Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी मतदार संघाच्या अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतील कृषी प्रदर्शन ------------------------------ उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

आष्टी (प्रतिनिधी ) आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीपूरक व्यवसायांमुळे ग्रामीण भागासह मतदार संघाच्या अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी‌ नवे तंत्रज्ञान,नवे विचार आणि समृद्ध शेतीकडे वाटचाल या ध्येयवाक्याने प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून मागील ३ वर्षापासून सलग भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून लाखो नागरिक या प्रदर्शनात भेट देऊन व्यवसायाकडे वळतात याचा बेरोजगार तरुणांसह शेतकरी व नागरिकांना फायदा होतो.याच उद्देशाने सलग तिसऱ्या वर्षी देखील आष्टी येथे राज्यस्तरीय भव्य डाॅ.स्वामीनाथन कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून ५ दिवस हे कृषी विषयक प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी आनंदपर्वणी ठरणार आहे. शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे. आष्टी येथील आनंद शैक्षणिक संकुलात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मंगळवारी दि.१७ फेब्रुवारी रोजी याबाबत माहिती दिली.१९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.या कृषी प्रदर्शनाचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.राजकीय नेते,विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.२०० पेक्षा अधिक कंपन्या,आधुनिक शेती, नवीन तंत्रज्ञान,खते व बियाणे,तज्ञ मार्गदर्शन, प्रदर्शनीमध्ये १५० हून अधिक दालने राहणार असून हे कृषीप्रदर्शन राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंद पर्वणी ठरणार आहे.आष्टीच्या इतिहासात दुष्काळी आष्टी मतदार संघातील शेतकरी व नागरीकांचे जिवनमान उंचावले पाहिजे यासाठी शेतकऱ्यांचे नेते माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन सलग तिसऱ्या वर्षी मराठवाड्यातील सर्वात मोठे डॉ.स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भव्य उद्घाटन समारंभ दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आष्टी येथे पार पडणार आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान,जलव्यवस्थापन, पीकपद्धतीतील बदल,सेंद्रिय शेती,पशुसंवर्धन व कृषी प्रक्रिया उद्योग याबाबत सविस्तर मार्गदर्शन या प्रदर्शनात दिले जाणार आहे.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ना.दत्तात्रय भरणे (कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य),ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे (मंत्री पशुसंवर्धन, पर्यावरण व हवामान बदल,महाराष्ट्र राज्य),आ.धनंजय पंडितराव मुंडे (माजी मंत्री,महाराष्ट्र राज्य),आ.प्रकाश सोळंके (माजी राज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य), माजी आ.अमरसिंह पंडित (माजी विधानपरिषद सदस्य, गेवराई),माजी आ.बाळासाहेब आजबे (माजी विधानसभा सदस्य,आष्टी), सुरज चव्हाण (प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),राजेश्वर चव्हाण (जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,बीड), तुषार पवार (उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृषी परिषद, पुणे),सुरज मांढरे (कृषी आयुक्त महाराष्ट्र) प्रा.डॉ.इंद्र मणी (कुलगुरू,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी),विवेक जॉन्सन (जिल्हाधिकारी,बीड ),पप्पूजी कागदे (युवक रिपाई प्रदेशाध्यक्ष)आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून सुनील वानखेडे (विभागीय कृषी सहसंचालक, छ.संभाजीनगर),सुभाष साळवे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,बीड),उद्धव गर्जे (उपविभागीय कृषी अधिकारी, बीड),सुरज पाटील (जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, बीड),श्रीमती वैशाली पाटील (तहसीलदार, आष्टी),गोरख तरटे (तालुका कृषी अधिकारी, आष्टी),अमृत गांगर्डे (तालुका कृषी अधिकारी,शिरूर कासार),शिवकुमार स्वामी (उपजिल्हाधिकारी, बीड – निवासी),दादाराव जाधवर (कृषी उपसंचालक, बीड), साहिल सय्यद (कृषी विकास अधिकारी,बीड),वल्लभ भोसले (जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक,बीड),गोकुळ बागलाने (गटविकास अधिकारी, पंचायत समिती आष्टी),ओंकार शेळके (तालुका कृषी अधिकारी,पाटोदा) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.स्वागताध्यक्ष म्हणून आ.भीमराव धोंडे (संस्थापक अध्यक्ष,आनंद चॅरिटेबल संस्था,आष्टी) हे मान्यवरांचे स्वागत करणार आहेत.निमंत्रक म्हणून डॉ.अजयदादा धोंडे व अभयराजे धोंडे कार्यरत आहेत.प्रायोजक जिजाई मसाले,सहप्रयोजक प्रीमियम स्कूल ऑफ डिजिटल मार्केटिंग,सहकार्य कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि मेहत्रे डेकोरेटर्स,इव्हेंट मॅनेजमेंट वाबळेज इव्हेंट असणार आहेत.कार्यक्रमाचे ठिकाण पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयासमोर आष्टी शेतकरी,कृषी तज्ञ,विद्यार्थी व नागरिकांसाठी हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक श्री छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या