आष्टी (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रप्रेम, त्याग,निष्ठा आणि तेजस्वी पराक्रमातून राष्ट्र निर्मितीसाठी योगदान दिले. दिव्य संकटातून निर्माण केलेले हे राज्य आबाधीत ठेवण्यासाठी चंद्र- सूर्य असेपर्यंत छत्रपतींच्या विचारांचा जागर आज आवश्यक आहे अशी अपेक्षा युवा कार्यकर्ते अशोक साहेब खेडकर यांनी व्यक्त केली.
घाटशिळ पारगाव येथील घाटशिळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य वारभुवन तर मंचावर माजी सरपंच वैजनाथ खेडकर,विष्णू खेडकर, संतोष घोडके,हनुमान गायकवाड,पांडुरंग आंधळे,अंकुश खेडकर गुरुजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.राज्यगीताने जयंती सोहळ्याला सुरुवात झाली.यावेळी प्रमुख अतिथी अशोक साहेब खेडकर यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्यावर अनेक उदाहरणा दाखल प्रकाश टाकत त्यांच्या मौल्यवान विचाराची आज गरज असून युवकांसाठी जागर होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.संतोष घोडके यांनीही मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोपात प्राचार्य वारभुवन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समतावादी मूल्य निर्माण करणारी कार्यप्रणाली ही अत्यंत मानवतावादी मूल्यांची उपलब्धी असल्याचे सांगितले.विद्यार्थ्यांनी भाषणे केली.विद्यार्थिनींनी गीत आणि नृत्यातून शिवरायांना रोमांचकारी वंदन केले.प्रस्ताविक प्रा.बी.के.मुंडे यांनी तर बहारदार सूत्रसंचालन निवेदक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.बिभिषण चाटे यांनी केले.श्रीधर चोले यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी सी एम शिरसाट,प्रा.के.एच.सय्यद, प्रा.एस.ए.बटुळे,अशोक सांगळे,एन.एस.सानप,परजने सर,डी.एस.तळेकर,आर के खेडकर,जी.एम.बांगर,पाखरे आदीसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
चौकट
--------
उत्कृष्ट सूत्रसंचालनाबद्दल
प्रा.चाटे यांचा सत्कार
-----------------------
शिवजयंती सोहळ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणल्याबद्दल व आपल्या वाणीतून गोड रसाळ शब्दांची पेरणी करत रसिक श्रोते यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सुप्रसिद्ध सूत्रसंचालक निवेदक प्रा.बिभिषण चाटे यांचा विद्यालयाच्या आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते अशोक साहेब खेडकर आणि प्राचार्य वारभुवन,संतोष घोडके आणि ज्येष्ठ गुरुवर्य यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
-------------------


0 टिप्पण्या