांच्या अभ्यासक्रमातील "खिलार्या" ही शेती-मातीची कथा कथन करुन रसिकांची मने जिंकून वाहवा मिळवली..'खिल्लाऱ्या' ही कथा बैलांच्या आयुष्यावर असून,त्यातील दुःख वेदनांचे विनोदी शैलीने कथन करून कथाकार बडे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. आशा मुंडे यांनी कलेमुळेच आयुष्याला सौंदर्य प्राप्त होते. कलेतून जीवनाचा निखळ आनंद घेता येतो. या विविध कलेचा जन्म अगोदर झाला,नंतर भाषा जन्माला आली.कारण भिंतीवर रेखाटलेल्या चित्राप्रमाणे पाषाणयुगात कलेचे अनेक पुरावे आहेत.म्हणूनच भाव व्यक्त करण्यासाठी कलेची उपासना,कलेचे अद्ययावत शास्त्रशुद्ध ज्ञान,कलेची प्रचंड ऊर्जाशक्ती आणि सत्यम,शिवम व सुंदरमच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास केला पाहिजे.तसेच त्यांच्यातले सुप्त कलागुण, कलेचे शास्त्रशुद्ध ज्ञान व संधी,कलेतली संशोधन वृत्ती,कलेशी असलेले कौशल्य विकसित कारून कलेमध्ये करिअर करून आपल्या जीवनात यशस्वी झाली पाहिजे असे मौलिक विचार प्राचार्य डॉ.आशा मुंडे यांनी मांडले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक समयी प्रभारी प्रा.डॉ.बालासाहेब भोसले यांनी महिला महाविद्यालयाची स्थापना,उद्देश सांगून महाविद्या लयातील विविध उपक्रमा विषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रणिता पाटील डॉ.संग्राम टेकले यांनी संयुक्तपणे केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी करून दिला.गुणवंत विद्यार्थिनींच्या गुणगौरवाचे वाचन डॉ.शामराव शेंडगे,डॉ.ज्ञानेश्वर देशमुख यांनी केले तर आभार डॉ.विद्यादेवी कांबळे यानी मानले. यावेळी ग्रंथालय विभागाच्या वतीने २०२५- २०२६ मधील आदर्श वाचक पुरस्कार कु.वैष्णवी ठाकरे या विद्यार्थिनीला नवनीत डिक्शनरी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उन्हाळी परीक्षा २०२५ मधील गुणवंत विद्यार्थिनींचा व विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र,रजिस्टर, पेन देऊन गौरव करण्यात आला.या समारंभासाठी:महाविद्यालया तील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थिनी उपस्थित होते. --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या