
आष्टी ( प्रतिनिधी )
बांगलादेशाची राजधानी ढाका येथे महाराष्ट्र राज्य शासनाच्या
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक कवी
विचारवंतसमाजभूषण उत्तमराव तरकसे हे अत्यंत महत्त्वाचा व ज्वलंत विषयाच्या
अवलोकनाकरिता भारत-बांगलादेशाच्या दोन्ही देशाच्या सीमा भागातून बांगलादेशीय
नागरिकांचे भारतात होणारी घुसखोरीच्या समस्या बाबतचा अभ्यासाचे अवलोकन करण्याकरिता
भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील दक्षिण २४ परगाना सीमा, उत्तर २४ परगाना सीमा,
कृष्णानगर, नदिया, मुर्शिदाबाद, बालुरघाट, उत्तर दिनाजपुर, जलपानगुडी, कुच, बिहार
ह्या जिल्ह्यातील सीमा बांगलादेशाला लागून आहेत. मेघालय राज्यातील दक्षिण पश्चिम
गारो हिल्स, दक्षिण गारो हिल्स, दक्षिण पश्चिम खासी हिल्स, पूर्व खासी हिल्स, पूर्व
जयन्तिया हिल्स व आसाम त्रिपुरा राज्याच्या काही जिल्ह्यांच्या सीमा भाग
बांगलादेशाला लागून असलेल्या काही जिल्ह्यातील सीमा भागातून बांगलादेशातील
नागरिकांचे भारत देशात विना (पासपोर्ट) विनापरवाना घुसखोरीच्या मार्गाने या सीमा
भागातून नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असते सर्वात जास्त
बांगलादेशातील नागरिकांची भारत देशात पश्चिम बंगालमधील सीमा भागातून होते त्याचे
अवलोकन करण्याकरिता समाजभूषण उत्तमराव तरकसे हे भारताच्या बांगलादेशातील सीमा लगत
असलेल्या बांगलादेशाच्या राजधानी ढाका येथून सदर विषयाच्या अवलोकनाला सुरुवात करून
बांगलादेशातील राजशाही विभाग, रंगपुर विभाग, सुलोना विभागातील नागरिकांना तसेच
सीमेवरील जवानांना भेटून भारतात होणाऱ्या नागरी घुसकरीचा व बांगलादेशाच्या राजकीय,
सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व शेती विषयाचे अवलोकन करण्याकरिता समाजभूषण उत्तम
तरकसे यांच्यासोबत सुनील मोहिते, राहुल भदाणे, प्रदीप गवस, राजु यादव, प्रदिप सणस
यांना सोबत घेऊन दहा दिवसाच्या या भागातील रहिवासी असलेले नागरिक अहमद पीर खान,
साहिद जावेद, बिस्मिल्ला शेख, अशा नागरिकांना सोबत घेऊन सदर विषयाचे सखोल अवलंबन
केले.
0 टिप्पण्या